एक्स्प्लोर
..आणि आमीरला भेटण्याची इच्छा पूर्ण, रिंकूचा माझा सन्मान पुरस्काराने गौरव
![..आणि आमीरला भेटण्याची इच्छा पूर्ण, रिंकूचा माझा सन्मान पुरस्काराने गौरव Rinku Rajguru Falicitated By Majha Sanman Award ..आणि आमीरला भेटण्याची इच्छा पूर्ण, रिंकूचा माझा सन्मान पुरस्काराने गौरव](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/07/01210220/rinku-rajguru-270x202.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबईः करिअरच्या सुरुवातीलाच पहिला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला, त्यानंतर एबीपी माझाचा हा मानाचा पुरस्कार मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मिळाला, त्यामुळे आपला आनंद हा शब्दात सांगू शकत नाही, अशी प्रतिक्रिया 'सैराट'फेम रिंकू राजगुरुने व्यक्त केली.
'सैराट' सिनेमातील अभिनयाने अवघ्या महाराष्ट्राला याड लावणाऱ्या रिंकू राजगुरु अर्थात महाराष्ट्राच्या लाडक्या आर्ची आणि आकाश ठोसर म्हणजेच परशा यांना 'माझा सन्मान' पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. सिनेमाच्या पदार्पणातच उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल दोघांनीही पुरस्काराने गौरविण्यात आलं.
..आणि आमीरला भेटण्याची इच्छा पूर्ण
रिंकूचा अवघा महाराष्ट्र जरी चाहता असला तरी ती आमीर खानची मोठी चाहती आहे. आमीरने देखील सैराट सिनेमा पाहून कौतुक केलं, असं नागराज मंजुळे यांनी रिंकूला कळवलं होतं. त्यामुळे आज या पुरस्काराच्या निमित्ताने आपल्या आवडत्या अभिनेत्याला भेटण्याची इच्छा पूर्ण झाली, अशी प्रतिक्रिया रिंकूने बोलताना व्यक्त केली.
रिंकूने आपलं मनोगत व्यक्त केल्यानंतर प्रेक्षकांना रिंकूकडून सैराटमधील संवाद ऐकण्याचा मोह आवरता आला नाही. प्रेक्षकांनी रिंकूच्या तोंडून सैराटमधील संवाद ऐकून घेतला आणि एकच हशा उडाला.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
भविष्य
राजकारण
मुंबई
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)