Ranbir Kapoor Alia Bhatt Visit Ujjain : महाकालच्या दर्शनाला आडकाठी, आलिया-रणबीरविरोधात हिंदुत्ववादी संघटनेची निदर्शनं
आलिया, रणबीर आणि दिग्दर्शक अयान मुखर्जी हे मंगळवारी (6 सप्टेंबर) उज्जैनमध्ये महाकालचं दर्शन घेण्यासाठी गेले होते.
Ranbir Kapoor Alia Bhatt Visit Ujjain : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) यांचा ब्रह्मास्त्र (Brahmastra) हा चित्रपट 9 सप्टेंबर रोजी रिलीज होणार आहे. सध्या या रणबीर आणि आलिया या चित्रपटाचं प्रमोशन करत आहेत. आलिया, रणबीर आणि दिग्दर्शक अयान मुखर्जी हे मंगळवारी (6 सप्टेंबर) उज्जैनमध्ये महाकालचं दर्शन घेण्यासाठी गेले होते. यावेळी हिंदू संघटनांच्या विरोधामुळे महाकालचं दर्शन न घेताच ब्रह्मास्त्रच्या टीमला माघारी परतावं लागलं. ब्रह्मास्त्र सिनेमातील काही दृश्यांवर हिंदुत्ववादी संघटनांचा आक्षेप आहे. त्यामुळे त्यांनी ब्रह्मास्त्र चित्रपटाच्या टीमचा विरोध केला.
"मला गोमांस खायला आवडतं" या जुन्या वक्तव्यामुळे रणबीर सध्या चर्चेत आहे. त्याच्या या वक्तव्याचा उजैनमध्ये हिंदुत्ववादी संघटनेनं विरोध केला. हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांचा आणि काही नेते अजूनही या चित्रपटाचा विरोध करत आहेत.
ब्रह्मास्त्रची तगडी स्टार कास्ट
रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्यासोबतच ब्रह्मास्त्र या चित्रपटामध्ये शाहरुख खान, मौनी रॉय, नागार्जुन, अमिताभ बच्चन हे कलाकार महत्त्वाची भूमिका साकारणार आहे. तसेच शाहरुख खान देखील या चित्रपटामध्ये कॅमियो भूमिका, साकारताना दिसणार आहे, असं म्हटलं जात आहे.
400 कोटींच बजेट
हा चित्रपट 410 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनवण्यात आला आहे. चित्रपटाच्या रिलीजसाठी अजून तीन दिवस बाकी आहेत हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तब्बल 20 कोटींची दमदार ओपनिंग करू शकेल, असा अंदाज वर्तवला जात आहे. या चित्रपटात आलिया आणि रणबीर यांची जोडी बघण्यास प्रेक्षक उत्सुक आहेत.
बॉयकॉट ट्रेंडचा होणार परिणाम?
एक व्हिडीओ गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओतील रणबीरचं वक्तव्य पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. "मला गोमांस खायला आवडतं", असं रणबीर या व्हिडीओमध्ये म्हणत आहे. त्यामुळे "आम्ही गोमांस खाणाऱ्या कलाकाराला प्रोत्साहन देत नाही", 'ब्रम्हास्त्र' सिनेमाला बॉयकॉट करा अशा कमेंट्स नेटकरी करत आहेत. तसेच या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये दिसत आहे की रणबीर हा पळत येतो आणि मंदिराची घंटा वाजवतो. यामध्ये रणबीर हा चप्पल घालून मंदिराची घंटा वाजवताना दिसतोय. त्यामुळे आता अनेक नेटकरी या चित्रपटाला ट्रोल करत आहेत. तसेच त्यावेळी नेटकऱ्यांनी हा चित्रपट बॉयकॉट करण्याची मागणी केली. या ट्रेंडचा परिणाम चित्रपटावर होईल का? या प्रश्नाचं उत्तर लवकरच रणबीर आणि आलिच्या चाहत्यांना मिळेल.
वाचा इतर महत्त्वाची बातमी: