Rhea Chakraborty : रिया चक्रवर्तीचा सुष्मिता सेनसमोर सर्वात मोठा खुलासा, म्हणाली मीच सगळ्यात मोठी गोल्ड डिगर...
Rhea Chakraborty : रिया चक्रवर्ती ही तिचा एक नवा शो प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहे. यामध्ये तिने सुष्मिता सेनसमोर एक मोठा खुलासा केला आहे.
Rhea Chakraborty Called Herself Biggest Gold Digger: प्रोफेशनलपेक्षा स्वत:च्या वैयक्तिक आयुष्यामुळे अभिनेत्री रिया चक्रवर्ती (Rhea Chakraborty) हा कायम चर्चेत असते. सध्या ती तिचा नवीन चॅट शो चॅप्टर 2 यामुळे चर्चेत आलीये. या शोचा टीझर तिने नुकतच तिच्या सोशल मीडियावर शेअर केला आहे. तिच्या या शोमध्ये तिची पहिली गेस्ट म्हणून सुष्मिता सेनने हजेरी लावली. याचवेळी सुष्मिता सेनसमोर (Sushmita Sen) रियाने एक मोठा खुलासा केला आहे.
टीझरमध्ये रिया सुष्मितासमोर स्वत:ला सगळ्यात मोठी गोल्ड डीगर म्हणाली आहे. पण रिया असं का म्हणाली असा प्रश्न सगळ्यांना पडला आहे. त्याचं उत्तरही तिने या टीझरमध्ये दिलं आहे. तिच्या या शोचा टीझर शेअर करत त्याला कॅप्शन दिलं आहे.
रियाने काय म्हटलं?
रियाने या शोचा टीझर शेअर करत म्हटलं की, मी नुकतीच 32 वर्षांची झाले. हा प्रवास कसा होता, चार वर्षांमध्ये काय बदल झाले आणि स्वत:चं एक वर्जन तयार करण्यासाठी आज मला खूप छान वाटतंय. आता मी काहीतरी स्पेशल सुरु करतेय. एक अशा व्यक्तीला आमंत्रित केलं आहे, ज्याने त्याच्या आयुष्याचा चॅप्टर 2 स्वीकारला आणि याची सुरुवात करण्यासाठी सुष्मिता सेनशिवाय दुसरं उत्तम कोण असू शकतं. मी लहानपणापासून तिला पाहत आले आहे. ती आयुष्याला आव्हान देते आणि ते जिंकतेही. कोणताही सिक्वेल सहसा कंटाळवाणा असतो, पण हा नाही.
View this post on Instagram
रिया स्वत:ला का म्हणाली गोल्ड डीगर?
रियाने सुष्मितासमोर स्वत:चा गोल्ड डीगर असा उल्लेख केला. ती सुष्मिताला म्हणते की, तुला माहितेय का इथे सगळ्यात मोठा गोल्ड डीगर कोणा आहे? मीच आहे ती. त्यावर त्या दोघीही हसतात. सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर रियावर बरेच आरोप करण्यात आले होते. तसेच तिला गोल्ड डीगरही म्हटलं गेलं होतं. त्याच्या मृत्यूसाठी रियालाच जबाबदार धरण्यात आलं होतं.
सुष्मिता सेनला म्हटलं होतं गोल्ड डीगर
जेव्हा सुष्मिता सेनचं नाव ललित मोदीसोबत जोडलं गेलं होतं, तेव्हा तिलाही गोल्ड डीगर म्हटलं जात होतं. सुष्मिता आणि ललित मोदीचे सोशल मीडियावर फोटोही आले होते आणि त्यांच्या डेटींगच्या चर्चाही सोशल मीडियावर सुरु होत्या.