Sunil Grover : कॉमेडियन सुनील ग्रोव्हरची (Sunil Grover) नुकतीच हृदय शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. त्यामुळे सुनीलच्या चाहत्यांना त्याची काळजी वाटत आहे. सुनील लवकर बरा व्हावा यासाठी चाहते प्रार्थना करत होते. अशातच सुनीलला बुधवारी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. आता सुनीलच्या तब्येतीवर कॉमेडी किंग कपिल शर्मानेदेखील (Kapil Sharma) प्रतिक्रिया दिली आहे.
टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या एका मुलाखतीत सुनीलच्या प्रकृतीबाबत कपिल म्हणाला,"ही बातमी ऐकून मला खूप धक्का बसला. सुनीलच्या तब्येतीची मला खूप काळजी वाटते. मी त्यांना मेसेजदेखील केला आहे. आता त्याला अलीकडेच रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. कमी वयात त्याच्यावर हृदयाची शस्त्रक्रिया करण्यात आली. पण तो लवकरच बरा होईल अशी मला आशा आहे. आम्ही आमच्या कॉमन फ्रेंड्समार्फत त्यांची प्रकृती जाणून घेण्याचा प्रयत्न केला".
कपिल आणि सुनील पूर्वी चांगले मित्र होते. दोघांनी 'द कपिल शर्मा शो'मध्ये एकत्र काम केले आहे. तेव्हा दोघांची जोडी चाहत्यांच्या पसंतीस पडली होती. पण नंतर त्यांच्यात वाद झाल्याने त्यांनी एकत्र काम केले नाही.
सुनील ग्रोव्हरला कोरोनाची लागणदेखील झाली होती
एशियन हार्ट इन्स्टिट्यूट रुग्णालयाचे वैद्यकीय प्रमुख डॉ. विजय डिसिल्वा यांनी सांगितले होते की,"रुग्णालयात दाखल केल्यानंतर सुनील ग्रोव्हर यांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. अशा परिस्थितीत, दोन्ही प्रकारची औषधे दिली जात होती. सुनील ग्रोव्हरचा देखील कौटुंबिक इतिहास आहे. अशा परिस्थितीत त्यांच्या हृदयविकाराच्या कारणांमध्ये कौटुंबिक कारणे देखील समाविष्ट आहेत आणि त्याशिवाय तो धूम्रपान देखील करतो. त्यामुळे यापुढे त्यांनी तब्येतीची काळजी घेणे गरजेचे आहे".
संबंधित बातम्या
Kiran Mane : माझ्यावर केलेले आरोप धादांत खोटे, किरण मानेंनी ठोकला 5 कोटींचा अब्रूनुकसानीचा दावा!
Nora Fatehi Instagram : नोरा फतेहीचं अकाऊंट इंस्टाग्रामवरून गायब, काही तासांपूर्वीच शेअर केले होते दुबई व्हेकेशनचे फोटो
Major Release Date : शहीद मेजर संदीप उन्नीकृष्णन यांच्या आयुष्यावर आधारित 'मेजर' सिनेमा 'या' दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha