एक्स्प्लोर

Rani Mukerji Mardani 3 : आयपीएस शिवानी रॉय पुन्हा येणार; यशराज फिल्मसकडून 'मर्दानी' च्या तिसऱ्या भागाची घोषणा

Rani Mukerji Mardani 3 : 10 वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या मर्दानी चित्रपटाने आपली छाप सोडली होती. काही वर्षापूर्वी या चित्रपटाचा सिक्वेल प्रदर्शित झाला होता. आता या चित्रपटाचा तिसरा भाग येणार आहे.

Rani Mukerji  Mardani 3 :  सिनेसृष्टीत चित्रपटाच्या केंद्रस्थानी स्त्री व्यक्तीरेखा असलेले काही मोजक्याच चित्रपटांची निर्मिती होत असते. त्यातील काही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर आणि प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडली आहे. 10 वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या 'मर्दानी' (Mardani) चित्रपटाने आपली छाप सोडली होती. काही वर्षापूर्वी या चित्रपटाचा सिक्वेल प्रदर्शित झाला होता. आता या चित्रपटाचा तिसरा भाग (Mardani 3) येणार आहे. मात्र, या सिक्वेल भागाचे नाव अद्याप जाहीर करण्यात आले नाही. 

यशराज फिल्मसची निर्मिती असलेल्या 'मर्दानी' चित्रपटात अभिनेत्री राणी मुखर्जीची (Rani Mukerji) प्रमुख भूमिका होती. या चित्रपटात तिने आयपीएस अधिकारी शिवानी शिवाजी रॉय ही भूमिका साकारली होती. तिने साकारलेल्या डॅशिंग पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेला प्रेक्षकांनी दाद दिली होती.

'मर्दानी'  चित्रपट हा यशराज फिल्मसची स्त्री-प्रधान चित्रपटाची फ्रेंचायझी  आहे. 'मर्दानी' चा पहिला भाग 2014 मध्ये प्रदर्शित झाला आणि 2019 मध्ये या चित्रपटाचा सिक्वल आला. या दोन्ही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर चांगलाच प्रतिसाद मिळाला. या चित्रपटाच्या फ्रेंचायझीचा एक मोठा चाहता वर्ग आहे. 

मर्दानीच्या पहिल्या भागात अल्पवयीन मुलींची तस्करी, यामध्ये सहभागी असलेले राजकारणी यावर प्रकाशझोत टाकण्यात आला होता. तर, दुसऱ्या भागात स्त्रियांच्या स्वातंत्र्यावर बंधने घालणारी वृत्ती, त्यांना नेहमीच पायाची धूळ समजणाऱ्या पुरुषसत्तावादी प्रवृ्त्तींवर भाष्य करण्यात आले होते. आता, 'मर्दानी'च्या तिसऱ्या भागात कोणत्या विषयाला हात 
टाकण्यात येणार, याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे. 

View this post on Instagram
 
A post shared by Yash Raj Films (@yrf)

'मर्दानी'च्या पहिल्या भागाला 10 वर्ष पू्र्ण झाल्याच्या निमित्ताने आज, यशराजने टीझरच्या माध्यमातून चित्रपटाची घोषणा केली. मात्र, या चित्रपटात आणखी कोणते कलाकार असणार, राणी मुखर्जी कोणत्या मोहिमेवर याबाबत 'यशराज फिल्मस'ने कोणतेही भाष्य केले नाही. 

इतर महत्त्वाची बातमी : 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mamata Bannerjee: मी दोन तास वाट पाहिली, मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्यास तयार; ममता बॅनर्जींकडून जनतेची माफी
मी दोन तास वाट पाहिली, मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्यास तयार; ममता बॅनर्जींकडून जनतेची माफी
तृतीयपंथीयांचा धुमधडाक्यात गणपती बाप्पा; भक्तीगीतांसह गणरायाकडे केलीय खास प्रार्थना
तृतीयपंथीयांचा धुमधडाक्यात गणपती बाप्पा; भक्तीगीतांसह गणरायाकडे केलीय खास प्रार्थना
Sanjay Raut: सोलापुरातील जागेवर काँग्रेसनंतर शिवसेनेचाही दावा; संजय राऊतांचा पोलिसांनाही गर्भीत इशारा
सोलापुरातील जागेवर काँग्रेसनंतर शिवसेनेचाही दावा; संजय राऊतांचा पोलिसांनाही गर्भीत इशारा
Ajit Pawar : अजित पवारांचा महायुतीतील मित्र पक्षांना इशारा, म्हणाले; समाजात धार्मिक ध्रुवीकरण करणाऱ्यांवर कारवाई करायला हवी
अजित पवारांचा महायुतीतील मित्र पक्षांना इशारा, म्हणाले; समाजात धार्मिक ध्रुवीकरण करणाऱ्यांवर कारवाई करायला हवी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 8.00 PM : 12 Sep 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सABP Majha Headlines : 7.00 PM : 12 Sep 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सNitesh Rane : मुस्लिमांसबत व्यवहार करायचा नाही, नितेश राणेंचं टोकाचं वक्तव्यSitaram Yechury Demise : सीताराम येचुरी यांचं निधन; दिल्लीतील एम्स रुग्णालयात सुरु होते उपचार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mamata Bannerjee: मी दोन तास वाट पाहिली, मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्यास तयार; ममता बॅनर्जींकडून जनतेची माफी
मी दोन तास वाट पाहिली, मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्यास तयार; ममता बॅनर्जींकडून जनतेची माफी
तृतीयपंथीयांचा धुमधडाक्यात गणपती बाप्पा; भक्तीगीतांसह गणरायाकडे केलीय खास प्रार्थना
तृतीयपंथीयांचा धुमधडाक्यात गणपती बाप्पा; भक्तीगीतांसह गणरायाकडे केलीय खास प्रार्थना
Sanjay Raut: सोलापुरातील जागेवर काँग्रेसनंतर शिवसेनेचाही दावा; संजय राऊतांचा पोलिसांनाही गर्भीत इशारा
सोलापुरातील जागेवर काँग्रेसनंतर शिवसेनेचाही दावा; संजय राऊतांचा पोलिसांनाही गर्भीत इशारा
Ajit Pawar : अजित पवारांचा महायुतीतील मित्र पक्षांना इशारा, म्हणाले; समाजात धार्मिक ध्रुवीकरण करणाऱ्यांवर कारवाई करायला हवी
अजित पवारांचा महायुतीतील मित्र पक्षांना इशारा, म्हणाले; समाजात धार्मिक ध्रुवीकरण करणाऱ्यांवर कारवाई करायला हवी
Ganeshotsav : जय देव जय देव जय मंगलमूर्ती; वर्षा निवासस्थानी क्लॉस श्वाब यांनी सपत्नीक केली बाप्पांची आरती
जय देव जय देव जय मंगलमूर्ती; वर्षा निवासस्थानी क्लॉस श्वाब यांनी सपत्नीक केली बाप्पांची आरती
Sitaram Yechury आयुष्यभर कष्टकऱ्यांसाठी झिजले, मृत्यूनतंरही समाजाच्या कामी आले; सिताराम येचुरींचे 'देहदान'
आयुष्यभर कष्टकऱ्यांसाठी झिजले, मृत्यूनतंरही समाजाच्या कामी आले; सिताराम येचुरींचे 'देहदान'
पगारवाढ 2020 नाही, तर 2024 पासून मिळणार, एसटी कामगारांना फसवलं; श्रीरंग बरगेंकडून संताप
पगारवाढ 2020 नाही, तर 2024 पासून मिळणार, एसटी कामगारांना फसवलं; श्रीरंग बरगेंकडून संताप
निरोप कॉम्रेड...  कामगार, शेतकऱ्यांचा आवाज हरपला; येचुरींच्या निधनानंतर शरद पवार, राहुल गांधींकडून शोक
निरोप कॉम्रेड... कामगार, शेतकऱ्यांचा आवाज हरपला; येचुरींच्या निधनानंतर शरद पवार, राहुल गांधींकडून शोक
Embed widget