(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Richa Chadha Controversy : "ती भारतविरोधी आहे"; विवेक अग्निहोत्रींनी रिचा चड्ढावर साधला निशाणा
Richa Chadha On Galwan : रिचा चड्ढाचं ट्वीट वादाच्या भोवऱ्यात अडकलं होतं. आता यावर प्रकरणावर 'द कश्मीर फाइल्स'चे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी भाष्य केलं आहे.
Vivek Agnihotri On Richa Chadha : बॉलिवूड अभिनेत्री रिचा चड्ढा (Richa Chadha) सध्या एका ट्वीटमुळे चर्चेत आहे. ट्वीटमध्ये गलवानचा उल्लेख करत भारतीय सैन्याचा अपमान केल्याचा आरोप तिच्यावर केला जात आहे. आता 'द कश्मीर फाइल्स' या सिनेमाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) यांनीदेखील रिचा चड्ढावर निशाणा साधला आहे.
विवेक अग्निहोत्री यांनी ट्वीट केलं आहे,"रिचाच्या ट्वीटचं मला अजिबात आश्चर्य वाटलं नाही. कारण तिच्या मनात जे होतं ते तिने लिहिलं आहे. ती भारतविरोधी आहे हे तिच्या ट्वीटवरुन जाणवतं. पण तरी ही मंडळी बॉलिवूडवर बहिष्कार का घालता असा प्रश्न उपस्थित करतात".
I am not surprised at all with this behaviour. They genuinely feel anti-India. Dil ki baat jubaan pe aa hi jaati hai.
— Vivek Ranjan Agnihotri (@vivekagnihotri) November 24, 2022
And then they ask why people want to #BoycottBollywood #Shame pic.twitter.com/Y9GgOxDUjs
रिचा चड्ढाच्या अडचणीत वाढ होत आहे. एका ट्वीटमुळे बॉलिवूडमधील अनेक मंडळी रिचाच्या विरोधात गेले आहेत. विवेक अग्निहोत्री यांच्या आधी अक्षय कुमार, अनुपम खेर, केके मेनन आणि सिने-निर्माते अशोक पंडित यांनीदेखील रिचाच्या वक्तव्यावर टीका केली आहे.
नेमकं प्रकरण काय?
लष्कराचे कमांडर लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी पीओके संदर्भात एक ट्वीट केलं. भारतीय सैन्य ही पाकव्याप्त काश्मीरला पुन्हा मिळवण्यासारखे आदेश अंमलात आणण्यास तयार असल्याचे द्विवेदी यांनी या ट्वीटमध्ये म्हटलं. त्यांच्या या ट्वीटला रिचाने ‘गलवानने HI म्हटलंय’ असा रिप्लाय दिला. रिचाने गलवानसंदर्भात अशा पद्धतीचं ट्वीट करून भारत आणि चीनदरम्यान 2020 मध्ये झालेल्या गलवान संघर्षात शहीद जवानांच्या बलिदानाची खिल्ली उडवल्याचं नेटकऱ्यांनी म्हटलंय. भारतीय लष्कराबद्दलचं हे अत्यंत अपमानकारक ट्वीट असल्याचं म्हणत अनेकांनी रिचावर राग व्यक्त केला आहे.
रिचाने मागितली माफी
रिचाने ट्वीट करत माफी मागितली आहे. तिने लिहिलं आहे,"माझ्या ट्वीटमुळे जर कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी त्यांची माफी मागते. माझे आजोबा सैन्यात होते आणि लेफ्टनंट कर्नल पदावर होते. भारत-चीन युद्धात त्यांच्या पायाला गोळी लागली होती.
@BediSaveena pic.twitter.com/EYHeS75AjS
— RichaChadha (@RichaChadha) November 24, 2022
संबंधित बातम्या