एक्स्प्लोर
हुबेहूब कपिल देव, '83' चित्रपटाचा फर्स्ट लूक प्रदर्शित
बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंह याचा आज वाढदिवस आहे. वाढदिवसानिमित्त त्याने त्याच्या चाहत्यांना गिफ्ट दिलं आहे.
मुंबई : बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंह याचा आज वाढदिवस आहे. वाढदिवसानिमित्त त्याने त्याच्या चाहत्यांना गिफ्ट दिलं आहे. रणवीरने त्याच्या बहुचर्चित 83 या चित्रपटाचा फर्स्ट लूक प्रदर्शित केला आहे.
रणवीर या चित्रपटात 1983 च्या वर्ल्डकप विजेत्या भारतीय संघाचे कर्णधार कपिल देव यांची भूमिका साकारत आहे. फर्स्ट लूकमध्ये रणवीर हुबेहुब कपिल देव यांच्यासारखाच दिसत आहे. हा फोटो पाहून अनेकांनी हा तर कपिल देव यांचा तरुणपणीचा फोटो असल्याचे म्हटले आहे.
कपिल देव यांच्या नेतृत्त्वात 1983 साली भारताने पहिल्यांदा वर्ल्ड कपवर आपलं नाव कोरलं होतं. तो क्षण आजही भारतीय क्रिकेटप्रेमींच्या लक्षात आहे. '83' हा सिनेमा भारताच्या याच ऐतिहासिक विजयावर आधारित आहे, मात्र कपिल देव सिनेमाचे केंद्रबिंदू असणार आहेत. पुढच्या वर्षी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
सिनेमात रणवीरसोबत कपिल देव यांची मुलगी अमिया सिनेसृष्टीत पदार्पण करणार असल्याचे बोलले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कपिल देव यांची मुलगी अमिया '83' सिनेमातून असिस्टंट डायरेक्टर म्हणून आपल्या कारकिर्दिची सुरुवात करण्याच्या तयारीत आहे. सिनेमात रणवीर सिंह कपिल देव यांनी भूमिका साकारणार आहे. दिग्दर्शक कबीर खान या सिनेमाचं दिग्दर्शन करत आहे.
WWE चॅम्पियन ब्रॉक लेसनरकडून रणवीरला कारवाईचा इशारा | ABP MajhaView this post on Instagram
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement