PS 2 Box Office Collection: 'पोन्नियिन सेल्वन-2' ची बॉक्स ऑफिसवर घोडदौड सुरुच; चार दिवसात 200 कोटींचा टप्पा केला पार
जगभरातील बॉक्स ऑफिसवर 'पोन्नियिन सेल्वन 2' (Ponniyin Selvan 2) या चित्रपटानं 200 कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे.
![PS 2 Box Office Collection: 'पोन्नियिन सेल्वन-2' ची बॉक्स ऑफिसवर घोडदौड सुरुच; चार दिवसात 200 कोटींचा टप्पा केला पार ponniyin selvan 2 PS 2 box office collection crosses over 200 crores worldwide PS 2 Box Office Collection: 'पोन्नियिन सेल्वन-2' ची बॉक्स ऑफिसवर घोडदौड सुरुच; चार दिवसात 200 कोटींचा टप्पा केला पार](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/05/02/638fdac6cd6d1e0ecb17fadcef2755e41683006193429259_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
PS 2 Box Office Collection: हिस्टॉरिकल ड्रामा फिल्म 'पोन्नियिन सेल्वन 2' (Ponniyin Selvan 2) 28 एप्रिल रोजी प्रेक्षकांच्या भेटीस आली. पोन्नियिन सेल्वन चित्रपटाच्या पहिल्या भागानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. आता या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाला देखील प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. ‘PS 2’ हा चित्रपट जगभरातील बॉक्स ऑफिस रेकॉर्ड ब्रेक कमाई करत आहे. जगभरातील बॉक्स ऑफिसवर या चित्रपटानं 200 कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे.
मणिरत्नम यांनी दिग्दर्शित केलेल्या 'पोन्नियिन सेल्वन 2' या चित्रपटाचं समीक्षक आणि प्रेक्षक कौतुक करत आहेत. या चित्रपटानं वर्ल्ड वाइड बॉक्स ऑफिसवर 200 कोटींचा टप्पा पार केला आहे. पोन्नियिन सेल्वनच्या पहिल्या भागाला 200 कोटींचा टप्पा पार करायला 3 दिवस लागले होते.
'पोन्नियिन सेल्वन 2'चे भारतातील कलेक्शन
भारतामध्ये देखील 'पोन्नियिन सेल्वन 2' या चित्रपटानं कोट्यवधींची कमाई केली आहे. भारतात या चित्रपटानं जवळपास 105.02 एवढी कमाई केली आहे. रिलीज झाल्यानंतर पहिल्या दिवशी या चित्रपटानं भारतात 24 कोटींची कमाई केली होती. तर दुसऱ्या दिवशी या चित्रपटानं 26.2 कोटी कमाई केली होती.
Breaking barriers and conquering the globe! #PS2 soars high and crosses over 200 crores worldwide!#PS2RunningSuccessfully #CholasAreBack#PS2 #PonniyinSelvan2 #ManiRatnam @arrahman @madrastalkies_ @LycaProductions @RedGiantMovies_ @Tipsofficial @tipsmusicsouth @IMAX… pic.twitter.com/ACB22nrrSX
— Lyca Productions (@LycaProductions) May 1, 2023
'पोन्नियिन सेल्वन 2' मधील कलाकार
'पोन्नियिन सेल्वन 2' या चित्रपटात ऐश्वर्या राय बच्चन (Aishwarya Rai Bachchan), चियान विक्रम (Vikram), कार्ती, त्रिशा, जयम रवी, ऐश्वर्या लक्ष्मी आणि शोभिता धुलिपाला (Sobhita Dhulipala), आर सरथकुमार, प्रभू, विक्रम प्रभू, जयराम, प्रकाश राज, पार्थिवन, रहमान, लाल, जयचित्रा आणि नस्सर यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. हा चित्रपट तामिळ, तेलगू, मल्याळम, कन्नड आणि हिंदी भाषेत रिलीज झाला आहे.पोन्नियिन सेल्वन हा सिनेमा कल्कि यांच्या तमिळ कादंबरीवर आधारित आहे.
पोन्नियिन सेल्वन हा सिनेमा कल्कि यांच्या तमिळ कादंबरीवर आधारित असणार आहे. ही कादंबरी 1995 साली काल्कि यांनी लिहिली आहे. ऐश्वर्या राय बच्चन पोन्नियिन सेल्वनमध्ये राणी नंदिनीची भूमिका साकारली आहे. या चित्रपटामधील ऐश्वर्याच्या अभिनयाचं अनेक जण कौतुक करत आहेत. ए आर रहमानने या सिनेमातील गाणी गायली आहेत. चित्रपटातील गाण्यांना देखील प्रेक्षकांची पसंती मिळत आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या:
Ponniyin Selvan 2 Review : भव्यदिव्य 'पोन्नियिन सेल्वन 2'! कथानकात पडला मागे
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)