Padma Awards : 'पृथ्वीराज' सिनेमाचे दिग्दर्शक चंद्रप्रकाश द्विवेदी, सोनू निगम यांना 'पद्मश्री' पुरस्कार जाहीर
Padma Awards : 'पृथ्वीराज' सिनेमाचे दिग्दर्शक चंद्रप्रकाश द्विवेदी आणि सोनू निगम यांना 'पद्मश्री' पुरस्कार जाहीर झाला आहे.
Padma Awards : प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला मानाच्या पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. सोनू निगमला (Sonu Nigam) पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. तसेच 'अ पैसेज टू इंडिया' सिनेमातील व्हिक्टर बॅनर्जी (Victor Banerjee) यांना पद्मभूषण आणि 'पृथ्वीराज' चित्रपटाचे दिग्दर्शक चंद्रप्रकाश द्विवेदी (Chandraprakash Dwivedi) यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
सोनू निगम हा बॉलिवूडचा लोकप्रिय गायक आहे. त्याने आतापर्यंत एकापेक्षा एक हिट गाणी गायली आहेत. अक्षय कुमार, शाहरुख खान आणि सलमान खानसारख्या बॉलिवूड कलाकारांच्या चित्रपटांत सोनू निगमने गाणी गायली आहे. गायक असण्यासोबतच सोनू निगम संगीत दिग्दर्शक आणि अभिनेता देखील आहे. सोनूने केवळ हिंदीच नाही तर बंगाली, कन्नड, ओडिशा, गुजराती, तमिळ, तेलुगू, भोजपुरी आणि नेपाळी भाषांमध्येही गाणी गायली आहेत. त्याने आतापर्यंत 5 हजारांहून अधिक गाणी गायली आहेत.
व्हिक्टर बॅनर्जी
व्हिक्टर बॅनर्जी यांनी हिंदीसह इंग्रजी आणि बंगाली चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यांनी नेहमीच प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.
व्हिक्टर बॅनर्जी, उस्ताद रशीद खान यांच्याशिवाय दिवंगत गायक गुरमीत बावा यांनादेखील पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. तसेच संगीतकार बालेश भजनंत्री, गायिका माधुरी भरतवाल, सोनू निगम, चित्रपट निर्माते चंद्रप्रकाश द्विवेदी यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
पद्मविभूषण
प्रभा अत्रे
राधेशाम खेमका (मरणोत्तर)
बिपीन रावत (मरणोत्तर)
कल्याण सिंग (मरणोत्तर)
पद्मभूषण
सायरस पुनावाला
नटराजन चंद्रशेखरन
पद्मश्री
विजयकुमार डोंगरे
डॉ. हिम्मतराव बावस्कर
सुलोचना चव्हाण
सोनू निगम
अनिल राजवंशी
बालाजी तांबे (मरणोत्तर)
भिमसेन सिंगल
संबंधित बातम्या