Ranbir Kapoor : 'शाहरुखप्रमाणे पंतप्रधान मोदींचा स्वभावही मनमिळावू', रणबीर कपूरने सांगितला भेटीचा किस्सा
Ranbir Kapoor on PM Modi: रणबीर कपूरने नुकतच एका मुलाखतीदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीचा किस्सा सांगितला आहे.
Ranbir Kapoor on PM Modi: अनेक सिनेमांमधून रणबीर कपूर (Ranbir Kapoor) याने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. त्याच्या अभिनयाचेही लाखो चाहते आहेत. अनेक मोठ्या कार्यक्रमांमध्ये रणबीरच्या उपस्थितीने साऱ्यांच लक्ष वेधून घेतो. नुकतच त्याने निखिल कामतच्या पॉडकास्टमध्ये त्याच्या आयुष्यातील अनेक घटनांचा खुलासा केला आहे. त्याचप्रमाणे रणबीरने पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्यासोबतच्या भेटीचा किस्सा देखील यावेळी शेअर केला आहे.
रणबीरने 2019 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. याच भेटीचा उल्लेख त्याने केला आहे. त्याचप्रमाणे पंतप्रधान मोदी यांचं कौतुक करतानाही रणबीर दिसला. त्याचप्रमाणे यावेळी रणबीरने पंतप्रधान मोदी आणि शाहरुख यांच्यातलं साम्यही सांगतिलं असून त्यांची तुलना केली.
रणबीरने केलं पंतप्रधान मोदींचं कौतुक
रणबीरने पंतप्रधान मोदी यांचं कौतुक करताना म्हटलं की, त्यांचा अंदाज एक वेगळाच आहे. त्यांना प्रत्येकाला भेटण्याची इच्छा ही दिसली होती आणि एका महान व्यक्तिमत्त्वाची ही ओळख असते, त्यासाठी त्यांना वेगळे काही प्रयत्न करावे लागत नाही. पण तरीही ते प्रयत्न हे लोक करतात, जसं शाहरुख खान.
'माझ्या वडिलांविषयी त्यांनी चौकशी केली'
निखिल कामथच्या युट्युब चॅनलवर पीपल बाय डब्ल्यूटीएफमध्ये अनेक गोष्टींवर भाष्ये केलं आहे. याचवेळी रणबीरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबतच्या भेटीचा किस्सा विचारण्यात आला. यावेळी बोलताना रणबीरने म्हटलं की, पंतप्रधान मोदी यांच्याकडे एक मॅग्नेटिक चार्म आहे. मी राजकारणाविषयी फार विचार करत नाही. पण मला एक गोष्ट आठवते की, 4 ते 5 वर्षांपूर्वी आम्ही बरेचजण पंतप्रधान मोदी यांच्या भेटीसाठी गेलो होतो.
पुढे रणबीरने म्हटलं की, आम्ही सगळे जण बसलो होतो आणि पंतप्रधान मोदी तिथे आले. त्यांनी तिथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाशी अत्यंत जवळून आणि वैयक्तिक संवाद साधला. माझे वडील ऋषी कपूर यांच्यावर तेव्हा उपचार सुरु होते. तेव्हा त्यांनी माझ्या जवळ येऊन माझ्या वडिलांच्या प्रकृतीविषयी विचारलं. त्याविषयी चौकशी केली. विकीला त्यांनी काही प्रश्न विचारले, आलिया, करणलाही त्यांनी प्रश्न विचारले.