Phakaat Movie: कलाकारांची दमदार फळी असणारा फकाट 'या' दिवशी होणार रिलीज; हेमंत ढोमे आणि सुयोग गोऱ्हे प्रमुख भूमिकेत
'फकाट' (Phakaat) हा चित्रपट 19 मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
Phakaat Movie: प्रत्येकाच्या आयुष्यात एक तरी सिक्रेट असतं, हे सिक्रेट दुसऱ्या कोणाला तरी कळालं तर काय जबरदस्त धिंगाणा होऊ शकतो याची कल्पनाच करता येत नाही. याच भन्नाट विषयावर आधारित एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 'फकाट' असे हटके नाव असलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शक श्रेयश जाधव असून नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर शेअर करण्यात आले असून येत्या 19 मे रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या पोस्टरमध्ये हेमंत ढोमे (Hemant Dhome) , सुयोग गोऱ्हे, अविनाश नारकर, कबीर दुहान सिंग, अनुजा साठे, रसिका सुनील, नितीश चव्हाण, किरण गायकवाड आणि महेश जाधव दिसत आहेत. दमदार कलाकारांची फळी असलेला हा एक अॅक्शन कॉमेडी चित्रपट आहे.
पोस्टरमध्ये चित्रपटातील सगळे कलाकार दिसत असून एलओसी सिक्रेटची फाईल दिसत आहे आणि आजूबाजूला पैसेही दिसत आहेत. त्यामुळे आता हा नेमका काय प्रकार आहे? काय रहस्य आहे, याचे उत्तर चित्रपट प्रदर्शित झाल्यावरच मिळेल.
View this post on Instagram
दिग्दर्शक श्रेयश जाधव म्हणतात, "प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करणारा हा एक धमाल कौटुंबिक चित्रपट आहे. यात कॉमेडी आहे, अॅक्शन आहे. यात हायली कॉन्फिडेन्शियल धिंगाणा आहे. चित्रपटातील सगळेच कलाकार भन्नाट आहेत. प्रत्येकाने आपल्याला व्यक्तिरेखेला शंभर टक्के न्याय दिला आहे.''
चित्रपटाच्या नावावरूनच हा अफलातून चित्रपट असल्याचे दिसतेय. या चित्रपटाचा टीझर काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. या टीझरच्या सुरुवातीलाच आतंकवादी आणि सैनिकांची चकमक, अंगावर शहारे आणणारा गोळीबाराचा आवाज आणि या दरम्यान एक हायली कॉन्फिडेन्शिअल माहिती असणारी एल. ओ. सी. फाईल उघडताना दिसत असून, यात सैनिकाच्या वेशात नितीश चव्हाण दिसत आहे. एका बाजूला असे संवेदनशील चित्र दिसत असतानाच दुसऱ्या बाजूला हेमंत ढोमे (सलीम) आणि सुयोग गोऱ्हे (राजू) या जिगरी दोस्तांची धमाल, मस्तीही दिसत आहे. अचानक या दोघांच्या हातात ती फाईल पडते आणि त्यांच्या डोक्यात एक जबरदस्त कल्पना येते.
View this post on Instagram
वक्रतुंड एन्टरटेनमेंट्स, गणराज स्टुडिओ प्रस्तुत, निता जाधव निर्मित हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Phakaat Teaser: 'फकाट' चित्रपटाचा धमाकेदार टीझर रिलीज; हेमंत ढोमे आणि सुयोग गोऱ्हे प्रमुख भूमिकेत