जयललिता यांच्या रुपातील कंगना ओळखू येत नाही इतका वेगळा आहे. हा चित्रपट तामिळ, तेलुगू आणि हिंदी या भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. जयललिता यांच्याप्रमाणे हुबेहूब दिसण्यासाठी कंगनाने प्रचंड मेहनत घेतल्याचे पाहयला मिळत आहे. या लूकसाठी तिला प्रोस्थेटिक मेकअपचा आधार घ्यावा लागला होता. या मेकअपचे काही फोटो काही महिन्यांपूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक विजय या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. हा चित्रपट तामिळमध्ये 'थलाइवी' तर हिंदीत 'जया' नावानं प्रदर्शित होणार आहे. 'एक सुपरस्टार हिरॉइन ते क्रांतीकारक हिरो...हे नाव तुम्हाला माहीत आहे...पण प्रवास मात्र नाही...' असं म्हणत थलाइवी चित्रपटाचे पोस्टर आणि टीझर शेअर करण्यात आलं आहे. या पोस्टर आणि व्हिडिओत कंगना जयललिता यांच्या आवडत्या हिरव्या रंगाच्या कांजीवरम साडीत दिसतेय.
चित्रपटासाठी कंगनाने शिकले भरतनाट्यम
या चित्रपटात कंगना 100 डान्सर्ससोबत एका रेट्रो गाण्याचे शूट करणार आहे, जे साउथ सिनेमाच्या कोरियोग्राफर गायत्री रघुराम दिग्दर्शित करणार आहे. या डान्स सिक्वेन्ससाठी कंगना नियमितपणे भरतनाट्यमचे शिक्षण घेतले आहे. या प्रशिक्षणाचे व्हिडीओ देखील कंगणाने सोशल मीडियावर शेअर केले होते. जयललिता ह्या उत्तम डान्सर होत्या, त्यामुळं त्यांची भूमिका साकरण्यासाठी कंगनाने भरतनाट्यमचे धडे गिरवलेत.
वादात सापडला होता चित्रपट -
जयललिता यांची भाची जे.दीपा यांनी या बायोपिकवर आक्षेप घेतला होता. दीपा यांनी थेट मद्रास हायकोर्टात धाव घेतली होती. शिवाय चित्रपटावर आक्षेप घेत स्थगिती देण्याची मागणीदेखील केली होती. जे. दिपा मत व्यक्त करताना म्हणाल्या,' जयललिता या दिग्गज नेत्या होत्या. चित्रपटात माझा उल्लेख असल्यास मला त्याची माहिती देण्यात आलेली नाही. माझ्याविषयी चित्रपटात, कथेत किंवा संबादामध्ये उल्लेख असल्यास मला तो जाणून घेण्याचा अधिकार आहे, अश्या त्या म्हणाल्या.
संबंधित बातम्या :
... आणि बिग बी अमिताभ शांतपणे कार चालकाची वाट बघत थांबले
Pagalpanti Movie Review | पागल? छे.. बिनडोकपंती!
Punha Nivadnuk | मराठी कलाकारांच्या #पुन्हानिवडणूक ट्वीटवरुन वाद, काँग्रेसचा आक्षेप; हा हॅशटॅग आहे तरी काय? | ABP Majha