Kiran Mane PC : ‘मुलगी झाली हो’ (Mulgi Zali Ho) मालिकेतून तडकाफडकी काढून टाकल्यानंतर आता ‘विलास पाटील’ फेम अभिनेते किरण माने (Kiran Mane) यांनी पत्रकार परिषद घेत आपल्यावर झालेल्या आरोपांवर भाष्य केले आहे. यावेळी त्यांच्यासोबत वकील असिम सरोदे देखील उपस्थित होते. ‘माझ्यावर केलेले आरोप धादांत खोटे, सत्य लवकरच समोर येईल’, असे किरण माने यांनी यावेळी म्हटले आहे.


‘पहिल्या दिवसापासून माझा मुद्दा हाच आहे की, मला मेल किंवा नोटीस का देण्यात आलेली नाही? अचानक एक हिंदी प्रोडक्शन हाऊस मला सांगतं की, काढून टाकण्यात आलं आहे. माझ्यावर आरोप करण्यात आला आहे की, महिलांबाबत गैरवर्तन केलं आहे. हे आरोप धादांत खोटे आहेत’, असे किरण माने म्हणाले.


5 कोटी रुपयांचा अब्रू नुकसानीचा दावा 


‘किरण माने यांच्याबाबत जे झालं हे नवीन नाही. आत्तापर्यंत हे होत आलं आहे. महिलांना पुढे करुन अनेक कलाकारांना काढण्यात आलं आहे, अशी आधी देखील प्रकरणे घडली आहेत. किरण माने यांच्या प्रकरणामुळे एक बाब आहे की, प्रोडक्शन हाऊसकडून कोणत्याही प्रकरचे कायद्याचे प्रमाण वाढत आहे. किरण माने यांच्या प्रकरणात महिलांच्या तक्रारी आहेत, असं सांगून करवाई झाली आहे. या प्रकरणामध्ये चॅनलने किरण माने यांच्यावर करवाई करणं गरजेचं होतं, हे का केलं नाही. या प्रकरणी चॅनलने संबंधित तरुणीची तक्रार घेणं गरजेचं होतं आणि तत्काळ किरण माने यांना नोटीस द्यायला होती. यापैकी कोणतीही बाब पाळली गेली नाही. त्यांनी जाणीपूर्वक या बाबी केल्या आहेत आणि अतिशय वाईट पद्धतीन किरण माने यांना काढण्यात आलं आहे. त्यांची बदनामी केली. म्हणून पॅनोरमा प्रोडक्शन यांना 5 कोटी रुपयांची अब्रूनुकसानीची नोटीस पाठवण्यात येत आहे. शिवाय त्यांनी 'मुलगी झाली हो' या मालिकेत त्याना सन्मानाने परत घ्यावं अणि लेखी माफीनामा मागावा अन्यथा आम्ही कोर्टात जाणार आहोत’, असे वकील असिम सरोदे म्हणाले.


हिंदी-मराठी वाद?


यावेळी त्यांनी जातीवादावर देखील भाष्य केले. एक हिंदी प्रोडक्शन मराठी कलाकाराला कामावरून काढून टाकते आणि त्याची बदनामी करते, अशावेळी मराठी कलाकारांनी पुढे येऊन साथ द्यावी, असे आवाहन देखील त्यांनी केले आहे. तर, स्टार नेटवर्कने पॅनोरमा प्रोडक्शनवर पूर्णपणे बंदी घालावी, अशी मागणी त्यांनी कायदेशीर नोटीसीत केली आहे.


हेही वाचा :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha