The Archies Movie Review : बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानची (Shah Rukh Khan) लेक सुहाना (Suhana Khan), अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांचा नातू अगस्त्य नंदा (Agastya Nanda), श्रीदेवी (Sridevi) यांची मुलगी खुशी कपूर (Khushi Kapoor) या तीन स्टार कीडने 'द आर्चीज' (The Archies) या सिनेमाच्या माध्यमातून मनोरंजनसृष्टीत पदार्पण केलं आहे. स्टारकिडच्या या सिनेमाची घोषणा झाल्यापासून चाहत्यांना उत्सुकता होती. अखेर हा बहुचर्चित सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.


'द आर्चीज'चं कथानक काय आहे? 


'द आर्चीज'चं कथानक 'Archies Comics'च्या पात्रांवर आधारित आहे. रिव्हरडीले नामक एका जागेची गोष्ट या सिनेमात दाखवण्यात आली आहे. या गावात 9 हजारपेक्षा अधिक लोक राहतात. Riverdelle मधील ग्रीन पार्क ही त्या गावातील शान आहे. पण काहींना ते ग्रीन पार्क तोडून त्याठिकाणी एक आलिशान हॉटेल बनवायचं आहे. पण तेथील तरुण मंडळी त्यांना या गोष्टी करण्यापासून रोखतात. गोष्ट सोपी असली तरी खूप काही सांगून जाणारी आहे. 


'द आर्चीज' कसा आहे? 


'द आर्चीज' हा सिनेमा 'जवान','पठाण' आणि 'अॅनिमल' या सिनेमांपेक्षा वेगळा आहे. हा खूप फ्रेश सिनेमा आहे. 60 च्या दशकाची सेटिंग आणि तेव्हाचे वाटतील असे कलाकार. सुरुवातील सिनेमा पाहताना हा खास नाही, असं वाटेल. पण हळूहळू हा सिनेमा तुम्हाला खुर्चीला खिळवून ठेवेल. या सिनेमातील पात्रांसोबत तुम्ही जोडले जाल. हा सिनेमा तुम्हाला एका वेगळ्या प्रवासात घेऊन जाईल. हा प्रवास तुम्हाला नक्कीच आवडेल. 


कलाकरांच्या अभिनयाचं कौतुकचं


'द आर्चीज' या सिनेमातील कलाकार तुम्हाला हैराण करतील. अमिताभ यांचा नातू अगस्तय नंदा हा प्रत्येक मुलीच्या प्रेमात पडलेला सिनेमात दाखवण्यात आला आहे. सुहान खान फक्त एक-दोनदा आपल्या वक्तव्यामुळे चर्चेत आली आहे. पण या सिनेमात मात्र तिने कमाल केली आहे. तिच्यात एक वेगळाच अॅटीट्यूड दिसतो. खुशी कपूरनेही आपली भूमिका चोख निभावली आहे. वैदांग रैनानेदेखील चांगलं काम केलं आहे. मिहिर आहूजा, युवराज मेंदा, आदिती सेगल या सिनेमातील सर्व कलाकारांनी उत्तम काम केलं आहे. 


जोया अख्तरने दिग्दर्शित केलेला 'द आर्चीज' 


'द आर्चीज' या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा जोया अख्तरने सांभाळली आहे. तीन मोठ्या स्टार किडला लॉन्च करण्याचं प्रेशर जोयाच्या कामात कुठेही जाणवत नाही. दिग्दर्शिका म्हणून तिने चांगलं काम केलं आहे. आयशा ढिल्लो, रीमा कागती आणि जोया अख्तर यांनी या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. 'द आर्चीज' या सिनेमाचं संगीत शंकर एहसान लॉय यांनी केलं आहे. 
  
'द आर्चीज' या सिनेमातील पात्रांची नावे इंग्रजीमध्ये आहेत. त्यामुळे प्रेक्षक धोडे गोंधळतात. पण हळूहळू या पात्रांसोबत तुम्ही जोडले जाल. 'द आर्चीज' हा सिनेमा तुम्ही ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहू शकता.