एक्स्प्लोर
म्हणून माझे केस अचानक पिकलेले दिसतात : ऋषी कपूर
हनी त्रेहान आणि सोनी पिक्चर्सची निर्मिती असलेल्या एका सिनेमासाठी अॅवन काँट्रॅक्टरने माझे केस रंगवले आहेत, असं ऋषी कपूर यांनी ट्विटरवर सांगितलं
मुंबई : ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर सध्या वैद्यकीय उपचारांसाठी न्यूयॉर्कला गेले आहेत. ऋषी कपूर यांना कर्करोग झाल्याच्या अफवांनी या काळात जोर धरल्यानंतर त्यांचे बंधू रणधीर कपूर यांनी स्पष्टीकरण दिलं. मात्र ऋषी कपूर यांच्या केसांचा बदललेला रंग पाहून चाहत्यांचा काही केल्या विश्वास बसेना. अखेर चिंटू कपूरांनी आपल्या पांढुरक्या केसांचं गुपित ट्विटरवर उलगडलं आहे.
'रातोरात माझे केस राखाडी/पांढरे झाल्यामुळे ज्या काही अफवा माझ्याबाबत फिरत आहेत, त्या स्पष्ट करत आहे. हनी त्रेहान आणि सोनी पिक्चर्सची निर्मिती असलेल्या एका सिनेमासाठी अॅवन काँट्रॅक्टरने माझे केस रंगवले आहेत. हितेश भाटिया दिग्दर्शित या चित्रपटाचं नाव अजून ठरलेलं नाही.' असं ऋषी कपूर यांनी ट्वीट केलं आहे.
ऋषी कपूर यांनी या चित्रपटातील आपला लूकही शेअर केला आहे. 'हा चित्रपटातील फायनल लूक आहे. शर्मा जी. लवकरच केसांचा मूळ रंग परत दिसेल' असंही ऋषी कपूर यांनी लिहिलं आहे.This is to dispel all notions and wrong speculations of my hair turning grey/white overnight. My hair was dyed by Awan Contractor for a film produced by Honey Trehan and Sony pictures directed by Hitesh Bhatia. Film is untitled. Trust this clears the air pic.twitter.com/0v5Z0nFcDN
— Rishi Kapoor (@chintskap) October 9, 2018
ऋषी कपूर यांच्या मातोश्री कृष्णा राज कपूर यांचं गेल्याच आठवड्यात निधन झालं. त्यावेळी ऋषी कपूर पत्नी नितू सिंग यांच्यासह उपचारांसाठी न्यूयॉर्कला होते.This is the final look of the film. Sharma ji. All grey! Will revert to original hair colour soon pic.twitter.com/luM4MKGVs1
— Rishi Kapoor (@chintskap) October 9, 2018
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
पुणे
राजकारण
पुणे
Advertisement