एक्स्प्लोर

Prathamesh Laghate : आवडीच्या जेवणाचा बेत, हटके उखाणा; थाटात पार पडलं प्रथमेश लघाटेचं पहिलं केळवण

Prathamesh Laghate Mugdha Vaishampayan : प्रथमेश लघाटे आणि मुग्धा वैशंपायन लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत.

Prathamesh Laghate Mugdha Vaishampayan First Kelvan : 'सारेगमप लिटिल चॅम्प्स' (Saregamapa Little Champs) या कार्यक्रमाच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेले प्रथमेश लघाटे (Prathamesh Laghate) आणि मुग्धा वैशंपायन (Mugdha Vaishampayan) गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत. लवकरच ते लग्नबंधनात अडकणार आहेत. आता प्रथमेश लघाटेने त्याच्या पहिल्या केळवणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. 

प्रथमेश लघाटेने पहिल्या केळवणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. व्हिडीओ शेअर करत त्याने खास कॅप्शनदेखील लिहिलं आहे. त्याने लिहिलं आहे,"आमचं ठरलंय'च्या घोषणेनंतर आता हळूहळू केळवणांना सुरुवात होत आहे. हे फीलिंग खूप भारी आहे"

प्रथमेशने पुढे लिहिलं आहे,"अतिशय पारंपरिक पद्धतीने, प्रचंड आपुलकीने, पंच पक्वांनाच्या जेवणाने, अतिशय आग्रहाने खाऊ घालून माझ्या केळवणांचा शुभारंभ चतुरंगने केला. त्याबद्दल 'चतुरंग'च्या पूर्ण टीमला खूप खूप धन्यवाद". प्रथमेशच्या या पोस्टवर त्याच्या होणाऱ्या पत्नीने अर्थात मुग्धा वैशंपायननेदेखील खास कमेंट केली आहे. तिने लिहिलं आहे,"किती छान". 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Prathamesh Umesh Laghate (@prathamesh_laghate_adhikrut)

थाटात पार पडलं प्रथमेश लघाटेचं पहिलं केळवण

प्रथमेशने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये चतुरंग प्रतिष्ठानमधील महिला त्याला ओवाळताना दिसत आहेत. तसेच भेट म्हणून त्याला एक शालदेखील देण्यात आली आहे. त्यानंतर त्याने जेवणाच्या ताटाचा फोटोची झलकदेखील चाहत्यांना दाखवली आहे. या फोटोमध्ये चांदीच्या ताटात वरण, भात, पूरणपोळी, श्रीखंड, कांदाभजी असे त्याच्या आवडीचे पदार्थ केळवणासाठी वाढण्यात आले आहेत. 

प्रथमेशचा हटके उखाणा

केळवणादरम्यान प्रथमेशने एक हटके उखाणाही घेतला आहे."वाढलेलं पान रिकामी केलं एक एक घास घेत घेत, चतुरंगच्या कार्यालयामध्ये माझ्या जेवणाचा फक्कड जमला बेत", असा उखाणा प्रथमेशने घेतला आहे. 

प्रथमेश लघाटे आणि मुग्धा वैशंपायनची पहिली भेट 'सारेगमप लिटिल चॅम्प्स'च्या मंचावर झाली. पंधरा वर्षांपूर्वी झालेली दोघांची मैत्री आजही कायम आहे. पुढे त्यांनी त्यांची मैत्री पुढे नेण्याचा निर्णय घेतला असून प्रेमाची कबुलीही दिली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी "आमचं ठरलंय" असं म्हणत खास पोस्ट शेअर करत त्यांनी त्यांच्या प्रेमाची जाहीर कबुली दिली आहे. 

संबंधित बातम्या

Mugdha Vaishampayan Prathamesh Laghate : 'सारेगमप लिटिल चॅम्प्स' फेम मुग्धा वैशंपायन आणि प्रथमेश लघाटेची लव्हस्टोरी काय आहे? जाणून घ्या...

महत्त्वाच्या बातम्या

Govinda on Mother: ...तेव्हा नर्मदा नदीत उतरला गोविंदा, आयुष्य संपवण्याचा विचार; अभिनेत्याने 30 वर्षांपूर्वीचा किस्सा सांगितला
...तेव्हा नर्मदा नदीत उतरला गोविंदा, आयुष्य संपवण्याचा विचार; अभिनेत्याने 30 वर्षांपूर्वीचा किस्सा सांगितला
Detective on Actress: 'पैशांसाठी ठेवते शरीरसंबंध, पब्लिकमध्ये तिची क्युट इमेज', डिटेक्टिव्हचा प्रसिद्ध अभिनेत्रीबाबत धक्कादायक दावा
'पैशांसाठी ठेवते शरीरसंबंध, पब्लिकमध्ये तिची क्युट इमेज', डिटेक्टिव्हचा प्रसिद्ध अभिनेत्रीबाबत धक्कादायक दावा
Mrunal Thakur on Dating: मृणाल ठाकूर 'या' क्रिकेटरला करतेय डेट? नक्की खरं काय? अभिनेत्रीने सोडलं मौन, म्हणाली...
मृणाल ठाकूर 'या' क्रिकेटरला करतेय डेट? नक्की खरं काय? अभिनेत्रीने सोडलं मौन, म्हणाली...
Bayangi Palaychi Nahi Talaychi movie: नारळ अन् विझलेला दिवा; 'बायंगी: पाळायची नाही टाळायची!'ची रंजक कथा, कधी होणार रिलीज?
नारळ अन् विझलेला दिवा; 'बायंगी: पाळायची नाही टाळायची!'ची रंजक कथा, कधी होणार रिलीज?

व्हिडीओ

Raj Thackeray PC : कोकणातले खड्डे, जमिनीची विक्री, कंत्राटदारते नितीन गडकरी, राज ठाकरेंची FULL PC
Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
Sarfaraz Khan: अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा, साई सुदर्शनच्या जागी संधी
अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा
IND vs SL XI : 6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले, श्रीलंकेच्या खेळाडूंनी थेट बॅट तपासली
6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
Devendra Fadnavis: 'मी 100 टक्के ज्या अडचणी असतील त्या सोडवतो, पण कोल्हापूरची हद्दवाढ झालीच पाहिजे..' सीएम फडणवीसांनी व्यासपीठावरून ठणकावलं, बाॅल थेट लोकप्रतिनिधींच्या कोर्टात टाकला
'मी 100 टक्के ज्या अडचणी असतील त्या सोडवतो, पण कोल्हापूरची हद्दवाढ झालीच पाहिजे..' सीएम फडणवीसांनी व्यासपीठावरून ठणकावलं, बाॅल थेट लोकप्रतिनिधींच्या कोर्टात टाकला
'कोल्हापूरच्या हद्दवाढीसाठी चंद्रदीप नरके साहेब, अमल महाडिक सहकार्य करा..' हसन मुश्रीफांनी थेट मुख्यमंत्र्यांसमोर कान टोचले, महापौर रुपाराणी निकम अन् राजेश क्षीरसागरही बोलले
'कोल्हापूरच्या हद्दवाढीसाठी चंद्रदीप नरके साहेब, अमल महाडिक सहकार्य करा..' हसन मुश्रीफांनी थेट मुख्यमंत्र्यांसमोर कान टोचले, महापौर रुपाराणी निकम अन् राजेश क्षीरसागरही बोलले
Embed widget