एक्स्प्लोर

गुरमेहर प्रकरणात आता बॉलिवूडकरांची उडी

मुंबई: कारगिल युद्धातील शहीद जवानाची मुलगी गुरमेहर कौरला बलात्काराच्या धमकी प्रकरणी दिल्ली पोलिसांनी तक्रार दाखल केली असून याची चौकशी सुरु केली आहे. पण या संपूर्ण प्रकरणावरुन जोरदार वादळ उठलं आहे. त्यात आता बॉलिवूडकरांनी देखील उडी घेतली आहे. या प्रकरणी जावेद अख्तर आणि अनुपम खेर यांनीही या वादात उडी घेतली आहे. ट्विटरवरुन या दोघांनीही याप्रकरणी  आपली मतं मांडली आहेत. अनुपम खेर म्हणाले की, 'असहिष्णु गँग परत आली आहे, चेहरे तेच आहेत फक्त घोषणा बदलल्या आहेत.'   फक्त अनुपम खेरच नाही तर गीतकार जावेद अख्तर यांनीही याप्रकरणी ट्वीट केलं आहे. जावेद अख्तर यांनी गुरमेहरवर टीका करणाऱ्या पैलवान बबिता फोगाट आणि योगेश्वर दत्त यांचं नाव न घेता त्यांच्यावर निशाणा साधला. जावेद अख्तर यांनी ट्विट केलं, 'काही कमी शिकलेले खेळाडू आणि पैलवान शहीदाच्या मुलीला ट्रॉल करु शकतात हे मी समजू शकतो. पण काही शिकल्या-सवरलेल्या लोकांना काय झालं आहे?' जावेद अख्तर यांच्या ट्विटनंतर त्यांना अनेकांनी ट्विटरवरुन उत्तर दिलं. जावेद अख्तर यांच्या ट्विटला उत्तर देताना बबिता फोगाट म्हणाली की, 'शाळेत जाण्याच्या आधीपासून मी 'भारत माता की जय' बोलते आहे, देशभक्ती पुस्तकातून येत नाही.'   जावेद अख्तर यांच्या ट्विटवर दिग्दर्शक मधुर भंडारकरनंही ट्विट केलं आहे. 'अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि अशिक्षित याचं काहीही देणघेणं नाही. मी एक सहावी नापास विद्यार्थी आहे. पण तरीही माझं मत मांडण्यापासून मला कोणीही रोखू शकत नाही.' काय आहे प्रकरण? सोशल मीडियावरून कथितपणे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (एबीव्हीपी) सदस्यांकडून बलात्काराच्या धमक्या येत असल्याची तक्रार गुरमेहर कौर हिने दिल्ली महिला आयोगाकडे केली होती. गुरमेहर कारगिल युद्धातील शहीज जवान मनदीप सिंह यांची मुलगी आहे. दिल्लीच्या रामजस कॉलेजमधील हिंसाचारानंतर गुरमेहरने त्याविरोधात आवाज उठवला होता. मात्र यानंतर आपल्याला अभाविपकडून बलात्काराची धमकी मिळाली, पण मी अभाविपला घाबरत नाही, असा फलक हाती घेतलेला फोटो गुरमेहरने फेसबुकवर टाकला होता. गुरमेहरचे वडिल कारगिल युद्धात शहीद झाले होते. त्यामुळे आपल्या वडिलांना पाकिस्तानने नाही, तर युद्धाने मारलं, असं वक्तव्य गुरमेहरने केलं होतं. या वक्तव्यावरुनही वाद निर्माण झाला. वादात राहुल गांधींची उडी गुरमेहर कौरला दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासह अनेकांनी पाठिंबा दिला आहे. त्यातच आता काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींनीही गुरमेहरला पाठिंबा दिला आहे. भीती आणि छळाच्या विरोधात आम्ही विद्यार्थ्यांसोबत आहोत. असहिष्णुता, राग आणि अज्ञानतोविरोधात प्रत्येक ठिकाणी एक गुरमेहर उभी राहील, असं ट्वीट राहुल गांधींनी केलं आहे. संबंधित बातम्या:
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Foreignchi Patlin: नऊवारी सोडली अन् अभिनेत्री गावभर फिरू लागली; 'फॉरेनच्या पाटलीण'चं वागणं पाहून सगळेच चक्रावले
नऊवारी सोडली अन् अभिनेत्री गावभर फिरू लागली; 'फॉरेनच्या पाटलीण'चं वागणं पाहून सगळेच चक्रावले
Mitali Sharma: ग्लॅमरच्या दुनियेतून थेट रस्त्यावर; प्रसिद्ध अभिनेत्रीवर भीक मागण्याची वेळ, बिकट अवस्था पाहून चाहत्यांनाही प्रश्न
ग्लॅमरच्या दुनियेतून थेट रस्त्यावर; प्रसिद्ध अभिनेत्रीवर भीक मागण्याची वेळ, बिकट अवस्था पाहून चाहत्यांनाही प्रश्न
Drishyam 3: सस्पेन्सचा बादशाह ठरला 'दृश्यम 3'; विकेंडला पुन्हा उसळी, 10 दिवसांत कमावले 'इतके' कोटी
सस्पेन्सचा बादशाह ठरला 'दृश्यम 3'; विकेंडला पुन्हा उसळी, 10 दिवसांत कमावले 'इतके' कोटी
Deool Band 2: बॉक्स ऑफिसवर 'देऊळ बंद 2'चा दबदबा; दुसऱ्या शनिवारी घेतली मोठी झेप, कमाई ऐकून थक्क व्हाल
बॉक्स ऑफिसवर 'देऊळ बंद 2'चा दबदबा; दुसऱ्या शनिवारी घेतली मोठी झेप, कमाई ऐकून थक्क व्हाल

व्हिडीओ

Rajasthan Dust Storm : राजस्थानात धुळीच्या वादळाचा कहर! अचानक कसं घोंघावलं संकट? | ABP Majha
Hinjawadi IT Company Shock : रातोरात कंपनी बंद, 700 फ्रेशर इंजिनिअर्स बेरोजगार? | ABP Majha
Mahayuti Seat Sharing Special Report:विधानपरिषदेत भाजपनं दाखवलं मोठं मन, मित्रपक्षांना दिल्या 6 जागा
Manoj Jarange Protest Special Report : जरांगेंचे उपोषण मागे; पुन्हा पेटणार ओबीसी विरुद्ध मराठा वाद?
Dattatray Bharne on Karjamafi : पुढच्या 10 दिवसांत शेतकऱ्यांना कर्जमाफी;

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Beed : धनंजय देशमुखांविरोधातील जीवे मारण्याची तक्रार खोटी निघाली, समाधान खिंडकरचा बनाव समोर
धनंजय देशमुखांविरोधातील जीवे मारण्याची तक्रार खोटी निघाली, समाधान खिंडकरचा बनाव समोर
Kagiso Rabada: आरसीबीच्या भुवनेश्वर कुमारला मागे टाकत गुजरातच्या कागिसो रबाडाने ऑरेंज कॅप खेचली
आरसीबीच्या भुवनेश्वर कुमारला मागे टाकत गुजरातच्या कागिसो रबाडाने ऑरेंज कॅप खेचली
Vaibhav Sooryavanshi: गिल अन् साई सुदर्शनला स्वस्तात घरचा रस्ता दाखवत हेझलवुड-भुवनेश्वरने बेबी बाॅसची 'ऑरेंज कॅप' पक्की करून टाकली!
गिल अन् साई सुदर्शनला स्वस्तात घरचा रस्ता दाखवत हेझलवुड-भुवनेश्वरने बेबी बाॅसची 'ऑरेंज कॅप' पक्की करून टाकली!
Virat Kohli Video: नशीबवान हेझलवुडने गिलचा गेम करताच कोहलीचं 'विराट' स्टाईलमध्ये जबरा सेलिब्रेशन अन् अनुष्का शर्माची सुद्धा स्माईल!
Video: नशीबवान हेझलवुडने गिलचा गेम करताच कोहलीचं 'विराट' स्टाईलमध्ये जबरा सेलिब्रेशन अन् अनुष्का शर्माची सुद्धा स्माईल!
मराठवाड्यासह विविध जिल्ह्यात पावसाची हजेरी; कुठे गारा, कुठे वादळवारा, उकाड्यापासून नागरिकांना सुटका
मराठवाड्यासह विविध जिल्ह्यात पावसाची हजेरी; कुठे गारा, कुठे वादळवारा, उकाड्यापासून नागरिकांना सुटका
Josh Hazlewood: फायनलमध्ये गुजराती कॅप्टन गिलचा गेम केलाच, पण नशीब असावं तर जोश हेझलवुडसारखं! आयपीएलच्या इतिहासात असा मान कोणालाच मिळाला नाही!
Josh Hazlewood Video: फायनलमध्ये गुजराती कॅप्टन गिलचा गेम केलाच, पण नशीब असावं तर जोश हेझलवुडसारखं! आयपीएलच्या इतिहासात असा मान कोणालाच मिळाला नाही!
Video: दक्षिण दिल्लीत 5 मजली इमारत कोसळून आतापर्यंत 6 जणांचा मृत्यू; ढिगाऱ्यात गाडलेल्या 12 वैद्यकीय विद्यार्थ्यांना बाहेर काढलं, दोघांची प्रकृती गंभीर
Video: दक्षिण दिल्लीत 5 मजली इमारत कोसळून आतापर्यंत 6 जणांचा मृत्यू; ढिगाऱ्यात गाडलेल्या 12 वैद्यकीय विद्यार्थ्यांना बाहेर काढलं, दोघांची प्रकृती गंभीर
साताऱ्यात 5 किलो गांजा तर नागपुरात 7 किलो ड्रग्ज जप्त; गुन्हे शाखेची मोठी कारवाई, ड्रग्सची बाजारात किंमत किती?
साताऱ्यात 5 किलो गांजा तर नागपुरात 7 किलो ड्रग्ज जप्त; गुन्हे शाखेची मोठी कारवाई, ड्रग्सची बाजारात किंमत किती?
Embed widget