एक्स्प्लोर

Ram Setu : प्रदर्शनाआधीच ‘रामसेतू’ मोठ्या वादात, सुब्रमण्यम स्वामींकडून अक्षय कुमारसह 8 जणांना कायदेशीर नोटीस!

Ram Setu Controversy : बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारचा (Akshay Kumar) अगामी चित्रपट ‘राम सेतू’ (Ram Setu) भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी (Subramanian Swamy) यांच्या निशाण्यावर आहे.

Ram Setu Controversy : बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारचा (Akshay Kumar) अगामी चित्रपट ‘राम सेतू’ (Ram Setu) भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी (Subramanian Swamy) यांच्या निशाण्यावर आहे. या चित्रपटात चुकीची माहिती देत चित्रण केल्याचा आरोप करत सुब्रमण्यम स्वामी यांनी अक्षय कुमारसह (Akshay Kumar) 8 जणांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे. सुब्रमण्यम स्वामी यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे. या चित्रपटात केलेल्या चित्रणामुळे रामसेतू्च्या प्रतिमेला धक्का लागला आहे, असा दावा सुब्रमण्यम स्वामी यांनी केला आहे.

अक्षय कुमारच्या आगामी 'राम सेतू' चित्रपटाच्या संपूर्ण टीमला तथ्यांशी छेडछाड केल्याप्रकरणी कायदेशीर नोटीस पाठवण्यात आली आहे. भाजप नेते आणि माजी राज्यसभा खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी ट्विट करत सांगितले की, ‘अक्षय कुमार (Akshay Kumar), जॅकलिन फर्नांडिस (Jacqueline Fernandez) आणि नुसरत भरुचा (Nushrratt Bharuccha)  यांच्यासह एकूण 8 जणांना कायदेशीर नोटीस पाठवण्यात आली आहे.’

पाहा पोस्ट :

सुब्रमण्यम स्वामी यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले की, 'मुंबई चित्रपटसृष्टीतील लोकांना खोट्या आणि चुकीच्या गोष्टी दाखवण्याची सवय झाली आहे. त्यामुळे त्यांना इंटलॅक्चुअल प्रॉपर्टी राईट्सबद्दल माहिती देण्यासाठी मी अक्षय कुमार आणि रामसेतूशी संबंधित 8 लोकांना वकील सत्य सबरवाल यांच्यामार्फत कायदेशीर नोटीस पाठवली आहे.

या आधीही केले होते ट्विट

या आधीही त्यांनी ट्विट केले की, 'मी अभिनेता अक्षय कुमार आणि त्याच्या कर्मा मीडियावर गुन्हा दाखल करणार आहे. त्यांनी त्यांच्या आगामी राम सेतू (Ram Setu) या चित्रपटात रामसेतूचे चित्रण चुकीच्या पद्धतीने दाखवण्यात आले आहे. अक्षय कुमारच्या चित्रपटामुळे रामसेतूची प्रतिमा खराब झाली आहे.’

चित्रपट दिवाळीत होणार प्रदर्शित

अक्षय कुमारसोबत ‘राम सेतू’ या चित्रपटात अभिनेत्री नुसरत भरुचा (Nushrratt Bharuccha) आणि जॅकलिन फर्नांडिस (Jacqueline Fernandez) मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. ‘राम सेतू’मध्ये अक्षय कुमार आणि जॅकलिन फर्नांडिससोबत अभिनेता सत्यदेव कंचरण देखील दिसणार आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शित झालेल्या पोस्टरमध्ये तिघेही एका भव्य कलाकृतीसमोर उभे आहेत आणि कशाचातरी शोध घेत आहेत. यावेळी अक्षयच्या हातात मशाल दिसत आहे, तर जॅकलिनच्या हातात टॉर्च धरलेली दिसत आहे. 'राम सेतू' हा चित्रपट अभिषेक शर्मा यांनी दिग्दर्शित केला आहे. चित्रीकरण पूर्ण झाल्याने आता चित्रपटाच्या पोस्ट प्रॉडक्शनचे काम सुरू झाले आहे. अक्षय कुमारचा हा चित्रपट यंदाच्या दिवाळीत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

संबंधित बातम्या

Ram Setu New Poster : घरबसल्या पाहता येणार अक्षयचा ‘राम सेतू’, थिएटरसोबतच ‘या’ ओटीटीवर रिलीज होणार चित्रपट!

Ram Setu Bridge: 'रामसेतू'ला मिळावा ऐतिहासिक वास्तूचा दर्जा, सुब्रमण्यम स्वामींच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात 9 मार्चला सुनावणी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

हिंसाचाराची दाहकता! अज्ञात माथेफिरूने भिरकावलेला 'तो' एक दगड; कर्तव्यदक्ष DCPला अंथरुणाला खिळून राहण्यासाठी मजबूर करून गेला
हिंसाचाराची दाहकता! अज्ञात माथेफिरूने भिरकावलेला 'तो' एक दगड; कर्तव्यदक्ष DCPला अंथरुणाला खिळून राहण्यासाठी मजबूर करून गेला
कृष्णा आंधळे 98 दिवसांपासून फरार, लवकरात लवकर पकडून जेरबंद करा, त्याच्याकडे महत्वाचे पुरावे : धनंजय देशमुख   
कृष्णा आंधळे 98 दिवसांपासून फरार, लवकरात लवकर पकडून जेरबंद करा, त्याच्याकडे महत्वाचे पुरावे : धनंजय देशमुख   
नागपूरच्या घटनेला काँग्रेसच जबाबदार; हर्षवर्धन सपकाळांचे नाव घेत रावसाहेब दानवेंचा वेगळाच दावा
नागपूरच्या घटनेला काँग्रेसच जबाबदार; हर्षवर्धन सपकाळांचे नाव घेत रावसाहेब दानवेंचा वेगळाच दावा
राज ठाकरेंच्या बैठकीतील इनसाईड स्टोरी; 23 मार्चला पक्षाची नवी रचना, औरंगजेब अन् छावावरही पदाधिकाऱ्यांना सूचना
राज ठाकरेंच्या बैठकीतील इनसाईड स्टोरी; 23 मार्चला पक्षाची नवी रचना, औरंगजेब अन् छावावरही पदाधिकाऱ्यांना सूचना
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 8 AM TOP Headlines 8AM 19 March 2025 सकाळी ८ च्या हेडलाईन्सNagpur Update | नागपुरातील हिंसारग्रस्त परिसर वगळता नागपुरातील जनजीवन सामान्य,वाहतूक सेवा नियमितपणे सुरुSunita Williams & Butch Wilmore returns : अखेर ९ महिन्यांनंतर सुनीता विल्यम्स पृथ्वीवर परतल्या100 Headlines | 100 हेडलाईन्स बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर ABP Majha : 19 March 2025 7 AM

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
हिंसाचाराची दाहकता! अज्ञात माथेफिरूने भिरकावलेला 'तो' एक दगड; कर्तव्यदक्ष DCPला अंथरुणाला खिळून राहण्यासाठी मजबूर करून गेला
हिंसाचाराची दाहकता! अज्ञात माथेफिरूने भिरकावलेला 'तो' एक दगड; कर्तव्यदक्ष DCPला अंथरुणाला खिळून राहण्यासाठी मजबूर करून गेला
कृष्णा आंधळे 98 दिवसांपासून फरार, लवकरात लवकर पकडून जेरबंद करा, त्याच्याकडे महत्वाचे पुरावे : धनंजय देशमुख   
कृष्णा आंधळे 98 दिवसांपासून फरार, लवकरात लवकर पकडून जेरबंद करा, त्याच्याकडे महत्वाचे पुरावे : धनंजय देशमुख   
नागपूरच्या घटनेला काँग्रेसच जबाबदार; हर्षवर्धन सपकाळांचे नाव घेत रावसाहेब दानवेंचा वेगळाच दावा
नागपूरच्या घटनेला काँग्रेसच जबाबदार; हर्षवर्धन सपकाळांचे नाव घेत रावसाहेब दानवेंचा वेगळाच दावा
राज ठाकरेंच्या बैठकीतील इनसाईड स्टोरी; 23 मार्चला पक्षाची नवी रचना, औरंगजेब अन् छावावरही पदाधिकाऱ्यांना सूचना
राज ठाकरेंच्या बैठकीतील इनसाईड स्टोरी; 23 मार्चला पक्षाची नवी रचना, औरंगजेब अन् छावावरही पदाधिकाऱ्यांना सूचना
स्वार्थासाठी कुठल्याही थराला जाणारी ही राजकारणातील कीड, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल, म्हणाले राज्यात द्वेष पसरवणारे हेच 
स्वार्थासाठी कुठल्याही थराला जाणारी ही राजकारणातील कीड, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल, म्हणाले राज्यात द्वेष पसरवणारे हेच 
सुटकेसमध्ये महिलेचं मुंडकं, गोणीतील धड शोधलं; मांडवी पोलिसांनी उलगडला हत्याकांडाचं गुढ, नवऱ्याला अटक
सुटकेसमध्ये महिलेचं मुंडकं, गोणीतील धड शोधलं; मांडवी पोलिसांनी उलगडला हत्याकांडाचं गुढ, नवऱ्याला अटक
नागपूर, संभाजीनगरमध्ये अधिकारी बदलले; राज्यात 6 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, आंचल गोयल मुंबईच्या जिल्हाधिकारी
नागपूर, संभाजीनगरमध्ये अधिकारी बदलले; राज्यात 6 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, आंचल गोयल मुंबईच्या जिल्हाधिकारी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 मार्च 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 मार्च 2025 | मंगळवार
Embed widget