Raj Kundra : पोर्नोग्राफी प्रकरणामुळे राज कुंद्रा (Raj Kundra) आणि शिल्पा शेट्टीचे (Shilpa Shetty) नाव चर्चेत आहे. आता राज कुंद्राने शिल्पा शेट्टीच्या नावावर पाच फ्लॅट केले आहेत. राज कुंद्राला गेल्यावर्षी पॉर्नोग्राफी प्रकरणामुळे अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्याला जामीनदेखील मिळाला होता. या प्रकरणात अनेकांची नावे समोर आली असून शिल्पा शेट्टीचीदेखील चौकशी करण्यात आली होती.
राज कुंद्राने मुंबईतील त्याच्या 'किनारा' बंगल्याचा संपूर्ण पहिला मजला शिल्पा शेट्टीच्या नावावर केला आहे. या मजल्यावर पाच फ्लॅट्स आहेत. या मालमत्तेची किंमत 38.5 कोटी असल्याचे म्हटले जात आहे. राज कुंद्रा यांचे खरे नाव रिपू सुदान कुंद्रा आहे. सध्या या बंगल्यात शिल्पा आणि राज कुंद्रा राहतात. समुद्रकिनाऱ्यापासून सुमारे 300 मीटर अंतरावर 'किनारा' बंगला आहे.
5 हजार 999 स्वेअर फूटचा हा फॅल्ट आहे. 21 जानेवारी 2022 रोजी या फ्लॅटची कागदपत्रं रजिस्टर केली गेली आहेत. पोर्नोग्राफी प्रकरणात राज कुंद्राला जुलै 2021 मध्ये अटक झाली होती. जवळपास दोन महिने राज अटकेत होता. त्यानंतर त्याला सप्टेंबर 2021 मध्ये जामीन मिळाला. त्यानंतर राजने ट्विटर आणि इंस्टाग्राम अकाऊंट डिलीट केले.
संबंधित बातम्या
Nora Fatehi: नोराचे इन्स्टाग्राम डिलीट? त्या आधी सिंहाला घास भरवतानाचा व्हिडीओ व्हायरल
Kiran Mane : माझ्यावर केलेले आरोप धादांत खोटे, किरण मानेंनी ठोकला 5 कोटींचा अब्रूनुकसानीचा दावा!
Nora Fatehi Instagram : नोरा फतेहीचं अकाऊंट इंस्टाग्रामवरून गायब, काही तासांपूर्वीच शेअर केले होते दुबई व्हेकेशनचे फोटो
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha