एक्स्प्लोर
नागराज मंजुळेच्या 'सैराट'बाबात सई ताम्हणकरचं आवाहन !
मुंबई : उभ्या महाराष्ट्राला झिंगायला लावणाऱ्या सैराट सिनेमाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. परशा आणि आर्चीच्या संवेदनशील लव्हस्टोरीला प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर घेतलं आहे. त्याचाच परिणाम म्हणून ‘सैराट’ने पहिल्या चार दिवसात तब्बल 15 कोटी रुपयांची कमाई केली आहे.
या सिनेमाचं आणि दिग्दर्शक नागराज मंजुळेचं अनेकांनी कौतुक केलं आहे. बॉलिवूडमध्ये वेगळी ओळख असलेले दिग्दर्शक अनुराग कश्यप यांनी सैराटचं तोंडभरुन कौतुक केलं आहे.
तर दुसरीकडे मराठमोळी अभिनेत्री सई ताम्हणकरनेही 'सैराट'ची भरभरुन स्तुती केली आहे. तसंच सैराट सिनेमा जरुर पाहा, असं ट्विट सईने केलं आहे.Sairaat surprises you, makes you laugh,fall in love,then brings throws you back on ground, before pulling it off from under you ..
— Anurag Kashyap (@anuragkashyap72) May 1, 2016
Tweethearts @SairatMovie plz bagha ! — Sai (@SaieTamhankar) May 3, 2016यापूर्वी सिनेमा प्रदर्शित झाला त्या दिवशीही सईने ट्विट करुन, 'सैराट'साठी प्रचंड उत्सुक असल्याचं म्हटलं होतं. तसंच चाहत्यांनी सिनेमागृहात जाऊन सैराट पाहावा, असंही आवाहन तीने केलं होतं.
Really keen on this one! Please go n watch it in the theatres near u from today !! All d luck team "सैराट" pic.twitter.com/RK7tnF1AqY — Sai (@SaieTamhankar) April 29, 2016रेकॉर्डब्रेक कमाईच्या दिशेने सैराट दरम्यान, सैराटने अवघ्या चार दिवसात 15.10 कोटींची कमाई केली आहे. महत्त्वाचं म्हणजे पहिल्या विकेंडला म्हणजेच शुक्रवार, शनिवार आणि रविवार या तीन दिवसात तब्बल 12.20 कोटींचा गल्ला जमवला होता. पहिल्या विकेंडला इतकी कमाई करणारा हा मराठीतील पहिला सिनेमा ठरला आहे. यानंतर सोमवारी या सिनेमाने 2.90 कोटी रुपयांचा गल्ला जमवला. ‘सैराट’ने शुक्रवारी 3.55 कोटी, शनिवारी 3.80 कोटी आणि रविवारी 4. 85 कोटी आणि सोमवारी 2.90 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. त्यामुळे अवघ्या चार दिवसात सैराटने 15.10 कोटी रुपयांची कमाई केली आहे. 29 एप्रिलला प्रदर्शित झालेल्या ‘सैराट’ सिनेमात रिंकू राजगुरु आणि आकाश ठोसर यांची प्रमुख भूमिका आहे. परशा आणि आर्चीच्या संवेदनशील लव्हस्टोरीला प्रेक्षकांनी अक्षरशा डोक्यावर घेतलं आहे. सैराटलाही पायरसीचं ग्रहण प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर घेतलेल्या ‘सैराट’ची कॉपी यू ट्यूबवर लिक झाली आहे. महत्त्वाचं म्हणजे यू ट्यूबवर चक्क सेन्सॉर कॉपी अपलोड करण्यात आली होती. याप्रकरणी दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी थेट पोलिसात धाव घेतली आहे. नागराज मंजुळे यांनी मुंबई पोलीस आयुक्तांची भेट घेऊन तक्रार दाखल केली आहे.
संबंधित बातम्या
'सैराट'लाही पायरसीचं ग्रहण, नागराज मंजुळेंची पोलिसात धाव
बॉक्स ऑफिसवर सैराट सुसाट, तीन दिवसात 12 कोटींचा गल्ला
‘सैराट’ने कमाईचे रेकॉर्ड्स तोडल्यानंतर नागराज पहिल्यांदाच बोलला….
VIDEO : ‘झिंगाट’ गाण्यावर द ग्रेट खलीही ‘सैराट’
मराठी 85, इंग्रजी 73, ‘सैराट’मधील आर्चीचं नववीतील मार्कशीट !
रिव्ह्यू : याड लावणारा ‘सैराट’
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement