Ravi Kishan on Salman Khan : म्हणून तेरे नामच्या सेटवर सलमान खानपासून दूर राहत होते रवी किशन, 21 वर्षांनी सांगितलं कारण
Ravi Kishan on Salman Khan : अभिनेते रवी किशन यांनी तेरे नाम या चित्रपटाच्या सेटवर सलमानसोबताच एक किस्सा शेअर केला आहे.
Ravi Kishan on Salman Khan : 'लापता लेडीज' (Lapataa Ladies) या चित्रपटामुळे अभिनेते रवी किशन (Ravi Kishan) हे सध्या बरेच चर्चेत आहेत. यामध्ये त्याने पोलिसाची भूमिका साकारली आहे. या सिनेमाचा ट्रेलर जेव्हा प्रदर्शित करण्यात आला होता, त्यावेळी लोकांनी देखील चांगला प्रतिसाद त्याला दिला. 1 मार्च रोजी चित्रपटगृहात हा चित्रपट प्रदर्शित करण्यात येणार आहे. दरम्यान रवी किशन यांनी नुकतच एका मुलाखतीदरम्यान तेरे नाम या चित्रपटाच्या वेळचा सलमानसोबतचा (Salman Khan) एक किस्सा शेअर केला आहे.
रवी किशन यांनी 'द ललनटॉप'ला दिलेल्या मुलाखतीत हा किस्सा सांगितला. यावेळी तेरे नामच्या सेटवर रवी किशन सलमानपासून का दूर राहायचे याबाबात देखील खुलासा केला आहे. त्यांनी म्हटलं की, कलाकार हे अत्यंत मूडी असतात आणि जेव्हा त्यांना कळतं की त्यांच्या सहकलाकाराचा मूड चांगला नाही, तेव्हा ते त्या कलाकाराला स्पेस देतात. मी सलमानच्या बाबतीतही हेच केलं
रवी किशन यांनी नेमकं काय म्हटलं?
तेरे नाम या चित्रपटात राधेचं पात्र हे अत्यंत इंटेन्स होतं. त्याचमुळे मी तेरे नामच्या सेटवर सलमानपासून दूर राहायचो जेणेकरुन त्याला त्याची भूमिका चोख निभावता येईल. चित्रपटाचे दिग्दर्शक सतीश कौशिक यांना देखील असंच हवं होतं. त्यामुळे सलमान त्या भूमिकेत पूर्णपणे उतरु शकला, असा अनुभव रवी किशन यांनी सांगितला.
किरण रावच्या 'लापता लेडीज'मध्ये झळकणार रवी किशन
किरण राव दिग्दर्शित लापता लेडीज हा चित्रपट उद्यापासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. किरण राव दिग्दर्शित आणि आमिर खान-ज्योती देशपांडे निर्मित हा चित्रपट आहे. या चित्रपट रवी किशन देखील झळकणार आहेत. तसेच त्यांच्यासोबत नितांशी गोयल, प्रतिभा रंता, स्पर्श श्रीवास्तव देखील असणार आहेत.