एक्स्प्लोर

Ram Gopal Varma : दिग्दर्शक रामगोपाल वर्माची राजकारणात एन्ट्री; दाक्षिणात्य सुपरस्टारला निवडणुकीच्या रिंगणात देणार आव्हान

Ram Gopal Varma : दिग्दर्शक रामगोपाल वर्मा यांनी आता राजकारणात प्रवेश करण्याची घोषणा केली आहे. पिठापुरम मतदारसंघातून त्यांनी निवडणूक लढवण्याचा जाहीर केला आहे.

Ram Gopal Varma :   बॉलिवूडमध्ये वेगवेगळ्या धाटणीचे चित्रपट देणारे दिग्दर्शक रामगोपाल वर्मा (Ram Gopal Varma ) यांनी आता राजकारणात प्रवेश करण्याची घोषणा केली आहे. आंध्र प्रदेशमधील पिठापुरम (Pithapuram ) मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा निर्णय रामगोपाल वर्मा यांनी जाहीर केला आहे. या मतदारसंघात त्यांचा सामना दाक्षिणात्य सुपरस्टार पवन कल्याण यांच्याशी होणार आहे. पवन कल्याण यांचा जनसेना नावाचा पक्ष  आहे. आता रामगोपाल वर्मा यांनी याच मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा निर्णय जाहीर केल्याने रंगतदार लढत होईल असे म्हटले जात आहे. 

पवन कल्याण यांना आव्हान

तेलुगू देसम पक्ष (टीडीपी), भाजपा आणि जनसेना पक्ष (जेएसपी) यांच्या युतीने तेलुगू चित्रपट स्टार पवन कल्याण यांना उमेदवारी दिली आहे. पिठापुरम हा विधानसभा मतदारसंघ आहे. ते काकीनाडा लोकसभेत येते. राज्यात सध्या वायएसआर काँग्रेसचे सरकार सत्तेवर आहे. तर, दुसरीकडे मुख्य विरोधी पक्ष तेलगु देसमने पुन्हा एकदा भाजपसोबत युती करत एनडीएमध्ये प्रवेश केला आहे. तर, दुसरीकडे रामगोपाल वर्मा यांनी राजकारणात प्रवेश करण्याची घोषणा केली. वर्मा यांनी कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढवणार याची माहिती दिली नाही. मात्र, रामगोपाल वर्मा हे  वायएसआर काँग्रेसकडून निवडणूक लढवण्याची दाट शक्यता असल्याची चर्चा आहे. 

भाजप-टीडीपी-जनसेना पक्षाची युती

आंध्र प्रदेशात लोकसभेसोबतच विधानसभेच्याही निवडणुका होत आहेत. लोकसभा निवडणुकीत आंध्र प्रदेशात भाजप सहा जागांवर, टीडीपी 17 जागांवर आणि जेएसपी दोन जागांवर लढणार आहे. राज्याच्या विधानसभा निवडणुकीत भाजप पक्ष 10 जागांवर, टीडीपी 144 जागांवर आणि जेएसपी 21 जागांवर लढणार आहे. राज्यातील सत्ताधारी वायएसआर काँग्रेसने एकट्याने लढण्याची घोषणा केली आहे. आंध्रमध्ये पक्षाचे पुनरुज्जीवन करण्याची जबाबदारी काँग्रेसने वायएस शर्मिला यांच्याकडे सोपवली आहे. शर्मिला या वायएसआर काँग्रेसचे अध्यक्ष आणि मुख्यमंत्री जगन रेड्डी यांच्या बहीण आहेत. 

श्रीकांत भोसले
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Matka King: सिद्धार्थ जाधवची नागराज मंजुळेंसाठी खास पोस्ट, भावुक होत म्हणाला, माझ्या आयुष्यातली पहिली वेब सिरीज...
सिद्धार्थ जाधवची नागराज मंजुळेंसाठी खास पोस्ट, भावुक होत म्हणाला, माझ्या आयुष्यातली पहिली वेब सिरीज...
Patralekha: आई झाल्यानंतर अभिनेत्रीचं वाढलं वजन, बॉडी शेमिंगमुळे ट्रोल; Actress ने दिलं सडेतोड उत्तर, म्हणाली..
आई झाल्यानंतर अभिनेत्रीचं वाढलं वजन, बॉडी शेमिंगमुळे ट्रोल; Actress ने दिलं सडेतोड उत्तर, म्हणाली..
Actress Divorce: अभिनेत्री हंसिकानं 4 वर्षांच्या संसाराला दिला पूर्णविराम; काडीमोड घेण्यामागचं कारण काय? म्हणाली, 'मला पश्चाताप...'
अभिनेत्री हंसिकानं 4 वर्षांच्या संसाराला दिला पूर्णविराम; काडीमोड घेण्यामागचं कारण काय? म्हणाली, 'मला पश्चाताप...'
Godfather Fame Actor Al Pacino Life Story: 85 वर्षांचा सुपरस्टार, 32 वर्षांची गर्लफ्रेंड अन् दोन वर्षांचा मुलगा; सिनेसृष्टीच्या 'गॉडफादर'चे अफेअर्सही सतराशे साठ, ओळखलं का कोण?
85 वर्षांचा सुपरस्टार, 32 वर्षांची गर्लफ्रेंड अन् दोन वर्षांचा मुलगा; सिनेसृष्टीच्या 'गॉडफादर'चे अफेअर्सही सतराशे साठ, ओळखलं का कोण?

व्हिडीओ

Nashik TCS Case Special Report : कॉर्पोरेट जिहाद प्रकरण, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय कनेक्शन?
Navneet Rana Vs Pyare Khan Special Report : अमरावती परतवाडा प्रकरण, राणा विरुद्ध खान वाद पेटला
Amravati Crime Special Report : विकृतीची परिसीमा गाठणारी पैज, परतवाडा प्रकरणात धक्कादायक खुलासे
Walmik Karad : देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल
Ashok Kharat : खरातचे निकटवर्तीय जितेंद्र शेळकेंचं अपघाती निधन, समृद्धी महामार्गावर कारचा भीषण अपघात

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
महिला आरक्षण घटनादुरुस्ती विधेयक नामंजूर; CM फडणवीस म्हणाले, उद्यापासून आम्ही रस्त्यावर उतरू, एकनाथ शिंदेंचाही हल्लाबोल
महिला आरक्षण घटनादुरुस्ती विधेयक नामंजूर; CM फडणवीस म्हणाले, उद्यापासून आम्ही रस्त्यावर उतरू, एकनाथ शिंदेंचाही हल्लाबोल
Video: धर्माच्या आधारे आम्ही आरक्षण देणार नाही, कोणाला देऊ पण देणार नाही; अमित शाहांनी लोकसभेत मांडली भूमिका
Video: धर्माच्या आधारे आम्ही आरक्षण देणार नाही, कोणाला देऊ पण देणार नाही; अमित शाहांची लोकसभेत मांडली भूमिका
Amit Shah : महिला आरक्षण विधेयक नामंजूर होताच अमित शाहांची पोस्ट, 2029 चा उल्लेख करत विरोधकांना इशारा, पोस्ट करत पहिली प्रतिक्रिया
महिला आरक्षण विधेयक नामंजूर होताच अमित शाहांची पोस्ट, 2029 चा उल्लेख करत विरोधकांना इशारा
मोठी बातमी! जळगावमध्ये लाचखोर पोलिसावर थेट बडतर्फची कारवाई; एसपी महेश्वरींच्या कारवाईने प्रशासनात खळबळ
मोठी बातमी! जळगावमध्ये लाचखोर पोलिसावर थेट बडतर्फची कारवाई; एसपी महेश्वरींच्या कारवाईने प्रशासनात खळबळ
Rahul Gandhi : संविधानावरील हल्ला, संविधानावरील आक्रमण पराभूत केलं, महिला आरक्षण घटनादुरुस्ती विधेयक नामंजूर होताच राहुल गांधी यांची प्रतिक्रिया
संविधानावरील हल्ला, संविधानावरील आक्रमण पराभूत केलं, राहुल गांधींची प्रतिक्रिया ; प्रियांका गांधी काय म्हणाल्या
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 एप्रिल 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 एप्रिल 2026 | शुक्रवार
भाजप गेली 10 वर्ष पक्ष फोडत होता, आता देशात दोन गट पाडण्यापर्यंत मजल, महिला आरक्षणातून स्वतःकडे सत्तेचा अमरपट्टा ते हिंदीकरण करण्याचा प्रयत्न ते आंदोलन उभारणार; राज ठाकरे काय काय म्हणाले? 12 मोठे मुद्दे
भाजप गेली 10 वर्ष पक्ष फोडत होता, आता देशात दोन गट पाडण्यापर्यंत मजल, महिला आरक्षणातून स्वतःकडे सत्तेचा अमरपट्टा ते हिंदीकरण करण्याचा प्रयत्न ते आंदोलन उभारणार; राज ठाकरे काय काय म्हणाले? 12 मोठे मुद्दे
Video: पोक्सो दाखल करा म्हणताच नवनीत राणांचा संताप; म्हणाल्या, प्यारे खान आधी स्वतःचं पाहा, संविधान पुढे ठेवाल की कुराण?
Video: पोक्सो दाखल करा म्हणताच नवनीत राणांचा संताप; म्हणाल्या, प्यारे खान आधी स्वतःचं पाहा, संविधान पुढे ठेवाल की कुराण?
Embed widget