OTT And Theatre Release : मनोरंजनाची मेजवानी; या आठवड्यात रिलीज होणारे धमाकेदार चित्रपट आणि वेब सीरिज
या आठवड्यातही मोठ्या पडद्यावर आणि ओटीटी प्लॅटफॉर्मवर अनेक चित्रपट आणि वेब सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.
Upcoming new movies and web series: ओटीटी (OTT) आणि थिएटरमध्ये रिलीज होणाऱ्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत असतात. गेल्या आठवड्यात रिलीज झालेल्या गॉडफादर (God Father) आणि द घोस्ट (The Ghost) यांसारख्या चित्रपटांनी प्रेक्षकांचे मनोरंजन केले. या आठवड्यातही मोठ्या पडद्यावर आणि ओटीटी प्लॅटफॉर्मवर अनेक चित्रपट आणि वेब सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. अनेक तगड्या कलाकारांच्या वेब सीरिज आणि चित्रपट या आठवड्यात प्रदर्शित होणार आहेत. जाणून घेऊया या आठवड्यात रिलीज होणाऱ्या वेब सीरिज आणि चित्रपट...
कोड : नाम तिरंगा
बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री परिणीती चोप्रा तिच्या अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकते. बऱ्याच वर्षाच्या ब्रेकनंतर आता परिणीती पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावरुन प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. 'कोड :नाम तिरंगा' हा अॅक्शन पॅक चित्रपट 14 ऑक्टोबर 2022 रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात परिणीतीचा हटके लूक प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. या ट्रेलरमधील परिणीतीच्या लूकनं अनेकांचे लक्ष वेधले. आता हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करेल की नाही? या प्रश्नाचं उत्तर लवकरच मिळेल.
डॉक्टर जी
आयुष्मान खुराना,रकुल प्रीत सिंह आणि शेफाली शाह अशा तगड्या स्टारकास्टसह डॉक्टर जी 14 ऑक्टोबर 2022 रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात आयुष्मान डॉक्टरची भूमिका साकारताना दिसणार आहे.या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून त्याला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळत आहे.
कांतारा - ए लेजेंडॉ
कन्नड चित्रपट कांतारा - ए लीजेंड या चित्रपटाचा हिंदी व्हर्जन 14 ऑक्टोबरला प्रदर्शित होणार असून,चित्रपटाच्या ट्रेलरनं नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आहे.
मिसमॅच सीजन 2
मिसमॅच या वेब सीरिजच्या पहिल्या सीझनला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. या सीरिजमधील प्राजक्ता कोळी आणि रोहित सराफ यांच्या अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकली. या सीरिजच्या दुसऱ्या सीझनची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत होते. आता मिसमॅच या सीरिजचा दुसरा सीझन प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या आठवड्यात ही सीरिज नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होईल, असं म्हटलं जात आहे.
गुड बॅड गर्ल
विकास बहल आणि चैताली परमार निर्मित आणि अभिषेक सेनगुप्ता दिग्दर्शित 'गुड बॅड गर्ल'शो लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.ही एक कॉमेडी वेब सीरिज असून यामध्ये समृद्धी दिवाण मुख्य भूमिकेत आहे.त्याचे स्ट्रीमिंग सोनी लिव्हअॅपवर 14ऑक्टोबरपासून सुरू होईल.
वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या: