Pushpa 2 The Rule Song Angaaron Release : 'पुष्पा 2' मधील 'मेरा सामी'...गाणं रिलीज; श्रीवल्ली आणि पुष्पाच्या कपल साँगचा कल्ला
Pushpa 2 The Rule Song Angaaron Release : आता या चित्रपटातील दुसरं गाणं रिलीज झाले आहे. या गाण्यात श्रीवल्ली आणि पुष्पामध्ये रोमान्स दिसून येत असून नृत्याचे किलर मुव्हज दिसून येत आहे.
Pushpa 2 The Rule Song Angaaron Release : अल्लू अर्जूनच्या 'पुष्पा 2' (Pushpa 2) या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. 'पु्ष्पा 2' ची घोषणा झाल्यापासून प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाची उत्सुकता निर्माण झाली आहे. काही दिवसांपूर्वी 'पुष्पा 2' मधील पहिले गाणे रिलीज झाले होते. आता या चित्रपटातील दुसरं गाणं रिलीज झाले आहे. या गाण्यात श्रीवल्ली आणि पुष्पामध्ये रोमान्स दिसून येत असून नृत्याचे किलर मुव्हज दिसून येत आहे. या गाण्याचा सोशल मीडियावर कल्ला दिसून येत आहे.
या गाण्याने युट्यूबवर येताच सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली आहे. पुष्पा 2 हा चित्रपट या वर्षातील सर्वात मोठा ब्लॉकबस्टर असल्याची चर्चा आधीपासूनच सुरू झाली आहे. देवी श्री प्रसाद उर्फ रॉकस्टार डीएसपी यांचं "पुष्पा: द राइज" मधील 'सामी सामी' अजूनही प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणार आहे. रश्मिका मंदान्नाच्या अनोख्या अदा आणि गायिका श्रेया घोषालच्या आवाजाने प्रेक्षकांना या गाण्यात गुंतवून ठेवले आहे. श्रेया घोषालने हे गाणं वेगवेगळ्या भाषांमध्ये गायले आहे.
पहिल्या गाण्याचा सोशल मीडियावर धुमाकूळ
'पुष्पा-पुष्पा' या गाण्याच्या लिरिकल व्हिडिओने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला. अल्लू अर्जुनच्या स्टेप्सने चाहत्यांची मने जिंकली आहे. या गाण्यातील अल्लू अर्जुनच्या दमदार हुक स्टेपने 'पुष्पाः द राइज'च्या पदार्पणापासूनच पॉप कल्चरचा एक भाग बनलेल्या 'पुष्पाइझम'ची क्रेझ वाढवली आहे. 'पुष्पा 2' या गाण्याला युट्यूबवर 100 मिलियनपेक्षा जास्त व्ह्यूज आणि 2.26 मिलियनपेक्षा जास्त लाईक्स मिळाले आहेत. अशाप्रकारे या गाण्याने मोठा रेकॉर्ड आपल्या नावे केला आहे. सहा भाषांमध्ये हे गाणं रिलीज झालं आहे.
'पुष्पा 2' कधी रिलीज होणार? (Pushpa 2 Release Date)
'पुष्पा 2 - द रुल' हा चित्रपट 15 ऑगस्ट 2024 रोजी रिलीज होणार आहे. या चित्रपटाचे बजेट 500 कोटींच्या घरात असल्याचे म्हटले जात आहे. भारतातील बिग बजेट चित्रपटांमध्ये 'पुष्पा 2'चा समावेश असणार आहे. 'पुष्पा 2: द रूल' (Pushpa 2 : The Rule) हा 'पुष्पा : द राइज' (Pushpa : The Rise) या चित्रपटाचा सीक्वेल असणार आहे. 'पुष्पा'च्या पहिल्या भागाने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली होती. त्यामुळे आता हा सीक्वेल बॉक्स ऑफिसवर किती कोटींचा गल्ला जमवणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
पाहा व्हिडीओ : Angaaron (The Couple Song) Lyrical Video | Pushpa 2 The Rule | Allu Arjun | Rashmika | Sukumar |DSP