Shah Rukh Khan Dunki Drop 5 Release : बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान (Shah Rukh Khan) सध्या त्याच्या आगामी 'डंकी' (Dunki) या सिनेमामुळे चर्चेत आहे. शाहरुखचे चाहते गेल्या अनेक दिवसांपासून या सिनेमाची प्रतीक्षा करत आहेत. अशातच अभिनेत्याने या सिनेमातील 'ओ माही' (O Maahi) या गाण्याची झलक चाहत्यांसोबत शेअर केली आहे. 


'पठाण' (Pathaan) आणि 'जवान' (Jawan) या सिनेमानंतर शाहरुखचे चाहते त्याच्या आगामी 'डंकी' या सिनेमाची प्रतीक्षा करत आहेत. 'डंकी'ची घोषणा झाल्यापासून या शब्दाचा नेमका अर्थ काय हे ते जाणून घेत आहेत. अखेर आता शाहरुखने या शब्दाचा अर्थ चाहत्यांसोबत शेअर केला आहे. 'ओ माही' या गाण्याचा टीझर सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.


'डंकी'तील 'ओ माही' गाणं लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला


'डंकी' या सिनेमातील 'ओ माही' हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'लुट्ट पुट गया' आणि 'निकले थे कभी हम घर से' नंतर 'ओ माही' हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'ओ माही' हे या सिनेमातील तिसरं गाणं आहे. या गाण्याचा टीझर किंग खानने सोशल मीडियावर शेअर केला आहे. शाहरुखने टीझर शेअर करत लिहिलं आहे,"डंकी'चा अर्थ काय? सगळेच विचारत आहेत. 'डंकी'चा अर्थ आहे आपल्या लोकांपासून वेगळं होणं. जेव्हा तुम्ही त्यांच्यासोबत असता तेव्हा आयुष्यातला हा क्षण कधी संपू नये असं तुम्हाला वाटतं". 






तगडी स्टाककास्ट असलेला 'डंकी'


'डंकी' या सिनेमात शाहरुख खानसह बोमन ईरानी, तापसी पन्नू, विकी कौशल, विक्रम कोचर आणि अनिल ग्रोवर हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. जियो स्टुडिओ, रेड चिलीज एंटरटेनमेंट आणि राजकुमार हिरानी फिल्म्सच्या बॅनरअंतर्गत या सिनेमाची निर्मिती करण्यात येणार आहे. 


'डंकी' या सिनेमाचं कथानक अभिजात जोशी, राजकुमार हिरानी आणि कनिका ढिल्लो यांनी लिहिलं आहे. 21 डिसेंबर 2023 रोजी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'डंकी' या सिनेमाची चाहत्यांमध्ये दिवसेंदिवस उत्सुकता वाढत आहे. येत्या काही दिवसांत हा सिनेमा सिनेमागृहात प्रदर्शित होईल.


संबंधित बातम्या


Bollywood Actors : अक्षय कुमार, शाहरुख खान अन् अजय देवगणला केंद्र सरकारची नोटीस; पान मसाल्याच्या जाहिरातीमुळे अभिनेत्यांच्या अडचणीत वाढ