एक्स्प्लोर

Srikanth Movie OTT Release: ओटीटीवर रिलीज होणार राजकुमारचा रावचा 'श्रीकांत', जाणून घ्या कधी आणि कोणत्या प्लॅटफॉर्मवर झळकणार?

Srikanth Movie OTT Release: राजकुमार रावची प्रमुख भूमिका असलेला 'श्रीकांत' हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर झळकणार आहे. जाणून घ्या कधी आणि कोणत्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर झळकणार.

Srikanth Movie OTT Release:  दृष्टीहिन व्यावसायिक श्रीकांत बोला (Shrikanth Bola) यांच्या जीवनावर आधारीत असलेला आणि राजकुमार रावची (Rajkummar Rao) मुख्य भूमिका असलेला श्रीकांत चित्रपट याच महिन्यात चित्रपटगृहात झळकला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर सरासरी कमाई केली. मात्र, ही कमाई चित्रपट निर्मात्यांच्या अपेक्षेपेक्षा कमी राहिली आहे. त्यामुळे हा चित्रपट आता लवकरच चित्रपटगृहातून काढला जाऊ शकतो. 

ओटीटीवर कधी रिलीज होणार श्रीकांत? Where & when will Rajkummar Rao’s Srikanth stream

राजकुमार रावची प्रमुख भूमिका असलेला 'श्रीकांत' हा चित्रपट जूनच्या पहिल्या आठवड्यात ओटीटीवर प्रदर्शित होऊ शकतो. काही वृत्तानुसार, हा चित्रपट नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर मे महिन्यानंतर कधीही रिलीज होऊ शकतो. 

या चित्रपटात एका अंध मुलाची गोष्ट दाखवण्यात आली आहे. हा मुलगा आपल्या मेहनतीने आणि समर्पणाने मोठा व्यावसायिक बनला आहे. राजकुमार राव शिवाय, ज्योतिकाने या चित्रपटात आपल्या शिक्षिकेची उत्कृष्ट भूमिका साकारली आहे.

View this post on Instagram
 
A post shared by RajKummar Rao (@rajkummar_rao)

वृ्त्तानुसार, 'श्रीकांत' या चित्रपटाचे बजेट 40 ते 45 कोटी रुपये आहे. या चित्रपटाने आतापर्यंत 21 कोटींची कमाई केली आहे. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाची दमछाक होत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन तुषार हिरानंदानी यांनी केले आहे. चित्रपटाची कथा सत्य घटनेवर आधारीत असून प्रेक्षक, समीक्षकांनी चित्रपटाचे कौतुक केले आहे. आता हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर कितपत तग धरेल आणि कमाई करेल हे लवकरच स्पष्ट होईल. 

राजकुमार राव- जान्हवी कपूरचा चित्रपट प्रदर्शनाच्या वाटेवर

View this post on Instagram
 
A post shared by Karan Johar (@karanjohar)

'मिस्टर अँड मिसेस माही' हा चित्रपट 31 मे रोजी प्रदर्शित होणार असून त्याआधी 'श्रीकांत' या चित्रपटाला कमाई करण्याची संधी आहे. यानंतर राजकुमार रावचा दुसरा चित्रपट 'मिस्टर अँड मिसेस माही' रिलीजसाठी सज्ज होणार आहे. या चित्रपटात जान्हवी कपूरची भूमिका आहे आणि त्याचा ट्रेलर प्रेक्षकांना खूप आवडला आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

शेतकऱ्याची धावपटू मुलगी घेणार गरुडभरारी, मुख्यमंत्र्यांनी घेतली जबाबादारी, पुण्याच्या बालेवाडीत मिळणार प्रशिक्षण

Video: एकनाथ शिंदे की अजित पवार, विश्वासू कोण?  बेधडक मुलाखतीत देवेंद्र फडणवीस यांचं बिनधास्त उत्तर

क्या बात है... 3100 फूट उंच लिंगाणा सर करणारा 4 वर्षाचा गिर्यारोहक; सुळक्यांवर 'साम्राज्य' गाजवतोय चिमुकला

बुलढाण्यात टक्कल पडण्याच्या आजाराच्या रुग्णांत वाढ; 11 गावातील 51 रुग्णांचे घेतले त्वचेचे नमुने, प्रशासन ऍक्टिव्ह मोडवर

ABP Premium

व्हिडीओ

TOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर : 10 Jan 2025 : ABP MajhaAmol Kolhe on Shiv Sena UBT Congress : अमोल कोल्हेंची ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेसवर जोरदार टीकाMaharashtra MVA : जागावाटप आणि वादाचं अटक मटक; वडेट्टीवार-राऊत आमनेसामनेABP Majha Headlines : 06 PM : 10 जानेवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शेतकऱ्याची धावपटू मुलगी घेणार गरुडभरारी, मुख्यमंत्र्यांनी घेतली जबाबादारी, पुण्याच्या बालेवाडीत मिळणार प्रशिक्षण
शेतकऱ्याची धावपटू मुलगी घेणार गरुडभरारी, मुख्यमंत्र्यांनी घेतली जबाबादारी, पुण्याच्या बालेवाडीत मिळणार प्रशिक्षण
Video: एकनाथ शिंदे की अजित पवार, विश्वासू कोण?  बेधडक मुलाखतीत देवेंद्र फडणवीस यांचं बिनधास्त उत्तर
Video: एकनाथ शिंदे की अजित पवार, विश्वासू कोण? बेधडक मुलाखतीत देवेंद्र फडणवीस यांचं बिनधास्त उत्तर
क्या बात है... 3100 फूट उंच लिंगाणा सर करणारा 4 वर्षाचा गिर्यारोहक; सुळक्यांवर 'साम्राज्य' गाजवतोय चिमुकला
क्या बात है... 3100 फूट उंच लिंगाणा सर करणारा 4 वर्षाचा गिर्यारोहक; सुळक्यांवर 'साम्राज्य' गाजवतोय चिमुकला
बुलढाण्यात टक्कल पडण्याच्या आजाराच्या रुग्णांत वाढ; 11 गावातील 51 रुग्णांचे घेतले त्वचेचे नमुने, प्रशासन ऍक्टिव्ह मोडवर
बुलढाण्यात टक्कल पडण्याच्या आजाराच्या रुग्णांत वाढ; 11 गावातील 51 रुग्णांचे घेतले त्वचेचे नमुने, प्रशासन ऍक्टिव्ह मोडवर
मंत्री धनंजय मुंडे एक्टीव्ह मोडवर; आधी भुजबळांची भेट, नंतर मंत्रालयात कामकाज सुरू

Sania Mirza : सानिया मिर्झाला मिळालं नवं कुटुंब
सानिया मिर्झाला मिळालं नवं कुटुंब
मोठी बातमी! अखेर राहुल गांधी न्यायालयात हजर; पुणे कोर्टाकडून 25 हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन

90 तासांच्या कामाची चर्चा! जगातील कोणत्या देशात सर्वात जास्त वेळ लोक काम करतात?  

Embed widget