एक्स्प्लोर
अनुष्का शेट्टीला बर्थडे निमित्त प्रभासकडून BMW कार गिफ्ट?
प्रभासने खरंच अनुष्काला हे महागडं आणि आलिशान गिफ्ट दिलं का, याबाबत अधिकृत वृत्त नाही.
मुंबई : दाक्षिणात्य सिनेसृष्टीचा सुपरस्टार प्रभास आणि अभिनेत्री अनुष्का शेट्टी यांचं नातं नेहमीच चर्चेत राहिलं आहे. दोघांच्या कथित प्रेमप्रकरणाला उजाळा मिळण्याचं कारण म्हणजे प्रभासने अनुष्काला दिलेलं बर्थडे गिफ्ट. बाहुबलीस्टार प्रभासने अनुष्काला बीएमडब्ल्यू कार भेट दिल्याची चर्चा आहे.
प्रभासने खरंच अनुष्काला हे महागडं आणि आलिशान गिफ्ट दिलं का, याबाबत अधिकृत वृत्त नाही. मात्र तामिळ चित्रपटसृष्टीत याबाबत जोरदार चर्चा आहे. प्रभासच्या बर्थडेला अनुष्काने त्याला घड्याळ गिफ्ट दिल्याचं म्हटलं जात होतं.
प्रभास आणि अनुष्का येत्या डिसेंबर महिन्यात साखरपुडा करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र या दोघांपैकी कुणीही अद्याप साखरपुड्यासंदर्भातील वृत्ताला दुजोरा दिला नाही. प्रभास-अनुष्का दोघेही याबाबत बोलण्यास नेहमीच टाळाटाळ करतात.
‘बाहुबली 2’ सिनेमाच्या रीलिजनंतर प्रभास आणि अनुष्का यांच्या अफेअरच्या चर्चांना उधाण आलं होतं. मात्र या केवळ अफवा असल्याचं या दोघांकडूनही सांगण्यात आलं आणि आमच्यात केवळ मैत्री आहे, असं दोघांनीही स्पष्ट केलं होतं.
प्रभास आणि अनुष्काचा डिसेंबरमध्ये साखरपुडा?
मध्यंतरी, अनुष्का तिचं वजन कमी करण्यासाठी मेहनत घेत होती. तेव्हा, अनुष्का साखरपुड्यासाठी वजन कमी करतेय, असा अंदाज काही जणांनी व्यक्त केला होता, तर कोणी ‘भागमती’ सिनेमाच्या शूटिंगसाठी ती वजन कमी करत असल्याचा दावा केला होता. विशेष म्हणजे, अनुष्काच्या वाढत्या वजनामुळेच 'साहो' चित्रपटातून तिचा पत्ता कट करुन श्रद्धा कपूरची वर्णी लावण्यात आली होती. ‘बाहुबली 2’नंतर प्रभास ‘साहो’ सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. साहोचा फर्स्ट लूक काही महिन्यांपूर्वी लाँच करण्यात आला होता. तर अनुष्काच्या वाढदिवशी 'भागमती'चा फर्स्ट लूक रीलिज झाला. प्रभास आणि अनुष्का यांची पहिली भेट 2009 मध्ये ‘बिल्ला’ सिनेमाच्या सेटवर झाली. या दोघांच्या जोडीला प्रेक्षकांनी प्रचंड पसंती दिली. त्यानंतर ‘मिर्ची’, ‘बाहुबली’, ‘बाहुबली 2’ अशा अनेक सिनेमांमध्ये ही जोडी एकत्र दिसली. प्रभास आणि अनुष्काच्या साखरपुड्याची बातमी खरी होणार, की हीसुद्धा अफवाच आहे, हे येत्या काळात स्पष्ट होईलच.अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
महाराष्ट्र
विश्व
व्यापार-उद्योग
Advertisement