Prajakta Koli: ‘ये शादी नही हो सकती’ मध्ये प्राजक्ता कोळी साकारणार प्रमुख भूमिका; भूमिकेविषयी म्हणाली...
‘ये शादी नही हो सकती’ या टेलिप्लेमध्ये प्राजक्ता कोळी (Prajakta Koli) ही प्रिया नावाच्या तरुणीची भूमिका साकारत आहे.
![Prajakta Koli: ‘ये शादी नही हो सकती’ मध्ये प्राजक्ता कोळी साकारणार प्रमुख भूमिका; भूमिकेविषयी म्हणाली... Prajakta Koli yeh shaadi nahi ho sakt teleplay character Prajakta Koli: ‘ये शादी नही हो सकती’ मध्ये प्राजक्ता कोळी साकारणार प्रमुख भूमिका; भूमिकेविषयी म्हणाली...](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/19/dd15d871911e8fbfaefb8c89e72c377d1676805671412259_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Prajakta Koli: यूट्युबर, प्रसिद्ध सोशल मीडिया पर्सनॅलिटी आणि अभिनेत्री प्राजक्ता कोळीचा (Prajakta Koli) चाहता वर्ग मोठा आहे. झी थिएटरच्या ‘ये शादी नही हो सकती’ या टेलिप्लेमधून प्राजक्ता ही प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या टेलिप्लेमध्ये प्राजक्ता कोळी ही प्रिया नावाच्या तरुणीची व्यक्तिरेखा साकारत आहे. या टेलिप्लेमधील भूमिकेबाबत प्राजक्ता म्हणाली, “ये शादी नही हो सकतीमध्ये काम केल्यानंतर सूरज बडजात्यांच्या विवाह या चित्रपटाची मला आठवण झाली. कारण तो चित्रपट पाहिल्यानंतर मी लग्न करण्यासाठी उत्सुक झाले होते. ये शादी नही हो सकती या टेलिप्लेमध्ये काम केल्यावर, आपल्यासोबत कायम एक पार्टनर असणे ही एक छान गोष्ट असते, याची जाणीव मला झाली.'
प्राजक्ता कोळीनं तिच्या ‘ये शादी नही हो सकती’ या टेलिप्लेमधील प्रिया या भूमिकेबद्दल देखील सांगितलं. ती म्हणाली, "‘ये शादी नही हो सकती’मध्ये मी प्रिया नावाच्या तरुणीची भूमिका साकारत आहे. ती धाडसी मुलगी आहे. प्रियाच्या आयुष्यात अनेक घटना घडतात. तिच्या आयुष्यात अनेक वळणं येतात. गोष्टींनंतर प्रियाचं तिच्या जोडीदारासोबत लग्न होतं का? हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला ‘ये शादी नही हो सकती’" हा टेलिप्ले बघावा लागेल.
View this post on Instagram
19 फेब्रुवारी रोजी टाटा प्ले थिएटरवर आणि टाटा प्ले मोबाइल अॅपवर 'ये शादी नही हो सकती' रिलीज होणार आहे.
View this post on Instagram
प्राजक्ता कोळी ही चित्रपटांमधून आणि वेब सीरिजमधून प्रेक्षकांच्या भेटीस आली. तिच्या मिसमॅच या वेब सीरिजच्या दोन्ही सिझनला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. जुग जुग जियो या चित्रपटामधून देखील प्राजक्ता प्रेक्षकांच्या भेटीस आली. आता प्राजक्ताच्या ये शादी नही हो सकती या टेलिप्लेची तिचे चाहते उत्सुकतेने वाट बघत आहेत.
वाचा इतर महत्वाच्या बातम्या:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)