HC Notice to Shah Rukh Khan Akshay Kumar Ajay Devgn : बॉलिवूडचा खिलाडी अर्थात अक्षय कुमार (Akshay Kumar), शाहरुख खान (Shah Rukh Khan) आणि अजय देवगण (Ajay Devgn) या बॉलिवूडच्या तीन अभिनेत्यांना केंद्र सरकारने नोटीस पाठवली आहे. आरोग्यासाठी घातक असलेल्या पान मसाल्याच्या
जाहिरात केल्याप्रकरणी त्यांना नोटीस पाठवण्यात  आली आहे. 


पान मसाल्याच्या जाहिरात प्रकरणावर सुप्रीम कोर्टातही सुनावणी सुरू असल्याने अलाहाबाद हायकोर्टाच्या लखनऊ खंडपीठासमोर केलेली  अवमान याचिका फेटाळण्यात यावी, अशी मागणी केंद्र सरकारच्या वकिलांनी केली आहे. 


बॉलीवूडच्या तीन अभिनेत्यांना धाडल्या नोटिसा


आरोग्यासाठी घातक असलेल्या गुटखा आणि पान मसाल्याच्या जाहिराती केल्याप्रकरणी बॉलीवूड अभिनेते अक्षय कुमार (Akshay Kumar), शाहरुख खान (Shah Rukh Khan) आणि अजय देवगण (Ajay Devgn) यांना केंद्र सरकारने नोटिसा बजावल्या आहेत.


अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या  लखनऊ खंडपीठाच्या अवमानना याचिकेवरील सुनावणीदरम्यान केंद्र सरकारच्या वकिलांनी अभिनेत्यांना नोटिसा पाठवल्याची माहिती दिली.
या प्रकरणावर सुप्रीम कोर्टातही सुनावणी सुरू असल्याने अलाहाबाद हायकोर्टाच्या लखनऊ खंडपीठासमोर केलेली याचिका अवमानना याचिका फेटाळण्यात यावी, अशी मागणी केंद्र सरकारच्या वकिलांनी केली आहे.


युक्तिवाद ऐकल्यानंतर खंडपीठाने 9 मे 2024 रोजी सुनावणी निश्चित केली आहे. न्यायमूर्ती राजेश सिंह चौहान यांच्या खंडपीठाने याआधी केंद्र सरकारला याचिकाकर्त्याच्या प्रतिनिधीत्वावर निर्णय घेण्यास सांगितलं होतं. ज्यांनी मुळात अभिनेते आणि प्रतिष्ठित व्यक्तींवर कारवाई केली पाहिजे असा युक्तिवाद केला होता. परंतु ते गुटखा कंपन्यांच्या जाहिराती करत होते. 


22 ऑक्टोबरला सरकारला निवेदन देण्यात आले होते. पण पुढे यावर काहीही कारवाई झाली नसल्याचा युक्तिवाद याचिकाकर्त्याने केला. शुक्रवारी डेप्युटी सॉलिसिटर जनरल एसबी पांडे यांनी उच्च न्यायालयात सांगितले की,"केंद्राने अक्षय कुमार, शाहरुख खान आणि अजय देवगण यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. अमिताभ बच्चन यांनी यापूर्वीच आपला करार रद्द केला असूनही त्याची जाहिरात दाखवणाऱ्या गुटखा कंपनीला कायदेशीर नोटीस पाठवली होती, असेही न्यायालयाला सांगण्यात आले". 


शाहरुख खान (Shah Rukh Khan), अक्षय कुमार (Akshay Kumar) आणि अजय देवगण (Ajay Devgn) तिघेही बॉलिवूडचे सुपरस्टार अभिनेते आहेत. तिघांनी अनेक सुपरहिट सिनेमांत काम केलं आहे. तिघांच्या आगामी सिनेमांची चाहत्यांना उत्सुकता आहे. अशातत आता केंद्र सरकारने नोटीस धाडल्यामुळे त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.


संबंधित बातम्या


Sunny Deol : सनी देओल पुन्हा बेपत्ता; पठाणकोटमध्ये ठिकठिकाणी झळकले पोस्टर