Ram Charan : वाढदिवसाला राम चरणकडून चाहत्यांना सरप्राइज; नव्या चित्रपटाची घोषणा
Ram Charan Movie : राम चरणचा 'गेम चेंजर' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
Ram Charan Game Changer Movie : दाक्षिणात्य सुपरस्टार राम चरण (Ram Charan) आज आपला 38 वा वाढदिवस साजरा करत आहे. अभिनेत्यासाठी हे वर्ष खूपच खास आहे. 'आरआरआर' (RRR) या सिनेमाने जगभरात धुमाकूळ घातल्यानंतर राम चरणचा 'गेम चेंजर' (Game Changer) हा आगामी सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. वाढदिवशी 'गेम चेंजर'ची घोषणा करत रामने चाहत्यांना खास भेट दिली आहे.
राम चरणचा 'गेम चेंजर' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सिनेमाची घोषणा झाल्यामुळे चाहते या सिनेमाची आतुरतेने वाट पाहत आहेत. 'आरआरआर' प्रमाणे 'गेम चेंजर'देखील सुपरहिट होईल असे म्हटले जात आहे. राजकारणावर आधारित या नाट्यमय सिनेमाची चाहत्यांना उत्सुकता लागली आहे. 'विक्रम', 'शिवाजी', 'रोबोट' अशा अनेक लोकप्रिय सिनेमाचं दिग्दर्शन केलेला एस शंकर या सिनेमाचं दिग्दर्शन करणार आहे.
राम चरणने 'गेम चेंजर' या सिनेमाची घोषणा करत नावाचा टीझर व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा व्हिडीओ चाहत्यांच्या पसंतीस उतरला असून नक्की काय गेम बदलणार याची चाहत्यांना उत्सुकता आहे. राम चरणची खेळी बॉक्स ऑफिसवर जादू दाखवण्यात यशस्वी होते का याकडे चाहत्यांचं लक्ष लागलं आहे.
View this post on Instagram
एस शंकरची गणना देशातल्या सर्वात महागड्या दिग्दर्शकांपैकी होते. त्याच्या सिनेमातील उत्कृष्ट वीएफएक्स हे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतात. आता 'गेम चेंजर' या सिनेमाच्या नावाच्या टीझरमध्येदेखील उत्तम वीएफएक्सचा अवलंब करण्यात आला आहे. 'गेम चेंजर' हा सिनेमा तामिळ, तेलुगू आणि हिंदी भाषेत प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात राम चरणसह कियारा आडवाणीदेखील मुख्य भूमिकेत झळकणार आहे.
'गेम चेंजर' कधी रिलीज होणार?
'गेम चेंजर' या सिनेमाची घोषणा झाल्यामुळे चाहते सिनेमाची प्रतीक्षा करत आहेत. पण निर्मात्यांनी अद्याप रिलीज डेट जाहीर केलेली नाही. या सिनेमात राम आणि कियारासह अंजली, एसजे सूर्या, जयराम, नवीन चंद्रा, नासर, श्रीकांत, सुनील आणि समुथिरकान महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. हा सिनेमा या डिसेंबर 2023 किंवा जानेवारी 2024 मध्ये प्रदर्शित होऊ शकतो, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
संबंधित बातम्या