Ranveer Singh Birthday : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता रणवीर सिंह (Ranveer Singh) त्याच्या अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकतो. त्याचा आज  37 वा वाढदिवस आहे. रणवीरचा जन्म एका सिंधी कुटुंबात झाला. रणवीरला बालपणापासूनच अभिनयाची आवड होती. रणवीरनं  एचआर कॉलेजमध्ये कॉमर्सचं शिक्षण घेतलं. कॉलेजमध्ये असतानाच रणवीरनं चित्रपटांसाठी ऑडिशन देण्यास सुरुवात केली. रणवीरनं अभिनय शिकण्यासाठी अॅक्टिंग क्लासमध्ये सहभाग घेतला होता. जाणून घेऊयात रणवीर सिंहबाबत...


अॅड एजन्सीमध्ये केली नोकरी


रणवीर कॉलेज झाल्यानंतर ऑडिशन देत होता पण त्याला काम मिळत नव्हते त्यामुळे त्यानं अॅड एजन्सीमध्ये नोकरी करण्यास सुरुवात केली. अॅड एजन्सीमधील रायटिंगचे काम केले. नंतर रणवीरनं बँड बाजा बारात या चित्रपटासाठी ऑडिशन दिले. आदित्य चोप्राला रणवीरचा अभिनय आवडल्यानं रणवीरचे या चित्रपटासाठी सिलेक्शन झाले. या चित्रपटामधून रणवीरनं बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.  


रणवीरचे सुपरहिट चित्रपट


रामलीला,बाजीराव मस्तानी ,पद्मावत,83 या सुपरहिट चित्रपटांमध्ये रणवीरनं काम केलं. पद्मावत या चित्रपटामध्ये रणवीरनं साकारलेल्या अलाउद्दीन खिलजी या भूमिकेला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. रणवीर त्याच्या डान्सनं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकतो. तसेच रणवीर वेगवेगळ्या अतरंगी स्टाईलमुळे देखील चर्चेत असतो. त्याच्या सोशल मीडियावरील वेगवेगळ्या लूकमधील फोटो नेहमीच नेटकऱ्यांचे लक्ष वेधतात.


12 वर्ष रणवीर अभिनय क्षेत्रात काम करत आहे. त्यानं जवळपास 20 चित्रपटांमध्ये काम केलं आहेत. त्यामधील 16 चित्रपट हे हिट होते. देशातील सर्वात जास्त मानधन घेणाऱ्या अभिनेत्यांपैकी रणवीर हा एक अभिनेता आहे. रणवीर हा जवळपास 223 कोटींचा मालक आहे. त्यानं आत्तापर्यंत 36 पुरस्कार जिंकले आहेत. रणवीरचे सर्कस आणि रानी की प्रेम कहानी हे आगामी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. रणवीरच्या रानी की प्रेम कहानी या चित्रपटामध्ये त्याच्यासोबतच आलिया भट, धर्मेंद्र, शबाना आझमी आणि जया बच्चन हे कलाकार प्रमुख भूमिका साकारणार आहेत. तर रणवीरच्या सर्कस या चित्रपटाचे दिग्दर्शन रोहित शेट्टी करणार आहे. रणवीरच्या आगामी चित्रपटांची वाट त्याचे चाहते उत्सुकतेने बघतात.


हेही वाचा :


Deepika Padukone : 'मी आता विवाहित महिला आहे, नीट बोला'; चाहतीला दीपिकाचं उत्तर