मुंबई : सुपरस्टार कंगना रणौतचा आगामी चित्रपट 'पंगा'चं पोस्टर रिलीज करण्यात आलं आहे. रिलीज होताच कंगनाच्या या चित्रपटाचं पोस्टर व्हायरल होत आहे. या पोस्टरमधील कंगनाचा लूक लोकांना प्रचंड आवडत असून कंगना या पोस्टरमध्ये सिंम्पल लूकमध्ये दिसत आहे.

कंगनाचा हा लूक फारसा वेगळा नाही. पहिली झलक पाहिल्यानंतर 'क्वीन'मधील साधेपणा आणि 'तन्नू वेड्स मन्नू'मधील तिचा लूक आठवतो. दरम्यान, या चित्रपटात कंगना पुन्हा एकदा युनिक कॅरेक्टर घेऊन चाहत्यांच्या भेटीसाठी येणार आहे. या चित्रपटाची टॅगलाइन 'जो सपने देखने हैं वो पंगा लेते है' असं आहे.


पोस्टरबाबत बोलायचं झालं तर यामध्ये कंगना इंडियन लूकमध्ये असून ती मनमोकळेपणाने हसत आहे. असं म्हटलं जातं की, या चित्रपटामध्ये कंगना आईची भूमिका साकारणार आहे. काही दिवसांपूर्वी दिग्दर्शक अश्व‍िनी अय्यर तिवारी यांनी चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारिख जाहीर केली होती. त्यांनी सांगितलं होतं की, पंगा 24 जानेवारी 2020 रोजी रिलीज होईल.


या चित्रपटात कंगनाव्यतिरिक्त ऋचा चड्ढा, नीना गुप्ता, जस्सी गिल आणि पंकज त्रिपाठी आहे. या चित्रपटादरम्यान वरूण धवन, श्रद्धा कपूर आणि नोरा फतेही स्टारर स्ट्रीट डांसर 3डी देखील प्रदर्शित होणार आहे. दोन्ही चित्रपट एकाच दिवशी रिलीज करण्यात येणार आहेत. याव्यतिरिक्त कंगना थलाइवी या चित्रपटातही दिसून येणार आहे. हा चित्रपट तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या जीवनावर आधारित आहे. हा चित्रपट 26 जून 2020 रोजी रिलीज होणार आहे.


वादात सापडला होता कंगनाचा चित्रपट

जयललिता यांची भाची जे.दीपा यांनी या बायोपिकवर आक्षेप घेतला होता. दीपा यांनी थेट मद्रास हायकोर्टात धाव घेतली होती. शिवाय चित्रपटावर आक्षेप घेत स्थगिती देण्याची मागणीदेखील केली होती. जे. दिपा मत व्यक्त करताना म्हणाल्या,' जयललिता या दिग्गज नेत्या होत्या. चित्रपटात माझा उल्लेख असल्यास मला त्याची माहिती देण्यात आलेली नाही. माझ्याविषयी चित्रपटात, कथेत किंवा संवादामध्ये उल्लेख असल्यास मला तो जाणून घेण्याचा अधिकार आहे, अश्या त्या म्हणाल्या.

संबंधित बातम्या : 

Jayalalitha Biopic I 'थलाइवी'चा फर्स्ट लूक पोस्टर प्रदर्शित; जयललितांच्या भूमिकेत कंगना

रणवीर सिंहचा गुजराती अंदाज; 'जयेशभाई जोरदार'चा फर्स्ट लूक रिलीज

2019मध्ये गुगलवर सर्वात जास्त सर्च करण्यात आलेले चित्रपट

मार्वेल सिरीजमधील 'ब्लॅक विडो'चा ट्रेलर रिलीज; हॉलीवूड सुपरस्टार स्कार्लेट जोहानसन मुख्य भूमिकेत