एक्स्प्लोर

Pu La Deshpande Death Anniversary : 'महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्त्व' पु.ल. देशपांडे! जाणून घ्या 10 भन्नाट किस्से...

Pu La Deshpande : अष्टपैलू व्यक्तिमत्त्व असणाऱ्या पु. ल. देशपांडे यांचे भन्नाट किस्से जाणून घ्या...

Pu La Deshpande : पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे अर्थात पु.ल. देशपांडे (Pu La Deshpande) यांची आज पुण्यतिथी आहे. महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्त्व, नाटककार, संगीतकार आणि आपल्या विनोदाने संपूर्ण महाराष्ट्राला खळखळून हसवणारे सर्वांचे लाडके भाई म्हणजे पु. ल. देशपांडे होय. त्यांच्या अनेक कथा आजही अनेकांना तोंडपाठ आहे. विनोदी कथा सांगण्याच्या त्यांच्या विशिष्ट शैलीमुळे ते आजही चाहत्यांच्या स्मरणात आहे. आज त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांचे दहा भन्नाट किस्से जाणून घ्या...

1. एकदा एक 'कदम' नावाचे गृहस्थ पु लंकडे मुलगा झाल्याचे पेढे घेऊन आले... त्यावेळी पु लंनी आशीर्वाद दिली की,"कदम कदम बढाये जा".

2. पु. ल. एकदा सुनिताबाईंची ओळख करुन देताना म्हणाले,"मी देशपांडे आणि या उपदेशपांडे". 

3. पुलंचे पाय एकदा खूप सुजले होते. त्यावेळी आपल्या सुजलेल्या पायांकडे बघत ते म्हणाले,"आता मला कळलं की पायांना पाव का म्हणतात ते". 

4. पुलंच्या 'सुंदर मी होणार' या नाटकावर आधारित असलेला 'आज और कल' हा हिंदी सिनेमा बॉक्स ऑफिसवर आपली जादू दाखवण्यात कमी पडला. त्याबद्दल बोलताना ते म्हणाले,"हा सिनेमा नावाप्रमाणे दोनच दिवस चालला..."आज और कल". 

5. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना काही कारणाने हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ते ऐकताच पु.ल म्हणाले,"त्यांच्या खोलीच्या दरवाज्यावर आता 'गर्वसे कहो हम हिंदुजा में है' असं लिहायला हरकत नाही".

6. साहित्य संघात एका रटाळ नाटकाच्या प्रयोगादरम्यान पु. ल. देशपांडे यांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलवण्यात आलं होतं. त्यावेळी नाटकाच्या पहिल्या अंकादरम्यान पडद्यामागे काहीतरी पडल्याचा आवाज आला. त्यावेळी त्यांच्या शेजारी बसलेला एक प्रेक्षक म्हणाला,"काय पडलं हो?". त्यावेळी पु.ल. देशपांडे म्हणाले,"नाटक...दुसरं काय?".

7. पु.ल. देशपांडे एकदा प्रवासादरम्यान असताना त्यांना त्यांचा एक चाहता भेटला आणि त्यांना म्हणाला की,"माझी फक्त दोन व्यक्तींवर श्रद्धा आहे. एक ज्ञानेश्वर आणि दुसरे तुम्ही. माझ्या खोलीतही ज्ञानेवश्वरांच्याबाजूला तुमचाही फोटो लावला आहे. त्यावर पु.ल म्हणाले,"असं काही करू नका.. नाहीतर लोक विचारतील ज्ञानेश्वरांनी ज्यांच्याकडून वेद म्हणून घेतले तो रेडा हाच आहे का?".

8. पु. लं. देशपांडे एकदा मिठाई घेण्यासाठी चितळ्यांच्या दुकानात गेले. त्यावेळी ते म्हणाले की मिठाई खोक्यात बांधून द्या. दरम्यान दुकानदार म्हणाला की,"खोक्याचा चार्ज पडेल". त्यावर पुलं म्हणाले,"अरे वा...म्हणजे मिठाई फुकट?". 

9. पुलं एकेठिकाणी त्यांच्या विनोदी शैलीत म्हणाले की,"मुलगी अगर मुलगा सरळ वळणाची अगर वळणाचा कसा असतो कोण जाणे.. कारण वळण म्हटल्यावर ते सरळ कसे असणार?".

10. पु.ल. देशपांडे यांच्या ओळखीच्या एका मुलीचं लग्न ठरलं होतं. त्या मुलीचं माहेरचं आणि सासरचं आडनाव एकच होतं. हे समजताच पु.लं म्हणाले,"बाकी काही म्हणा, पण मुलीने घराण्याचे नाव राखलं हो".

संबंधित बातम्या

Pu La Deshpande Birth Anniversary : अभिनेते, दिग्दर्शक, नाटककार, संगीतकार... कित्येक पिढ्यांना खळखळून हसवणारे पु. ल. देशपांडे!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Satish Bhosale : माणसं सोडा पण सतीश भोसलेने प्राण्यांनाही सोडलं नाही; हरीण, ससे, मोर अन् शेकडो काळवीटं शिजवून खाल्ली
माणसं सोडा पण सतीश भोसलेने प्राण्यांनाही सोडलं नाही; हरीण, ससे, मोर अन् शेकडो काळवीटं शिजवून खाल्ली
गाड्या सांभाळा... उन्हाच्या तीव्रतेनं लागली आग, रेल्वे स्टेशनजवळील दुचाकी जळून खाक
गाड्या सांभाळा... उन्हाच्या तीव्रतेनं लागली आग, रेल्वे स्टेशनजवळील दुचाकी जळून खाक
Devendra Fadnavis on Nana Patole : 'जयंतराव आमचा विदर्भातील आवाज दाबणार असाल, तर...' नाना पटोलेंवरून सीएम फडणवीस नेमकं काय म्हणाले?
'जयंतराव आमचा विदर्भातील बुलंद आवाज दाबणार असाल, तर...' नाना पटोलेंवरून सीएम फडणवीस नेमकं काय म्हणाले?
Kirit Somaiya : पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेतील लाभार्थ्यांमध्ये 181 बांगलादेशी; किरीट सोमय्यांचा खळबळजनक दावा
पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेतील लाभार्थ्यांमध्ये 181 बांगलादेशी; किरीट सोमय्यांचा खळबळजनक दावा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ambadas Danve | तर मी दिलगिरी व्यक्त करतो, परबांच्या व्यक्तव्याचा अनर्थ होतोय, दानवेंचं स्पष्टीकरणAnil Parab News | समज देण्याचा अधिकार सभापतीना, इतरांना नाही..अनिल परब- राणेंमध्ये खडाजंगीSanjay Raut PC | नामर्द, डरफोक पळून गेलेत, ते फक्त उड्या मारायचे, संजय राऊतांची शिंदेंवर टीकाVidhan Bhavan Mahayuti Protest | अनिल परब याच्यांविरोधात महायुतीच्या नेत्यांचं पायऱ्यांवर आंदोलन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Satish Bhosale : माणसं सोडा पण सतीश भोसलेने प्राण्यांनाही सोडलं नाही; हरीण, ससे, मोर अन् शेकडो काळवीटं शिजवून खाल्ली
माणसं सोडा पण सतीश भोसलेने प्राण्यांनाही सोडलं नाही; हरीण, ससे, मोर अन् शेकडो काळवीटं शिजवून खाल्ली
गाड्या सांभाळा... उन्हाच्या तीव्रतेनं लागली आग, रेल्वे स्टेशनजवळील दुचाकी जळून खाक
गाड्या सांभाळा... उन्हाच्या तीव्रतेनं लागली आग, रेल्वे स्टेशनजवळील दुचाकी जळून खाक
Devendra Fadnavis on Nana Patole : 'जयंतराव आमचा विदर्भातील आवाज दाबणार असाल, तर...' नाना पटोलेंवरून सीएम फडणवीस नेमकं काय म्हणाले?
'जयंतराव आमचा विदर्भातील बुलंद आवाज दाबणार असाल, तर...' नाना पटोलेंवरून सीएम फडणवीस नेमकं काय म्हणाले?
Kirit Somaiya : पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेतील लाभार्थ्यांमध्ये 181 बांगलादेशी; किरीट सोमय्यांचा खळबळजनक दावा
पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेतील लाभार्थ्यांमध्ये 181 बांगलादेशी; किरीट सोमय्यांचा खळबळजनक दावा
Jalna Crime News : लोखंडी सळईने अंगभर चटके देणाऱ्या ठाकरे गटाचा पदाधिकारी नवनाथ दौडचा आणखी एक कारनामा उघड; पैशाच्या वादातून अंगावर गेला धावून अन्..
लोखंडी सळईने अंगभर चटके देणाऱ्या ठाकरे गटाचा पदाधिकारी नवनाथ दौडचा आणखी एक कारनामा उघड; पैशाच्या वादातून अंगावर गेला धावून अन्..
Santosh Deshmukh Photos Videos: संतोष देशमुखांच्या मारहाणीचा काळीज पिळवटून टाकणारा आणखी एक व्हिडीओ समोर, कळवळत असतानाही हैवान मारत राहिले
संतोष देशमुखांच्या मारहाणीचा काळीज पिळवटून टाकणारा आणखी एक व्हिडीओ समोर, कळवळत असतानाही हैवान मारत राहिले
विजय वर्मासोबत ब्रेकअपच्या चर्चा, तमन्ना भाटीया पहिल्यांदाच थेट प्रेमावर बोलली; म्हणाली, हे फक्त स्त्री...
विजय वर्मासोबत ब्रेकअपच्या चर्चा, तमन्ना भाटीया पहिल्यांदाच थेट प्रेमावर बोलली; म्हणाली, हे फक्त स्त्री...
औरंगजेबाच्या थडग्याला केंद्राकडून 6.5 लाख रुपये अन्  किल्ल्यावरील मंदिरासाठी वर्षाला फक्त 3000 रुपये? हिंदू जनजागृती समिती आक्रमक
औरंगजेबाच्या थडग्याला केंद्राकडून 6.5 लाख रुपये अन् किल्ल्यावरील मंदिरासाठी वर्षाला फक्त 3000 रुपये? हिंदू जनजागृती समिती आक्रमक
Embed widget