Nick Jonas, Priyanka Chopra : बॉलिवूडची ‘देसी गर्ल’ प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) आणि तिचा पती-गायक निक जोनास (Nick Jonas) यांचे फोटो सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असतात. या जोडीच्या लग्नाला आता चार वर्ष झाली आहेत. या वर्षाच्या सुरुवातीला ही जोडी एका मुलीची पालक बनली आहे. निक आणि प्रियांकाने त्यांच्या मुलीचे नाव मालती मेरी चोप्रा जोनास असे ठेवले आहे. मुलीच्या जन्मानंतरही निक आणि प्रियांका एकमेकांना वेळ देत असतात. अनेकदा ही जोडी रोमँटिक अंदाजात स्पॉट होत असतात. नुकतेच दोघे टाहो तलावाजवळ (Lake Tahoe) रोमँटिक अंदाजात स्पॉट झाले.

Continues below advertisement


या खास क्षणांचे फोटो निक जोनास याने आपल्या सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये प्रियांका आणि निकचा रोमँटिक अंदाज दिसत आहे. प्रियांका चोप्राने निक जोनासच्या खांद्यावर डोकं ठेवलं आहे. यावेळी दोघे एकमेकांसोबत क्वॉलिटी टाईम घालवताना दिसत आहे. ‘मॅजिक अवर’ असं कॅप्शन देत निकने हे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.


पाहा पोस्ट :



सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या या फोटोंमध्ये हे जोडपे ‘टाहो' तलावाच्या मधोमध एका बोटीवर उभे आहेत. पहिल्या फोटोत निक कॅमेऱ्यासाठी फोटो पोज देताना दिसत आहे, तर प्रियांका शेजारी उभी आहे. दुसऱ्या फोटोत प्रियांका पती निकच्या खांद्यावर डोके ठेवून उभी आहे. अभिनेत्रीच्या लूकबद्दल बोलायचे झाले तर, ती नारंगी रंगाच्या टॉप आणि मॅचिंग पॅंटमध्ये दिसत आहे, यावर तिने ब्लॅक जॅकेट परिधान केले आहे. त्याच वेळी, निक काळ्या रंगाच्या कपड्यांमध्ये खूपच सुंदर दिसत आहे.


प्रियांका लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला


प्रियांकाची ‘सिटाडेल’ ही वेब सीरिज अॅमेझॉन प्राइमवर प्रदर्शित होणार आहे. प्रियांका गेले काही दिवस या सीरिजचे शूटिंग करत आहे. या सीरिजमध्ये ‘गेम ऑफ थ्रोन्स’मधील अभिनेता रिचर्ड मॅडन प्रमुख भूमिका साकारणार आहेत. ही एक सायन्स फिक्शन सीरिज आहे. तसेच, प्रियांका ही ‘जी ले जरा’या चित्रपटामधून देखील लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन फरहान अख्तर करणार आहे.


हेही वाचा :


Priyanka Chopra : प्रियंका चोप्राने पूर्ण केली 'सिटाडेल'ची शूटिंग; देसी गर्लने व्हिडीओ केला शेअर


Priyanka Chopra, Nick Jonas : ‘मालती आणि मालतीचे बाबा’, प्रियांका चोप्राने शेअर केला निक जोनास अन् लेकीचा खास फोटो!