Ranbir Kapoor - Alia Bhatt येत्या डिसेंबरमध्ये अडकणार लग्नबंधनात? आलियाची आई म्हणाली...
रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि आलिया भट्ट (Alia Bhatt) येत्या डिसेंबरमध्ये लग्न करणार आहेत. त्या चर्चांवर आलियाच्या आईने उत्तर दिले आहे.
Soni Razdan on Ranbir Kapoor and Alia Bhatt Marriage News : बॉलिवूडमधील सगळ्यांचे लाडके कपल रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि आलिया भट्ट (Alia Bhatt) लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. अनेकदा त्यांच्या प्रेमाबद्दल चर्चा होताना दिसून येते. त्यामुळेच त्यांच्या चाहत्यांना त्यांच्या लग्नाची उत्सुकता लागली आहे. रणबीर कपूर आणि आलिया भट्ट येत्या डिसेंबरमध्ये लग्नबंधनात अडकतील. त्यांनी लग्नाची तयारीदेखील सुरु आहे. शूटिंगच्या तारखादेखील दोघांनी पुढे ढकलल्या आहेत. अशा अनेक चर्चा सध्या चाहत्यांमध्ये होत होत्या. दरम्यान त्यासंदर्भातच आलिया भट्टची आई सोनी राजदान (Soni Razdan) यांनी माहिती दिली आहे.
लग्नासंदर्भात सोनी राजदान म्हणाल्या...
रणबीर कपूर आणि आलिया भट्टचे डिसेंबरमध्ये लग्न होणार आहे अशा चर्चांना उधाण आल्याने आलियाच्या आईने त्यासंदर्भात माहिती दिली आहे. सोनी राजदान म्हणाल्या,"आलिया भट्ट आणि रणबीर कपूरच्या लग्नासाठी मीदेखील उत्सुक आहे. पण त्याला बराच वेळ आहे. भविष्यात दोघांचे लग्न होणारच आहे. पण अजून लग्नाची तारिख ठरलेली नाही".
Ranbir kapoor-Alia Bhatt : रणबीर-आलियाच्या संसाराबाबत अभिनेत्याचं भाकित; म्हणाला, लग्नानंतर 15 वर्षांनी होणार घटस्फोट
तीन वर्षांपासून रणबीर-आलिया एकत्र
रणबीर आणि आलियाची जोडी मागील तीन वर्षांपासून एकत्र आहे. रणबीर कपूरच्या वाढदिवशी त्यांनी त्यांच्या प्रेमाची अधिकृतरित्या कबुली दिली आहे. रणबीरच्या वाढदिवसाचे आलिया आणि रणबीरचे फोटोदेखील चाहत्यांच्या पसंतीस पडले होते. दोघे यार्षात लग्न करतील अशा चर्चा मागील अनेक दिवसांपासून होत होत्या. पण अजून कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. पण आता ते डिसेंबरमध्ये लग्न करतील अशा चर्चा होत होत्या. त्यांनी आगामी प्रोजेक्टचे शूटिंगदेखील पुढे ढकलले आहे.
संबधित बातम्या :