Nora Fatehi : बॉलिवूड अभिनेत्री नोरा फतेही (Nora Fatehi) सध्या चर्चेत आहे. नोराचे इंस्टाग्राम अकाऊंट गायब झाले आहे. अशातच तिचे सिंहासोबतचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. आपल्या स्टाईल आणि सुंदर फोटोंद्वारे चाहत्यांची मने जिंकणारी नोरा यावेळी मात्र वेगळ्याच अंदाजात दिसून आली. 


नोरा फतेही सध्या व्हेकेशन मोडमध्ये आहे. नुकतेच नोराने पांढऱ्या सिंहासोबतचे काही फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत. नोराच्या या फोटोंमुळे तिच्या चाहत्यांना चांगलाच धक्का बसला आहे. नोरा मांसाचा तुकडा भुकेल्या सिंहांना स्वतःच्या हाताने खाऊ घालताना दिसत आहे. त्या व्हिडीओवर चाहते 'हे भयानक आहे' अशापद्धतीच्या कमेंट्स करताना दिसून आले.





 व्हायरल व्हिडीओत नक्की काय?
व्हिडिओच्या सुरुवातीला नोरा हातात मांस घेऊन सिंहाला कसे खायला घालायचे ते सांगत आहे. एका धाडसी मुलीप्रमाणे नोरा फतेही भुकेल्या सिंहाला खाऊ घालताना दिसत आहे. नोरा फतेहीच्या या धाडसी व्हिडीओवर चाहते लाईक्सचा वर्षाव करताना दिसून आले. नोरा फतेहीचा हा व्हिडिओ कपिल शर्मानेदेखील लाईक केला होता. 


नोरा फतेहीचा इंस्टाग्रामला रामराम?
नोराचा सोशल मीडियावर मोठा चाहतावर्ग आहे. पण आता तिचे इंस्टाग्राम अकाऊंट गायब झाले आहे. काही तासांपूर्वीच नोराने दुबईतील फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले होते. तिचे इंस्टावर 37.6 मिलिअन फॉलोअर्स होते. नोरा फतेहीचे इन्स्टाग्राम पेज आता उपलब्ध नाही. तिने काही तासांपूर्वीपर्यंत दुबई व्हेकेशनचे फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर केले होते. 


संबंधित बातम्या


Nora Fatehi Instagram : नोरा फतेहीचं अकाऊंट इंस्टाग्रामवरून गायब, काही तासांपूर्वीच शेअर केले होते दुबई व्हेकेशनचे फोटो


Madhubala यांच्या 96 वर्षांच्या बहिणीला सुनेने काढलं घराबाहेर, कुणालाही न सांगता पाठवले मुंबईला


Kiran Mane : माझ्यावर केलेले आरोप धादांत खोटे, किरण मानेंनी ठोकला 5 कोटींचा अब्रूनुकसानीचा दावा!


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha