Raveena Tondon : बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खानची (Shah Rukh Khan) लेक सुहाना खान (Suhana Khan) मुख्य भूमिकेत असलेला 'द आर्चीज' (The Archies) हा सिनेमा नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर हा सिनेमा रिलीज झाला आहे. सुहाना खान आणि खुशी कपूर (Khushi Kapoor) यांच्या सिनेमाला प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. दरम्यान अभिनेत्री रवीना टंडनने (Raveena Tondon) अगस्त्य नंदा (Agastya Nanda) आणि खुशी कपूर यांची माफी मागितली आहे.


नेमकं प्रकरण काय? 


'द आर्चीज' हा सिनेमा रिलीज झाल्यानंतर सिनेमासंदर्भात अनेक मीम्स सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. दरम्यान एक मीम मात्र चांगलच चर्चेत आलं आहे. या मीममध्ये सुहाना खान (Suhana Khan) आणि अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांचा नातू अगस्त्य नंदादेखील (Agastya Nanda) दिसत आहे. या मीममध्ये अगस्त्य आणि खुशी कपूर यांच्या अभिनयाची मजा घेतली जात आहे. हे मीम बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडननेदेखील लाईक केलं आहे. त्यामुळे रवीना टंडन चर्चेत आली. आता अभिनेत्रीने यासंदर्भात आपली प्रतिक्रिया दिली आहे.


रवीना टंडनने मागितली माफी (Raveena Tondon Apologies)


सुहाना खान, खुशी कपूर आणि अगस्त्य नंदा या स्टारकिड्सचा 'द आर्चीज' हा सिनेमा सध्या चर्चेत आहेत. सिनेमा रिलीज झाल्यानंतर अनेक मंडळी स्टार किड्सच्या अभिनयाचं कौतुक करत आहेत. तर दुसरीकडे अनेक मंडळी त्यांना ट्रोल करत आहेत. दरम्यान व्हायरल होणारं एक मीम रवीना टंडनने लाईक केलं आहे. या मीममध्ये खुशी कपूर आणि अगस्त्य नंदा यांच्या अभिनयाबद्दल भाष्य करण्यात आलं आहे. या मीमचा स्क्रीनशॉट व्हायरल झाल्यानंतर रवीना टंडनने यासंदर्भात आपली बाजू मांडली आहे. अभिनेत्रीने इंस्टा स्टोरी शेअर करत लिहिलं आहे,"चुकून माझ्याकडून ते मीम लाईक झालं आहे. याबद्दल मी क्षमा मागते".



मीममध्ये नेमकं काय आहे? 


मीममध्ये खुशी कपूर आणि अगस्त्य नंदा यांच्या अभिनयाबद्दल भाष्य करण्यात आलं आहे. 'एक्टिंग डाइड हीअर' असं या मीमवर लिहिलेलं आहे. या मीममध्ये खुशी कपूर आणि अगस्त्य नंदा एकत्र दिसत आहेत. 'द आर्चीज' या सिनेमातील हा एक सीन आहे. या मीमसह सिनेमातील अनेक मीम्स सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.


संबंधित बातम्या


The Archies Review : स्टार किड्सचा 'द आर्चीज'! कॉमिक जगताची सफर घडवणारा सिनेमा