Nora Fatehi Instagram Account : बॉलिवूड अभिनेत्री नोरा फतेही (Nora Fatehi) सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह असते. सोशल मीडियावर तिचा चाहतावर्गदेखील मोठा आहे. पण आता तिचे इंस्टाग्राम अकाऊंट गायब झाले आहे. काही तासांपूर्वीच नोराने दुबईतील फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले होते. तिचे इंस्टावर 37.6 मिलिअन फॉलोअर्स होते. 



नोरा फतेहीचे इन्स्टाग्राम पेज आता उपलब्ध नाही. तिने काही तासांपूर्वीपर्यंत दुबई व्हेकेशनचे फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर केले होते. नोरा सध्या दुबईत असून ती सुट्टी आनंदात घालवताना दिसत आहे. काही वेळापूर्वीच नोराने एक व्हिडीओ शेअर केला होता. त्या व्हिडीओमध्ये नोरा सिंहाला हाताने खाऊ घालताना दिसत होती. सोशल मीडियावर हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला होता.



नोराला काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. मात्र आता ती बरी झाल्यानंतर सुट्टीसाठी थेट दुबईला पोहोचली. सध्या ती निसर्गासोबत वेळ घालवत आहे. नोरा नुकतीच 'डान्स मेरी रानी' या गाण्यावर डान्स करताना दिसली होती. तिचे डान्स चाहत्यांना प्रचंड आवडला होता. यात गुरु रंधावा देखील होता.


 


कोरोनाची लागण झाल्यानंतर नोराने सोशल मीडिया पोस्टमध्ये लिहिले होते,'मला कोरोनाची लागण झाली आहे. सर्वांनी काळजी घ्या आणि नियमांचे पालन करा. मास्कचा वापर करा. कोरोना वेगाने पसरत आहे. आरोग्यापेक्षा महत्वाचे काहीच नाही.' 'झलक दिखला जा' ,'बिग बॉस-9', 'कॉमेडी नाइट्स बचाओ' ,'डान्स प्लस 4' या शोमधून नोरा प्रेक्षकांच्या भेटीस आली.


संबंधित बातम्या


Major Release Date : शहीद मेजर संदीप उन्नीकृष्णन यांच्या आयुष्यावर आधारित 'मेजर' सिनेमा 'या' दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला


Pandit Bhimsen Joshi Birth Anniversary : वयाच्या 20व्या वर्षी पहिला अल्बम रिलीज, रेडिओ कलाकार म्हणूनही केले काम! वाचा पंडित भीमसेन जोशींबद्दल...


Amruta Fadnavis : महाशिवरात्रीच्या आधी अमृता फडणवीसांचं नवं गाणं प्रेक्षकांच्या भेटीस; केली घोषणा


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha