एक्स्प्लोर

ए बाई, कोण आहेस तू? हृतिकच्या प्रश्नावर अँजेला म्हणते...

मुंबई : पोलिश मॉडेल आणि अभिनेत्री अँजेला क्रिस्लिन्झकीने बॉलिवूडचा सुपरस्टार हृतिक रोशनचे आभार व्यक्त केल्यानंतर चर्चा रंगायला सुरुवात झाली. साहजिकच आपले आभार मानणारी ही तरुणी कोण हा प्रश्न हृतिकला पडला, किंवा त्याने तसं भासवलं. मात्र हृतिकच्या ट्वीटवर सपशेल माफी मागून अँजेला मोकळी झाली आहे. 'हृतिक हा माझा मित्र आणि मार्गदर्शक (मेंटर) आहे' अशा मथळ्याखाली अँजेलाची मुलाखत 'डीएनए' सारख्या काही वृत्तपत्रांमध्ये छापून आली. हृतिकसोबत आपण एका जाहिरातीत काम केलं असून त्याच्याशी असलेलं बाँडिंग आणि त्याने दिलेली प्रेरणा, याबाबत तिचे अनुभव या मुलाखतीत मांडले आहेत. मात्र ही मुलाखत आणि त्या अनुषंगाने रंगलेल्या चर्चा ऐकून हृतिक बुचकळ्यात पडला. या बातमीचा फोटो काढत हृतिकने 'माय डियर लेडी, कोण आहेस तू? आणि का खोटं बोलत आहेस?' असा प्रश्न ट्विटरवर विचारला. https://twitter.com/iHrithik/status/849131238795481088 हृतिकच्या ट्वीटला उत्तर देत अँजेलाने तात्काळ माफीनामा मागितला. दिशाभूल करणाऱ्या हेडलाईन्स आणि सगळ्या गोंधळासाठी सॉरी, असं अँजेला म्हणते. 'हृतिक सर, मला तुमच्याविषयी प्रचंड आदर आहे. दिशाभूल करणाऱ्या हेडलाईन्ससाठी मला माफ करा. हे खूप वेदनादायी आहे. इतर लाखो चाहत्यांप्रमाणे मला तुम्ही अभिनेता म्हणून प्रचंड आवडता. सुदैवाने मला तर तुमच्यासोबत दोन जाहिरातींमध्ये काम करण्याची संधीही मिळाली.' असं अँजेलाने ट्विटरवर लिहिलं आहे. 'माझ्या मते, मेंटर म्हणजे मला आयुष्यात योग्य दिशा दाखवणारी, प्रेरणा देणारी व्यक्ती. एका चित्रपटाच्या पत्रकार परिषदेत मला प्रश्न विचारला गेला. फॉरेन लूक्स असूनही बॉलिवूडमध्ये पदार्पणाचा विचार कसा काय आला, या प्रश्नावर मी तुमचं नाव घेतलं. हृतिक रोशनसोबत शूटिंग करताना त्यांच्या प्रेरणादायी शब्दांमुळे मी चित्रपटात आले.' असं अँजेलाने स्पष्ट केलं. 'संबंधित लेखामध्ये इतर लाखो लोकांप्रमाणे तुम्ही माझ्यासाठी कसे प्रेरणादायी ठरलात, त्यावरच भाष्य करण्यात आलं आहे. मात्र तुम्हाला जर कुठलाही त्रास किंवा मनस्ताप झाला असेल, तर मी क्षमा मागते.' असं अँजेलाने म्हटलं आहे. https://twitter.com/angelakrislinzk/status/849193976037085185 हृतिकनेही अँजेलाच्या माफीनाम्याला विनम्रतेनं उत्तर दिलं आहे. 'खरंच, किती दिशाभूल करणाऱ्या हेडलाईन्स होत्या. पण तू यावर स्पष्टीकरण दिलंस आणि माफी मागितलीस, हा तुझ्या मनाचा मोठेपणा आहे. तुला पुढील कारकीर्दीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा' अशा सदिच्छा हृतिकने अँजेलासाठी ट्विटरवर व्यक्त केल्या आहेत. https://twitter.com/iHrithik/status/849222237295071232 सुझान खानशी घटस्फोट झाल्यानंतर हृतिक रोशनचं अभिनेत्री कंगना रनौतसोबत झालेल्या ईमेल वॉर रंगलं होतं. त्यानंतर हृतिक सतत चर्चांमध्ये राहणं टाळतो.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Karan Johar: करण जोहरला नेमकं काय खटकलं? शाहरुख खान, आलिया भट्ट, करिनाला का अनफॉलो केलं? म्हणाला...
करण जोहरला नेमकं काय खटकलं? शाहरुख खान, आलिया भट्ट, करिनाला का अनफॉलो केलं? म्हणाला...
Raja Shivaji: रिलीज होऊन महिना उलटला, तरीही 'राजा शिवाजी'चं वादळ शमेना; 28 व्या दिवशीही दमदार कमाई
रिलीज होऊन महिना उलटला, तरीही 'राजा शिवाजी'चं वादळ शमेना; 28 व्या दिवशीही दमदार कमाई
Pankaj Bhadouria: भारताच्या प्रसिद्ध शेफला स्तनाचा कर्करोग, हॉस्पिटलमधील फोटो व्हायरल, चाहत्यांना केलं आवाहन
भारताच्या प्रसिद्ध शेफला स्तनाचा कर्करोग, हॉस्पिटलमधील फोटो व्हायरल, चाहत्यांना केलं आवाहन
Deool Band 2: स्वामी भक्तांनी थिएटर हाऊसफुल्ल, 'देऊळ बंद 2' 8 दिवसांत सुपरहिट, किती कोटी कमावले?
स्वामी भक्तांनी थिएटर हाऊसफुल्ल, 'देऊळ बंद 2' 8 दिवसांत सुपरहिट, किती कोटी कमावले?

व्हिडीओ

Gunratna Sadavarte Mumbai : रीलस्टार मनोज, तुझ्या मागण्या बेकायदेशीर, गुणरत्न सदावर्ते बरसले
Manoj Jarange Protest Special Report : कडक उन्हात जरांगेंचं उपोषण, समजूत काढण्यास सरकारला यश येणार?
Thane Vidhan Parishad : शिंदेंच्या बालेकिल्ल्यातच भाजपची नवी खेळी? बविआची किंमत वाढली! | ABP Majha
Buldhan Case Special Report : जिवंत मुलीला मृत मानलं; निर्दोष वडील-भाऊ जेलमध्ये, पोलिसांचा भांडाफोड
Special Report Milk Adultration : दुधात फॅट वाढवण्यासाठी पाम तेलाचा वापर? धक्कादायक प्रकार उघड

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vasai Cyber Fraud : धक्कादायक! थेट न्यायाधीशांच्या पत्नीला सायबर चोरांनी घातला गंडा; 'ऑफिसर कोड' टाकताच बँक खातं रिकामं
धक्कादायक! थेट न्यायाधीशांच्या पत्नीला सायबर चोरांनी घातला गंडा; 'ऑफिसर कोड' टाकताच बँक खातं रिकामं
Satara Sangli MLC : मविआत सातारा सांगलीची जागा शरद पवारांच्या राष्ट्रवादीला? उमेदवार कोण असणार? मतदारांची संख्या नेमकी किती? 
सातारा सांगलीची जागा शरद पवारांच्या राष्ट्रवादीला? उमेदवार कोण असणार? मतदारांची संख्या नेमकी किती? 
Shrikant Shinde Beed Visit: बीडमध्ये काळीज पिळवटून टाकणारी घटना! खासदारांना निवेदन देण्यापूर्वीच वृद्ध वडिलांचा मृत्यू; आधी मुलीला वाचवताना मुलगा गेला, आता मदत मागताना बाप हरपला
बीडमध्ये काळीज पिळवटून टाकणारी घटना! खासदारांना निवेदन देण्यापूर्वीच वृद्ध वडिलांचा मृत्यू; आधी मुलीला वाचवताना मुलगा गेला, आता मदत मागताना बाप हरपला
Mangalwedha Reel Star Rohini Paradhye Ends Life: दुसरं लग्न, आंतरजातीय प्रेमविवाह अन् हॉटेल ग्रामपंचायतच्या दोन नव्या शाखा; इन्स्टाग्रामवरील रिल स्टार रोहिणी पाराध्येनं आयुष्याचा दोर का कापला?
दुसरं लग्न, आंतरजातीय प्रेमविवाह अन् हॉटेल ग्रामपंचायतच्या दोन नव्या शाखा; इन्स्टाग्रामवरील रिल स्टार रोहिणी पाराध्येनं आयुष्याचा दोर का कापला?
Bank Holidays : जून महिन्यात बँका 11 दिवस बंद राहणार, बँकेतील कामाचं नियोजन करण्यापूर्वी संपूर्ण यादी चेक करा   
जून महिन्यात बँकांना किती दिवस सुट्टी, बँकांचं कामकाज कधी बंद असणार? जाणून घ्या
Pimpri Crime liquor poisoning: पुण्यातील विषारी दारुकांड नेमकं उघडकीस कसं आलं, आतापर्यंत किती मृत्यू? A टू Z माहिती
पुण्यातील विषारी दारुकांड नेमकं उघडकीस कसं आलं, आतापर्यंत किती मृत्यू? A टू Z माहिती
RBI : रिझर्व्ह बँक मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, चलनातील नव्या नोटा खास पद्धतीने तयार होणार, ना पाण्यात भिजण्याचं टेन्शन ना फाटण्याची भीती
आरबीआय मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, चलनातील नव्या नोटा खास पद्धतीने तयार होणार, ना पाण्यात भिजण्याचं टेन्शन ना फाटण्याची भीती
Vaibhav Sooryavanshi : IPL गाजवणाऱ्या वैभव सूर्यवंशीची थेट पाकिस्तानच्या आफ्रिदीशी तुलना; दिग्गज क्रिकेटपटूने नेमकं काय काय म्हणाला?
IPL गाजवणाऱ्या वैभव सूर्यवंशीची थेट पाकिस्तानच्या आफ्रिदीशी तुलना; दिग्गज क्रिकेटपटूने नेमकं काय काय म्हणाला?
Embed widget