एक्स्प्लोर
पाकिस्तानी अभिनेत्रीची घराबाहेर गोळ्या झाडून हत्या
शमिम 'शामो' म्हणून ओळखली जात असे. शिवाय ती उत्तम डान्सरही होती.
लाहोर : प्रसिद्ध पाकिस्तानी नाट्यअभिनेत्री शमिमची (वय 29 वर्ष) आज गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. मुल्तानमधील शाह टाऊनमध्ये असलेल्या घराबाहेर आज सकाळी तिचा खून झाला.
"कोणीतरी तिला कॉल करुन बाहेर बोलावलं. जेव्हा ती घराच्या मेन गेटमधून बाहेर पडली तेव्हा अज्ञाताने तिच्यावर गोळीबार केला, ज्यात तिचा जगीच मृत्यू झाला," अशी माहिती शमिमचा भाऊ सैफूर रहमानने पोलिसांना दिली आहे.
"नाटकांमध्ये काम करत असल्यामुळे माझ्या बहिणीला काही दिवसांपासून धमकीचे कॉल येत होते," असंही सैफूर रहमाननने सांगितलं. तर शमिमच्या हत्येमागे तिच्या नवऱ्याचा हात असू शकतो असा संशय कुटुंबीयांनी व्यक्त केला आहे.
या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला सर्व बाहूंनी तपास केला जाईल, असं पोलिसांनी सांगितलं.
शमिम 'शामो' म्हणून ओळखली जात असे. शिवाय ती उत्तम डान्सरही होती.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement