या चित्रपटाची स्क्रिप्ट केवी विजेंद्र प्रसाद लिहित आहे. याअगोदर प्रसाद यांनी ब्लॉकबस्टर चित्रपट बाहुबलीची स्क्रिप्ट लिहिली आहे. हा चित्रपट पुढील वर्षी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. राम मंदिराचा मुद्दा हा दशकांतील सर्वात मोठा मुद्दा आहे, त्यामुळं यावर चित्रपट निर्मितीचा निर्णय घेतल्याचे कंगणाने सांगितले.
माझा जन्म 80 च्या दशकात झाला आहे, ज्या काळात मी नेहमी अयोध्येच्या नावाने जमिनीचे तुकडे झाल्याचे मला ऐकायला मिळायचे. परिणामी रामाबद्दल नकारात्मक गोष्टी माझ्या कानावर पडल्या आहेत. श्रीराम हे बलिदानाचे प्रतिक आहे, ते एका जमिनीच्या तुकड्यावरुन वादग्रस्त ठरले. या वादाने संपूर्ण देशाचे राजकारणासोबत समाजकारणही बदलले. मात्र, एका निर्णयाने हा वाद आता संपला आहे. 'अपराजित अयोध्या' हा चित्रपट नास्तिकाचा आस्तिक होण्यापर्यंतचा प्रवास आहे. एकप्रकारे हा माझा वैयक्तीक प्रवासच असल्याचे कंगना म्हणाली. त्यामुळंच हा विषय माझ्या पहिल्या निर्मितीसाठी योग्य असल्याचे तिने सांगितले. कंगना या चित्रपटाद्वारे निर्मितीक्षेत्रात पदार्पण करणार आहे.
कंगनाचा 'थलाइवी' प्रदर्शनाच्या मार्गावर -
तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री दिवंगत जयललिता यांच्या जीवनावर आधारित चित्रपट 'थलाइवी'चा फर्स्ट लूक पोस्टर नुकताच प्रदर्शित झाला आहे. बॉलीवुड अभिनेत्री कंगना राणावत यामध्ये जयललिता यांची भूमिका साकारत आहे. हा चित्रपट तामिळ, तेलुगू आणि हिंदी या भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. जयललिता यांच्याप्रमाणे हुबेहूब दिसण्यासाठी कंगनाने प्रचंड मेहनत घेतल्याचे पाहयला मिळत आहे. या लूकसाठी तिला प्रोस्थेटिक मेकअपचा आधार घ्यावा लागला होता. या मेकअपचे काही फोटो काही महिन्यांपूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक विजय या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. हा चित्रपट तामिळमध्ये 'थलाइवी' तर हिंदीत 'जया' नावानं प्रदर्शित होणार आहे.
संबंधित बातम्या -
Jayalalitha Biopic I 'थलाइवी'चा फर्स्ट लूक पोस्टर प्रदर्शित; जयललितांच्या भूमिकेत कंगना
... आणि बिग बी अमिताभ शांतपणे कार चालकाची वाट बघत थांबले
Lakme Fashion Week 2019 Finale | करीना कपूरने लॅक्मे फॅशन वीकचा ग्रॅण्ड फिनाले गाजवला | ABP Majha