Gangubai Kathiawadi : बॉलिवूड निर्माते संजय लीला भन्साळी (Sanjay Leela Bhansali) यांचा ‘गंगूबाई काठियावाडी’ (Gangubai Kathiawadi) हा सिनेमा 25 फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या सिनेमात आलिया भट्ट (Alia Bhatt) मुख्य भूमिकेत आहे. या सिनेमाला कामाठीपुरातील स्थानिक नागरिकांचादेखील विरोध आहे. अशातच गंगूबाईची नात भारतीनेदेखील दिग्दर्शक संजय लीला भन्साळींवर चुकीचे चित्रण केल्याचा आरोप केला आहे.
गंगूबाईंच्या कुटुंबीयांनीदेखील या सिनेमावर नाराजी व्यक्त केली होती. भारती म्हणाल्या, ‘गंगूबाई काठियावाडी’ सिनेमात गंगूबाईचे वेश्या म्हणून केलेले चित्रण पूर्णपणे चुकीचे आहे. गंगूबाईचा काठियावाड ते मुंबईचा प्रवास, तसेच रमनिक लालने त्यांना 500 रुपयांना विकत घेतले आणि वेश्या व्यवसाय करण्यासाठी भाग पाडले ते सर्व चुकीचे आहे.
माझ्या आजीला गंगूबाई बनवून संजय लीला भन्साळींनी मोठी चूक केली आहे. माझ्या आजीने अनेक सामाजिक कामे केली आहे. पण सिनेमात तिला चुकीच्या पद्धतीने दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.
वकिलाचे म्हणणे आहे की,"ट्रेलर पाहून कुटुंबीयांना धक्का बसला आहे. समाजासाठी इतकं काम करणाऱ्या एका महिलेला या चित्रपटात केवळ कामाठीपुरातील एक व्यक्ती दाखवलं आहे".
गंगूबाईंचा दत्तक मुलगा बाबू रावजी शाह यांनी 2021मध्येही या चित्रपटाबाबत याचिका दाखल केली होती. या प्रकरणी मुंबईतील न्यायालयाने संजय लीला भन्साळी आणि आलिया भट्ट यांना समन्स बजावले होते. मुंबई उच्च न्यायालयाने नंतर चित्रपटाच्या प्रदर्शनाला स्थगिती देण्यास नकार दिला आणि निर्मात्यांविरुद्ध गुन्हेगारी मानहानीच्या कारवाईला अंतरिम स्थगिती दिली. याबद्दल बोलताना बाबू रावजी शाह म्हणाले की, 'माझ्या आईला एका वेगळ्याच कॅरेक्टरमध्ये बसवण्यात आलं आहे. आता लोक विनाकारण माझ्या आईबद्दल काहीही बोलत आहेत.’
संबंधित बातम्या
TOP 5 Entertainment News : दिवसभरातील पाच महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्या
Shaakuntalam : समंथा रूथ प्रभूच्या 'शकुंतलम' सिनेमाचे पहिले पोस्टर प्रदर्शित, समंथाच्या लूकने लावले चारचॉंद
Upcoming Movies on OTT: 'बच्चन पांडे' ते 'गंगूबाई काठियावाडी' पर्यंत 'हे' सिनेमे होणार ओटीटीवर प्रदर्शित
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha