News
News
टीव्हीabp shortsABP शॉर्ट्सव्हिडीओ पॉडकास्ट खेळ
X

पार्श्वगायिका पलक मुच्छलला धमकवणारा प्राध्यापक अटकेत

पलक मुच्छलला धमकवल्याप्रकरणी आंबोली पोलिसांनी बुधवारी 30 वर्षीय आरोपी प्राध्यापक राजेश कुमार शुक्ला याला बेड्या ठोकल्या.

FOLLOW US: 
Share:
मुंबई : बॉलिवूडमधील प्रसिद्ध पार्श्वगायिका पलक मुच्छलला धमकावणाऱ्या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. मुंबईतील आंबोली पोलिसांनी बुधवारी 30 वर्षीय आरोपी प्राध्यापकाला बेड्या ठोकल्या. आरोपी राजेश कुमार शुक्ला पलक मुच्छलचा चाहता असल्याचं सांगत होता. पलकने आपली भेट घ्यावी, म्हणून तिचा पाठलाग करणं, नजर ठेवणं आणि फोनवरुन धमकी देणं असे सर्व प्रकार त्याने केले. आरोपी राजेश बिहारमधील सासारामचा रहिवासी असल्याचं पोलिसांच्या तपासात समोर आलं. आपल्या आवडीच्या गायकांना भेटण्यासाठी तो मुंबईत आला होता. टेलिफोन डिरेक्टरीतून पलकचा नंबर शोधल्याचा दावा राजेशने केला आहे. पलकला मेसेज केल्यानंतर दोन-तीन वेळा त्याने तिला भेटण्यासाठी फोनही केला होता. आपल्याला न भेटल्यास विनयभंग करण्याची धमकीही आरोपीने दिली होती. पलकने दोन दिवसांपूर्वी आंबोली पोलिसात तक्रार दाखल केली. सुरुवातीला तिने राजेशच्या मेसेजेसकडे दुर्लक्ष केलं, मात्र हे प्रकार वाढल्यामुळे तिने पोलिसात धाव घेतली. पोलिसांनी राजेशचा फोन ताब्यात घेतला असून त्याने इतर पार्श्वगायिकांनाही त्रास दिला आहे का, हे तपासले जात आहे. आशिकी 2, मिकी व्हायरस, आर... राजकुमार, जय हो, किक, बाहुबली, प्रेम रतन धन पायो अशा अनेक चित्रपटात पलकने गाणी गायली आहेत.
Published at : 08 Jun 2018 04:02 PM (IST) Tags: Bollywood Singer professor Bihar Mumbai

आणखी महत्वाच्या बातम्या

Ashish Shelar Asha Bhosle : आशिष शेलारांनी 'ती' आठवण सांगताच आशाताईंच्या डोळ्यात अश्रू तरळले

Ashish Shelar Asha Bhosle : आशिष शेलारांनी 'ती' आठवण सांगताच आशाताईंच्या डोळ्यात अश्रू तरळले

Sonu Nigam Asha Bhosle:  Video :भरमंचावर सोनू निगमने आशाताईंचे पाय गुलाब पाण्याने धुतले, काय झालं नेमकं?

Sonu Nigam Asha Bhosle:  Video :भरमंचावर सोनू निगमने आशाताईंचे पाय गुलाब पाण्याने धुतले, काय झालं नेमकं?

Badtameez Gill : 'बदतमीज गिल'मध्ये नव्या शैलीत दिसणार वाणी कपूर, हॉट ॲन्ड बोल्ड अवतारात कॉमेडीचा तडका

Badtameez Gill : 'बदतमीज गिल'मध्ये नव्या शैलीत दिसणार वाणी कपूर, हॉट ॲन्ड बोल्ड अवतारात कॉमेडीचा तडका

Sikandar First Poster : टायगरचा आता 'सिकंदर' लूक समोर! साजिद नाडियाडवालाने शेअर केली सलमान खानची 'स्पेशल' पहिली झलक

Sikandar First Poster : टायगरचा आता 'सिकंदर' लूक समोर! साजिद नाडियाडवालाने शेअर केली सलमान खानची 'स्पेशल' पहिली झलक

Tabu, Jackie Shroff Bollywood Throwback : डॅनिच्या भर पार्टीत नको ते घडलं आणि तेव्हापासून जॅकी श्राॅफ अन् तब्बूचं कधीच एकत्रित काम नाही! काय होता तो प्रसंग?

Tabu, Jackie Shroff Bollywood Throwback : डॅनिच्या भर पार्टीत नको ते घडलं आणि तेव्हापासून जॅकी श्राॅफ अन् तब्बूचं कधीच एकत्रित काम नाही! काय होता तो प्रसंग?

टॉप न्यूज़

आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो

आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो

कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम

कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम

पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार

पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार

और एक फायनल...एक कप की ओर

और एक फायनल...एक कप की ओर