एक्स्प्लोर
बिग बी अमिताभ बच्चन आणि नागराज मंजुळेंच्या 'झुंड' ची तारीख ठरली
फॅन्ड्री, सैराटचे दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी गेल्या वर्षी आपल्या 'झुंड' या चित्रपटाची घोषणा केली होती. हा चित्रपट नागपूरचे निवृत्त क्रीडाशिक्षक विजय बारसे यांच्या जीवनावर आधारित आहे. बारसे हे झोपडपट्ट्यांमधील मुलांना फुटबॉलचे प्रशिक्षण देतात. या चित्रपटात बारसे यांची भूमिका अमिताभ बच्चन साकारणार आहेत.
मुंबई : बिग बी अमिताभ बच्चन यांची मुख्य भूमिका आणि 'सैराट'कार नागराज मंजुळे यांचे दिग्दर्शन असलेल्या बहुचर्चित 'झुंड' चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख निश्चित झाली आहे. येत्या 20 सप्टेंबरला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचे विश्वसनीय सूत्रांचे म्हणणे आहे. अद्याप नागराज मंजुळे यांच्याकडून याबाबत दुजोरा मिळाला नसला तरी याच तारखेला चित्रपट प्रदर्शित होणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे.
फॅन्ड्री, सैराटचे दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी गेल्या वर्षी आपल्या 'झुंड' या चित्रपटाची घोषणा केली होती. हा चित्रपट नागपूरचे निवृत्त क्रीडाशिक्षक विजय बारसे यांच्या जीवनावर आधारित आहे. बारसे हे झोपडपट्ट्यांमधील मुलांना फुटबॉलचे प्रशिक्षण देतात. या चित्रपटात बारसे यांची भूमिका अमिताभ बच्चन साकारणार आहेत. नागराज मंजुळे यांच्या बॉलिवूडमधील पहिल्या ‘झुंड’ या सिनेमातून बिग बी अमिताभ बच्चन यांनी सुरुवातीला दिवसांपूर्वी माघार घेतली होती. सतत सिनेमाच्या तारखा पुढे ढकलल्या जात असल्याने त्यांनी हा निर्णय घेतला होता. तसंच त्यांनी नागराज मंजुळे आणि निर्मात्यांकडून घेतलेले पैसेही परत केले होते. मात्र नागराज मंजुळेच्या पहिल्या बॉलिवूड चित्रपटात अमिताभ बच्चन असावेत, यासाठी निर्मात्यांचा प्रयत्न होते. त्यांनी केलेली मनधरणी अखेर यशस्वी ठरली आणि त्यांनी चित्रपट करण्यास होकार दिला होता. विरोधामुळे तारखा लांबल्या! ‘सैराट’ या सिनेमाच्या प्रचंड यशानंतर नागराज यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याचा निर्णय घेतला होता. पहिल्याच हिंदी सिनेमात काम करण्यासाठी त्यांनी अमिताभ बच्चन यांना राजी केलं होतं.त्यासाठी पुण्यातील सावित्रीबाई फुले विद्यापीठात भव्य सेट लावण्यात आला होता. मात्र त्याला काही संघटनांनी विरोध केल्यामुळे तो काढावा लागला. याचा परिणाम सिनेमाच्या शेड्युलवर पडत गेल्याने, सातत्याने तारखा पुढे पुढे ढकलल्या गेल्या. त्यामुळे अमिताभ बच्चन यांचं वेळापत्रक बिघडलं. बिग बींनी मागील वर्ष हे या सिनेमासाठी राखून ठेवलं होतं. मात्र ते वेळेनुसार झालं नाही. त्यामुळे अमिताभ बच्चन यांनी हा सिनेमाच सोडण्याचा निर्णय घेतला होता. झुंडच्या चित्रीकरणासाठी नागराज मंजुळे यांनी विद्यापीठाच्या मैदानातील काही भागावर सेट उभा केला होता. हा चित्रपट खेळावर आधारित असल्याने विद्यापीठाकडून त्याचा सहानभूतीपूर्वक विचार करत, त्याला परवानगी देण्यात आली होती. मात्र विद्यापीठाच्या जागेचा व्यावसायिक वापर झाला असून, लीजच्या कराराचा भंग झाल्याचा ठपका पुणे शहर तहसील कार्यालयाने विद्यापीठावर ठेवला होता. त्यामुळे सिनेमाचा सेट सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या मैदानातून हटवण्याचा आदेश विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. नितीन करमळकर यांनी दिला होता. अशा असंख्य अडचणींनंतर 'झुंड'चे चित्रीकरण नागपुरात यशस्वीरित्या पार पडले. आता हा सिनेमा येत्या 20 सप्टेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.Release date finalised... #Jhund, starring Amitabh Bachchan and directed by #Sairat director Nagraj Manjule, to release on 20 Sept 2019... Produced by Bhushan Kumar, Krishan Kumar, Raaj Hiremath, Savita Raj Hiremath and Nagraj Manjule. pic.twitter.com/iPMaIyT8Z9
— taran adarsh (@taran_adarsh) February 19, 2019
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
शिक्षण
महाराष्ट्र
Advertisement