एक्स्प्लोर

Raghuveer: 'रघुवीर' चित्रपटाचं पोस्टर प्रदर्शित; समर्थ रामदास स्वामी यांची भूमिका साकारणार 'हा' अभिनेता

“रघुवीर" (Raghuveer) हा लवकरच मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. निलेश कुंजीर यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे.

Raghuveer: आपला महाराष्ट्र संतांची भूमी म्हणून ओळखला जातो. या महाराष्ट्रात अनेक थोर संतांपैकी एक संत म्हणजे “समर्थ रामदास स्वामी”. समर्थ रामदास स्वामी यांचा चरित्रपट “रघुवीर" (Raghuveer) हा लवकरच मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. दिग्दर्शक निलेश कुंजीर यांनी रामदास स्वामींचे जीवनचरीत्र चित्रपट रूपात जगासमोर आणण्याचं शिवधनुष्य उचललं आहे. मालिकांपासून ते चित्रपटांपर्यंत नेहमीच वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका साकारणारे अभिनेते विक्रम गायकवाड हे 'रघुवीर' या चित्रपटामध्ये समर्थ रामदास स्वामींची भूमिका साकारणार आहेत. 

'रघुवीर' चित्रपटाची निर्मिती डायनॅमिक प्रोडक्शन्स आणि आदित्यम क्रिएशन्सच्या सहयोगानं समर्थ क्रिएशन्सनं यांनी केली आहे. अभिनव विकास पाठक आणि अरविंद सिंह राजपूत या चित्रपटाचे निर्माते असून, वैभव किशोर मानकर, सपना किरण बडगुजर आणि डॅा. किरण छगन बडगुजर सहनिर्माते आहेत. समीर दीक्षित आणि ऋषिकेश भिरंगी यांच्या पिकल एन्टरटेन्मेंट अँड मीडिया प्रा. लि.कडे वितरणाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक निलेश कुंजीर यांनी केलंय. अनेक मराठी लघुपट, वेबसिरीजचे दिग्दर्शन त्यांनी केले आहे.

समर्थ रामदास स्वामींच्या भूमिकेतील विक्रम गायकवाड सध्या 'छोट्या बयोची मोठी स्वप्न' या मालिकेत महत्त्वाचं पात्र साकारत आहेत. याखेरीज 'उंच माझा झोका', 'स्वप्नांच्या पलिकडले', 'सत्यवान सावित्री' या मालिकाही त्यांनी केल्या आहेत. 'समांतर' या बहुचर्चित वेब सीरिजसोबतच सध्या लाइमलाईटमध्ये असलेल्या 'अथांग'मध्येही त्यांनी उत्तम भूमिका केल्यात. याशिवाय 'बंदिशाळा', 'शेर शिवराज', 'पावनखिंड' या चित्रपटांमध्ये विक्रम यांनी साकारलेल्या व्यक्तिरेखाही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्या आहेत. त्यांचा रामदास स्वामींच्या रूपातील लूक रिव्हील करत 'रघुवीर' चित्रपटाची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. पोस्टरवरील विक्रमचा लुक लक्ष वेधून घेणारा असून, 'रघुवीर'बाबतची उत्सुकता वाढवणारा आहे.

View this post on Instagram
 
A post shared by Vikram Gaikwad (@vikram_gaikwad46)

संगीत नाटक अकादमी पारितोषिक विजेते अभिराम भडकमकर यांच्यासोबत निलेश कुंजीर यांनी पटकथा लेखन केले आहे तर अभिराम भडकमकर यांनी 'रघुवीर'चे संवादलेखन केलं आहे. धनराज सुखदेव वाघ आणि प्रथमेश नितीन रांगोळे यांनी या चित्रपटाची सिनेमॅटोग्राफी केली असून, जागेश्वर ढोबळे आणि प्रशांत चंद्रकांत कांबळे यांनी संकलन केलं आहे. सचिन सुहास भावे या चित्रपटाचे कार्यकारी निर्माते आहेत. या चित्रपटात ऋजुता देशमुख, शैलेश दातार, विघ्नेश जोशी, नवीन प्रभाकर, राहुल मेहदेंळे, भूषण तेलंग, वर्षा दांदळे, मौसमी तोंडवलकर, अनुश्री फडणीस, निनाद कुलकर्णी, देव निखार्गे, गणेश माने यांच्या देखील महत्त्वाच्या भूमिका आहेत.

महत्त्वाच्या बातम्या:

Sarla Ek Koti : अभिमानास्पद! 'सरला एक कोटी' सिनेमाची प्रेक्षकावर भुरळ; भारावला अन् लेकीचं नाव ठेवलं...

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पोलीस जनतेसाठी आहेत की भाजपसाठी?; पुण्यातील आमदार रवींद्र धंगेकरांचं थेट पोलीस आयुक्तांना पत्र
पोलीस जनतेसाठी आहेत की भाजपसाठी?; पुण्यातील आमदार रवींद्र धंगेकरांचं थेट पोलीस आयुक्तांना पत्र
मोठा दिलासा... UPSC परीक्षार्थींना दररोज 3000 रुपये द्या; न्यायालयाचे सर्वोच्च आदेश
मोठा दिलासा... UPSC परीक्षार्थींना दररोज 3000 रुपये द्या; न्यायालयाचे सर्वोच्च आदेश
अरुंद पुलावर तांदळाने भरलेली ट्रक पलटी, कारमधील 4 जण दबले; स्थानिकांची घटनास्थळी धाव
अरुंद पुलावर तांदळाने भरलेली ट्रक पलटी, कारमधील 4 जण दबले; स्थानिकांची घटनास्थळी धाव
पुण्यात पुन्हा होर्डींग कोसळलं, नवरदेवाचा घोडा अडकला; कोकणातही मुसळधारा, विदर्भात केळी बागांचं नुकसान
पुण्यात पुन्हा होर्डींग कोसळलं, नवरदेवाचा घोडा अडकला; कोकणातही मुसळधारा, विदर्भात केळी बागांचं नुकसान
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Thackeray VS Shinde : मुलुंडच्या राड्यावरुन शाब्दिक राडा; ठाकरेंचा इशारा, शिंदे म्हणाले...Maharashtra Superfast News : वारे निवडणुकीचे : सुपरफास्ट बातम्या एका क्लिकवर : 18 May 2024Maharashtra Superfast News : महाराष्ट्रातील सुपरफास्ट बातम्या एका क्लिकवर : 18 May 2024CM Eknath Shinde : प्रचाराच्या तोफा थंडावल्या, मुख्यमंत्री शिंदे बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळावर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पोलीस जनतेसाठी आहेत की भाजपसाठी?; पुण्यातील आमदार रवींद्र धंगेकरांचं थेट पोलीस आयुक्तांना पत्र
पोलीस जनतेसाठी आहेत की भाजपसाठी?; पुण्यातील आमदार रवींद्र धंगेकरांचं थेट पोलीस आयुक्तांना पत्र
मोठा दिलासा... UPSC परीक्षार्थींना दररोज 3000 रुपये द्या; न्यायालयाचे सर्वोच्च आदेश
मोठा दिलासा... UPSC परीक्षार्थींना दररोज 3000 रुपये द्या; न्यायालयाचे सर्वोच्च आदेश
अरुंद पुलावर तांदळाने भरलेली ट्रक पलटी, कारमधील 4 जण दबले; स्थानिकांची घटनास्थळी धाव
अरुंद पुलावर तांदळाने भरलेली ट्रक पलटी, कारमधील 4 जण दबले; स्थानिकांची घटनास्थळी धाव
पुण्यात पुन्हा होर्डींग कोसळलं, नवरदेवाचा घोडा अडकला; कोकणातही मुसळधारा, विदर्भात केळी बागांचं नुकसान
पुण्यात पुन्हा होर्डींग कोसळलं, नवरदेवाचा घोडा अडकला; कोकणातही मुसळधारा, विदर्भात केळी बागांचं नुकसान
Tirumala Group : बीडच्या तिरुमला उद्योगसमूहाचे प्रमुख सुरेश कुटेंच्या अडचणी वाढल्या; अखेर गुन्हा नोंद
बीडच्या तिरुमला उद्योगसमूहाचे प्रमुख सुरेश कुटेंच्या अडचणी वाढल्या; अखेर गुन्हा नोंद
निवडणूक निकालानंतर शरद पवार अन् उद्धव ठाकरे भाजपासोबत जातील, कारण..; आंबेडकरांचा मोठा दावा
निवडणूक निकालानंतर शरद पवार अन् उद्धव ठाकरे भाजपासोबत जातील, कारण..; आंबेडकरांचा मोठा दावा
Arvind Kejriwal : उद्या 12 वाजता माझ्या नेत्यांसह भाजप मुख्यालयात येतोय, कोणाला जेलमध्ये टाकायचं ते टाका; सीएम केजरीवालांचे मोदींना जाहीर आव्हान
उद्या 12 वाजता माझ्या नेत्यांसह भाजप मुख्यालयात येतोय, कोणाला जेलमध्ये टाकायचं ते टाका; सीएम केजरीवालांचे मोदींना जाहीर आव्हान
लोकसभेला रिपाईला एकही जागा नाही, पण मला कॅबिनेटची गॅरेंटी; रामदास आठवलेंचा नाशकात दावा
लोकसभेला रिपाईला एकही जागा नाही, पण मला कॅबिनेटची गॅरेंटी; रामदास आठवलेंचा नाशकात दावा
Embed widget