मुंबई : आपल्या वक्तव्यांमुळे सतत वादात असणारी बॉलिवुडची क्वीन कंगना राणावत पुन्हा एकदा 'पंगा' घेणार आहे. पण, हा 'पंगा' कोणाशी वाद नसून तिच्या आगामी चित्रपटाचं टायटल आहे. 2018 या वर्षात मणिकर्णिका - द क्वीन ऑफ झांसी आणि जजमेंटल है क्या हे दोन चित्रपट सुमार चालल्यानंतर तिचा नवीन वर्षातील हा पहिलाच चित्रपट असणार आहे. त्यामुळचं या चित्रपटाकडून कंगनाला खूप अपेक्षा असणार आहेत.


हेही वाचा  - Jayalalitha Biopic I 'थलाइवी'चा फर्स्ट लूक पोस्टर प्रदर्शित; जयललितांच्या भूमिकेत कंगना

या चित्रपटात कंगनाने राष्ट्रीय स्तरावर खेळणाऱ्या कबड्डीच्या खेळाडूची भूमिका साकारली आहे. यात ती रेल्वे स्थानकावर तिकीट देतानाही दिसणार आहे. चित्रपटात साकारलेली रेल्वे कर्मचाऱ्याची भूमिका कंगना प्रत्यक्षात जगणार आहे. यासाठी ती मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्थानकावर तिकीट देणार आहे. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्थानकावर तुम्हाला तिकीट खिडकीवर कंगना दिसली तर आश्चर्य वाटून घेऊ नका. कारण, ती पंगा या चित्रपटाचं प्रमोशनासाठी हे करणार आहे.

हेही वाचा - सिम्पल लूकमध्ये 'पंगा' घेणार कंगना, पाहा आगामी चित्रपटाचा फर्स्ट लूक

रेल्वे स्थानकावर चित्रपटाचे प्रमोशन केल्यानंतर कंगना सहकलाकारांसोबत रात्री चित्रपटाचा ट्रेलर लाँच करणार आहे. या ट्रेलरवेळी सुधारित नागरिकत्व कायद्यावरुन सुरू असलेल्या वादावर ती बोलण्याची शक्यता आहे. पंगा चित्रपटात कंगनासोबत रिचा चड्डा, नीना गुप्ता, राजेश तेलंग आणि जस्सी गिल यांनीही भूमिका साकारल्या आहेत. अश्विनी तिवारी अय्यर यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शनाची जबाबदारी सांभाळली आहे. त्यांनी यअगोदर नील बटे सन्नाटा आणि बरेली की बर्फी सारख्या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. हा चित्रपट पुढील वर्षी 24 जानेवारी 2019 ला प्रदर्शित होणार आहे.

माजी मुख्यमंत्री दिवंगत जयललिता भूमिकेतही झळकणार कंगना -
तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री दिवंगत जयललिता यांच्या जीवनावर आधारित चित्रपट 'थलाइवी'मध्ये कंगना झळकणार आहे. यात ती दिवंगत जयललिता यांची भूमिका साकरणार आहे. हा चित्रपटही पुढील वर्षी 26 जून 2020 ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

हेही वाचा - "अपराजित अयोध्या" कंगनाकडून राम मंदिरावरील चित्रपटाची घोषणा

VIDEO | मीडिया देशाच्या अखंडतेला धोका पोहोचवत आहे : कंगना | एबीपी माझा