एक्स्प्लोर

OTT Release This Week : 'हीरामंडी' आणि 'शैतान'नंतर 'या' आठवड्यात ओटीटीवर रिलीज होणार 'हे' धमाकेदार चित्रपट अन् वेब सीरिज'; तुम्ही काय पाहणार?

OTT Release This Week : ओटीटी प्लॅटफॉर्मवर 'या' आठवड्यात अनेक धमाकेदार चित्रपट (Movies) आणि 'वेबसीरिज' (Web Series) रिलीज होणार आहेत. प्रेक्षकांना घरबसल्या या सीरिज आणि चित्रपट पाहता येणार आहेत.

OTT Release This Week : ओटीटी (OTT) प्लॅटफॉर्मवर दरआठवड्यात अनेक नवनवे चित्रपट (Movies) आणि वेबसीरिज (Web Series) रिलीज होत असतात. ओटीटीवर प्रत्येक वयोगटातील मंडळींना त्यांच्या आवडीची कलाकृती पाहता येते. 'शैतान' (Shaitaan) ते 'हीरामंडी'पर्यंत (Heeramandi) अनेक बिग बजेट चित्रपट आणि वेबसीरिज या आठवड्यात प्रदर्शित झाले आहेत. या महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यातही प्रेक्षकांना मनोरंजनाची मेजवानी मिळणार आहे. या आठवड्यात अनेक दमदार चित्रपट आणि वेबसीरिज रिलीज होणार आहेत. यात विनोदी, हॉरर, अॅक्शन आणि रोमान्स अशा अनेक जॉनरचा समावेश आहे. या आठवड्यात ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रेक्षकांना काय पाहायला मिळणार जाणून घ्या...

अनदेखी सीझन 3 (Undekhi Season 3)
कधी रिलीज होणार? 10 मे
कुठे पाहाल? सोनी लिव्ह

नंदीश संधू, हर्ष छाया स्टारर 'अनदेखी 3' ही सोनी लिव्हवरील सर्वात जास्त चर्चेत असणारी वेब सीरिज आहे. या सीरिजचे पहिले दोन सीझन प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले आहेत. आता येत्या 10 मेला या सीरिजचा तिसरा सीझन रिलीज होणार आहे. हिंदी, तामिळ, तेलुगू, मल्याळम, कन्नड, मराठी आणि बंगाली या भाषांमध्ये ही सीरिज रिलीज होणार आहे. या सीरिजमध्ये दिब्येंदु भट्टाचार्य, सूर्या शर्मा, हर्ष छाया, आंचल सिंह, अंकुर राठी आणि अभिषेक चौहान मुख्य भूमिकेत आहेत. 

योद्धा (Yodha)
कधी रिलीज होणार? 15 मे
कुठे पाहता येईल? प्राईम व्हिडीओ

सिद्धार्थ मल्होत्रा, राशी खन्ना आणि दिशा पाटनी यांचा 'योद्धा' हा चित्रपट 22 मार्चला सिनेमागृहात प्रदर्शित झाला होता. या सिनेमाला प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळाला. आता घरबसल्या प्राईम व्हिडीओवर 15 मेपासून प्रेक्षकांना हा चित्रपट पाहता येईल. 

आडुजीविथम - द गोट लाईफ (Aadujeevitham The Goat Life)
कधी रिलीज होणार? 10 मे
कुठे पाहता येईल? डिज्नी प्लस हॉटस्टार

'आडुजीविथम-द गोट लाइफ' हा 2024 मधील सर्वाइवल ड्रामा आहे. ब्लेसीने या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. बेन्यामिनच्या 2008 मधील उपन्यास 'आडुजीविथम'वर हा आधारित आहे. एका सत्यघटनेवर आधारित हा चित्रपट आहे. या चित्रपटात पृथ्वीराज सुकुमारन, जिमी लीन-लुई आणि केआर गोकुल मुख्य भूमिकेत आहेत. तर तालिब अल बलुशी, रिक एबी, अमला पॉल आणि शोभा महन या चित्रपटात सहाय्यक भूमिकेत आहेत. 10 मे 2024 रोजी डिज्नी प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रेक्षकांना हा चित्रपट पाहता येईल.

मर्डर इन माहिम (Murder in Mahim)
कधी रिलीज होणार? 10 मे
कुठे पाहता येईल? जिओ सिनेमा

आशुतोष राणा आणि विजय राज यांची फिजियोलॉजिकल क्राइम, थ्रिलर सीरिज 'मर्डर इन माहिम' 10 मे 2024 रोजी जिओ सिनेमावर रिलीज होत आहे. या मर्डर मिस्ट्री सीरिजच्या दिग्दर्शनाची धुरा राज आचार्य यांनी सांभाळली आहे. या सीरिजमध्ये शिवानी रघुवंशी आणि शिवाजी साटम महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. 

8 एएम मेट्रो (8 A.M. Metro)
कधी रिलीज होणार? 10 मे
कुठे पाहता येईल? झी5

'8 एएम मेट्रो' हा रोमँटिक चित्रपट आहे. गुलशन देवैया आणि सैयामी खेर या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहेत. 10 मे 2024 रोजी झी 5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर हा चित्रपट रिलीज होईल.

रत्नम (Ratnam)
कुठे पाहता येईल? प्राईम व्हिडीओ

रत्नम हा तामिळ अॅक्शनपट आहे. हा चित्रपट याच आठवड्यात प्राईम व्हिडीओवर रिलीज होणार आहे. 

ऑल ऑफ अस स्ट्रेजर्स (All of us Strangers)
कधी रिलीज होणार? 8 मे
कुठे पाहता येईल? डिज्नी प्लस हॉटस्टार

'ऑल ऑफ अस स्ट्रेजर्स' प्रेक्षकांना 8 मे 2024 रोजी डिज्नी प्लस हॉटस्टारवर पाहता येईल. 

द फायनल अटॅक ऑन वेम्ब्ले (The Final Attack on Wembley)
कधी रिलीज होणार? 8 मे
कुठे पाहता येईल? नेटफ्लिक्स

'द फायनल अटॅक ऑन वेम्ब्ले' ही सीरिज फुटबॉल मॅचवर आधारित आहे. 8 मे 2024 पासून प्रेक्षकांना नेटफ्लिक्सवर ही सीरिज पाहता येईल. 

मॅक्सटन हॉल-द वर्ल्ड बिटविन अस (Maxton Hall)
कधी रिलीज होणार? 9 मे
कुठे पाहता येईल? प्राईम व्हिडीओ

मोना केस्टन यांच्या सेव मी या कादंबरीवर आधारित मॅक्सटन हॉल-द वर्ल्ड हा चित्रपट आहे. 

डॉक्टर हू
कधी रिलीज होणार? 11 मे
कुठे पाहता येईल? डिज्नी प्लस हॉटस्टार

'डॉक्टर हू'मध्ये एका डॉक्टरची गोष्ट दाखवण्यात आली आहे. 11 मेपासून डिज्नी प्लस हॉटस्टावर प्रेक्षकांना हे पाहता येईल.

जानकी समसारा 

जानकी समसारा ही कन्नड सीरिज आहे. एकत्रित कुटुंबात राहणाऱ्या जानकी आणि राघवची गोष्ट या सीरिजमध्ये दाखवण्यात आली आहे. 6 मेपासून प्रेक्षकांना डिज्नी प्लस हॉटस्टारवर ही रिलीज पाहता येईल. 

आवेशम 

'आवेशम' 2024 मधला मल्याळम अॅक्शनपट आहे. जीतू माधवनने या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. 9 मे 2024 पासून प्राईम व्हिडीओवर प्रेक्षकांना हा चित्रपट पाहता येईल.

संबंधित बातम्या

The Family Man Season 3 Updates : 'पंचायत-3' च्या रिलीज डेटनंतर आता फॅमिली मॅन-3 बद्दल मोठी अपडेट; श्रीकांत तिवारी कोणत्या नव्या मिशनवर?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मावळत्या सूर्यकिरणांची तिरीप बुद्धांच्या चेहऱ्यावर रेंगाळताना.. वेरूळ लेणीत किरणोत्सवाची पर्वणी, Photos
मावळत्या सूर्यकिरणांची तिरीप बुद्धांच्या चेहऱ्यावर रेंगाळताना.. वेरूळ लेणीत किरणोत्सवाची पर्वणी, Photos
निवडणुकांपूर्वी SBI च्या तक्रारीवरुन ईडीने छापा मारला, पण आता कुठलीही फसवणूक झाली नसल्याचं पत्र
निवडणुकांपूर्वी SBI च्या तक्रारीवरुन ईडीने छापा मारला, पण आता कुठलीही फसवणूक झाली नसल्याचं पत्र
मुंबईकरांनो, उष्माघात टाळण्यासाठी BMC च्या मार्गदर्शक सूचना; महापालिकेचा सल्ला, काय करावं-काय करु नये?
मुंबईकरांनो, उष्माघात टाळण्यासाठी BMC च्या मार्गदर्शक सूचना; महापालिकेचा सल्ला, काय करावं-काय करु नये?
मोठी बातमी! नोटबंदीवेळी जप्त केलेल्या जुन्या 500 अन् 1000 च्या नोटा जमा करुन घ्या, हायकोर्टाचे RBI ला निर्देश
मोठी बातमी! नोटबंदीवेळी जप्त केलेल्या जुन्या 500 अन् 1000 च्या नोटा जमा करुन घ्या, हायकोर्टाचे RBI ला निर्देश
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11 PM 10 March 2025Ravindra Dhangekar Join Shiv Sena | काँग्रेसला दे धक्का! रविंद्र धंगेकर यांच्या हाती धनुष्यबाणSpecial Report | Raj Thackeray Statement | कुंभस्नानावरुन वक्तव्य, वादाचा मेळा; संत-मंहतांची नाराजीRajkiya Shole | Special Report | Beed Crime | बीड जिल्ह्यात किती बॉस? किती आका? गुंडांना अभय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मावळत्या सूर्यकिरणांची तिरीप बुद्धांच्या चेहऱ्यावर रेंगाळताना.. वेरूळ लेणीत किरणोत्सवाची पर्वणी, Photos
मावळत्या सूर्यकिरणांची तिरीप बुद्धांच्या चेहऱ्यावर रेंगाळताना.. वेरूळ लेणीत किरणोत्सवाची पर्वणी, Photos
निवडणुकांपूर्वी SBI च्या तक्रारीवरुन ईडीने छापा मारला, पण आता कुठलीही फसवणूक झाली नसल्याचं पत्र
निवडणुकांपूर्वी SBI च्या तक्रारीवरुन ईडीने छापा मारला, पण आता कुठलीही फसवणूक झाली नसल्याचं पत्र
मुंबईकरांनो, उष्माघात टाळण्यासाठी BMC च्या मार्गदर्शक सूचना; महापालिकेचा सल्ला, काय करावं-काय करु नये?
मुंबईकरांनो, उष्माघात टाळण्यासाठी BMC च्या मार्गदर्शक सूचना; महापालिकेचा सल्ला, काय करावं-काय करु नये?
मोठी बातमी! नोटबंदीवेळी जप्त केलेल्या जुन्या 500 अन् 1000 च्या नोटा जमा करुन घ्या, हायकोर्टाचे RBI ला निर्देश
मोठी बातमी! नोटबंदीवेळी जप्त केलेल्या जुन्या 500 अन् 1000 च्या नोटा जमा करुन घ्या, हायकोर्टाचे RBI ला निर्देश
तुझं नाटक मीच बघेन, बर का?; आ. संदीप क्षीरसागरांचा तहसीलदारांना दम; खळबळजनक ऑडिओ क्लिप व्हायरल
तुझं नाटक मीच बघेन, बर का?; आ. संदीप क्षीरसागरांचा तहसीलदारांना दम; खळबळजनक ऑडिओ क्लिप व्हायरल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 मार्च 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 मार्च 2025 | सोमवार
धक्कादायक! रायगड जिल्ह्यात 2 खुनाच्या घटना; काळ्या बॅगेत महिलेचा मृतदेह आढळल्याने खळबळ
धक्कादायक! रायगड जिल्ह्यात 2 खुनाच्या घटना; काळ्या बॅगेत महिलेचा मृतदेह आढळल्याने खळबळ
Harshvardhan Sapkal on Ravindra Dhangekar : धंगेकर कोण होतास तू, काय झालास तू...; काँग्रेसला रामराम ठोकल्यानंतर प्रदेशाध्यक्षांची बोचरी टीका
धंगेकर कोण होतास तू, काय झालास तू...; काँग्रेसला रामराम ठोकल्यानंतर प्रदेशाध्यक्षांची बोचरी टीका
Embed widget