Rajeev Sen-Charu Asopa : राजीव-चारुमध्ये पुन्हा बिनसलं? सोशल मीडियावरील फॅमिली फोटो डिलीट करत केलं एकमेकांना अनफॉलो!
Rajeev Sen-Charu Asopa : काहीच दिवसांपूर्वी त्यांनी सोशल मीडियावर मुलीसोबत फॅमिली फोटो शेअर केले होते. मात्र, आता त्यांनी हे सगळे फोटो सोशल मीडियावरून डिलीट केले आहेत.
Rajeev Sen-Charu Asopa : बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेन हिचा भाऊ राजीव सेन (Rajeev Sen) आणि त्याची पत्नी चारू असोपा (Charu Asopa) यांच्या वैवाहिक जीवनातील अडचणींमुळे ते सतत चर्चेत असतात. काही महिन्यांपूर्वी त्यांचे नाते तुटण्याच्या मार्गावर होते. प्रकरण इतके बिघडले की, गोष्टी घटस्फोटापर्यंत देखील गेल्या होत्या. पण, गेल्या महिन्यात घटस्फोटाच्या आधीच त्यांनी मुलगी जियानासाठी आपल्या नात्याला आणखी एक संधी देण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर दोघांमध्ये सर्व काही ठीक सुरु होते. मात्र, आता पुन्हा एकदा त्यांच्या नात्यात दुरावा आला आहे.
काहीच दिवसांपूर्वी त्यांनी सोशल मीडियावर मुलीसोबत फॅमिली फोटो शेअर केले होते. मात्र, आता त्यांनी हे सगळे फोटो सोशल मीडियावरून डिलीट केले आहेत. इतकंच नाही तर, त्यांनी एकमेकांना अनफॉलो देखील केलं आहे. यामुळेच पुन्हा एकदा त्यांच्या घटस्फोटाच्या चर्चांना उधाण आले आहे.
नातं संपवण्याचा निर्णय!
याबद्दल एका वेबसाईटशी बोलताना त्यांच्या एका जवळच्या व्यक्तीने सांगितले की, दोघांनी त्यांच्या नात्याला आणखी एक संधी देण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, हा प्रयत्न फोल ठरला आहे. आता त्यांनी एकमेकांपासून दूर होण्याचा निर्णय घेतला आहे. दोघांमध्ये पुन्हा समजोता होण्यासाठी आता काहीच उरलेले नाही, असे त्यांचे मत आहे. मात्र, अद्याप चारू असोपा किंवा राजीव सेन या दोघांपैकी एकानेही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. सध्या चारू आपल्या लेकीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी बिकानेरमध्ये आहे.
घटस्फोटाचा ड्रामा
चारू (Charu Asopa) आणि राजीव (Rajeev Sen) यांनी 9 जून 2019 रोजी रजिस्टर मॅरेज केले. त्यानंतर 16 जून रोजी त्यांचा गोवा येथे विविह सोहळा पार पडला. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये चारूने एका मुलीला जन्म दिला होता. जियाना असं त्यांच्या मुलीचं नाव आहे. दोघेही दररोज बाळासोबतचे फोटो शेअर करत असतात. चारू आणि राजीव यांनी त्यांच्या लग्नातील अडचणी सोशल मीडियावर शेअर केल्या होत्या. राजीवने चारूवर पहिल्या लग्नाचे सत्य लपवल्याचा आरोप केला होता. तर, चारूने राजीवसोबतच्या नात्याला टॉक्सिक म्हटले होते.
चारु ही छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. ‘बालवीर’, ‘ये रिश्ता क्या केहलाता है’, ‘लव्ह बाय चान्स’, ‘लाडो-2’ या मालिकांमध्ये काम केलं आहे. तर, ‘Impatient Vivek’ या चित्रपटामधून तिनं चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. तर, राजीव देखील मनोरंजन विश्वात सक्रिय आहे.
हेही वाचा :