Ranveer Singh, Bear Grylls : बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंह (Ranveer Singh) नुकताच बेयर ग्रील्सच्या (Bear Grylls) शोमध्ये झळकला होता. या शोमधून रणवीरची एक नवी बाजू प्रेक्षकांना पाहायला मिळाली. मात्र, सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ही व्हिडीओ क्लीप बेयर ग्रील्सच्या शो मधली आहे. मात्र, या व्हायरल व्हिडीओमध्ये अभिनेता रणवीर सिंह बेयर ग्रील्सवर चुंबनाचा वर्षाव करताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकरी मात्र त्याला जोरदार ट्रोल करत आहेत.


'Ranveer Vs Wild with Bear Grylls' हा शो सध्या प्रचंड चर्चेत आहे. नुकताच या शोचा भाग नेटफ्लिक्सवर प्रसारित करण्यात आला आहे. रणवीर सिंहचा जंगलातील उत्साह प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत असतानाच या शोमध्ये असे काही घडले आहे, ज्यामुळे सोशल मीडियावरील यूजर्स रणवीरला ट्रोल करत आहेत. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडीओमध्ये रणवीर सिंह चक्क बेयर ग्रील्सला चुंबन देताना दिसत आहे. रणवीर नेहमीच अतिउत्साही दिसतो. या शोमध्येही त्याचं हेच रूप पाहायला मिळालं आहे. मात्र, रणवीरचं हे अशा प्रकारे बेयर ग्रील्सला चुंबन करणं नेटकऱ्यांना आवडलेलं नाही.


नेटकरी करतायत ट्रोल!


अभिनेता रणवीर सिंहचा हा व्हिडीओ पाहून नेटकरी त्याला ट्रोल करत आहेत. मात्र, रणवीरचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. अनेक युजर्सनी हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. अनेकांना हा व्हिडीओ पसंत पडलेला नाही. तर, काहींनी म्हटलेय की, रणवीरचं हे वागणं कदाचित बेयर ग्रील्सला देखील पटलेलं नाही.


पाहा नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया





आगामी चित्रपटांमध्ये व्यस्त अभिनेता!


वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, रणवीर नुकताच 'जयेशभाई जोरदार' या चित्रपटात दिसला होता. यशराज प्रॉडक्शनचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारशी जादू दाखवू शकला नाही. या चित्रपटाने केवळ 15.59 कोटींची कमाई केली. 'जयेशभाई जोरदार' या सिनेमात रणवीर सिंह एका अशा व्यक्तीची भूमिका साकारत होता, जो आपल्या न जन्मलेल्या बाळासाठी कठोर संघर्ष करतो आणि बाळाला वाचवण्यासाठी काहीही करण्यास तयार असतो. रणवीर सिंहच्या या व्यक्तिरेखेचे ​​प्रेक्षकांकडून खूप कौतुक झाले होते. मनीष शर्मा निर्मित, 'जयेशभाई जोरदार' मध्ये 'अर्जुन रेड्डी' फेम शालिनी पांडे मुख्य भूमिकेत दिसली होती. आता रणवीर सध्या त्याच्या आगामी अनेक प्रोजेक्ट्सवर काम करत आहे. तो लवकरच रोहित शेट्टीच्या 'सर्कस' या चित्रपटात दिसणार आहे. या शिवाय तो करण जोहरच्या ‘रॉकी आणि रानी की प्रेम कहानी’मध्येही मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहे.


हेही वाचा :


Ranveer Singh Birthday : रणवीर सिंहचा 37 वा वाढदिवस; जाणून घ्या अतरंगी स्टाईलमुळे चर्चेत असणाऱ्या रणवीरबाबत...


अॅड एजन्सीमध्ये नोकरी ते बॉलिवूड स्टार; अतरंगी स्टाईलमुळे चर्चेत असणारा रणवीर सिंह कोट्यवधींचा