Orry New Look : 9-5 जॉब करणाऱ्यांची ओरीने उडवली खिल्ली, मग नेटकऱ्यांनी हेअरस्टाईलवरून केलं ट्रोल, कोंबड्याशी तुलना
Orry New Hairstyle : ओरीने त्याचा नवीन लूक चाहत्यांसोबत शेअर केला आहे. यावरुन नेटिझन्सने त्याला चांगलंच ट्रोल केलं आहे.
मुंबई : बॉलिवूडच्या प्रत्येक पार्टीत दिसणारा ओरी (Orry) म्हणजेच ओरहान अवत्रामणी (Orhan Awatramani) सोशल मीडियावर कायम चर्चेत असतो. ओरीची सेलिब्रिटींसोबतचे पार्टीतील व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर नेहमीच व्हायरल होत असतात. प्रत्येक सेलिब्रिटीच्या पार्टीत ओरीची हजेरी पाहायला मिळते. अशी कोणतीही बॉलिवूड पार्टी नाही, जिथे ओरी दिसत नाही. प्रत्येक सेलिब्रिटीला चिकटून काढलेले ओरीचे फोटो सोशल मीडियावर चर्चेत येतात. आता ओरी पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. पण, याचं कारण काही वेगळं आहे.
9-5 नोकरी करणाऱ्यांची ओरीने उडवली खिल्ली
ओरी चर्चेत येण्याचं कारण त्याची नवीन इंस्टाग्राम पोस्ट आहे. ओरीने त्याचा नवीन लूक सोशल मीडियावर शेअर केला आहे. ओरीने इंस्टाग्रामवर त्याच्या नवीन हेअरस्टाईलचे फोटो शेअर करत चाहत्यांना अपडेट दिली आहे. ओरी नेहमीच त्याच्या अतरंगी फॅशन स्टाईलमुळे चर्चेत असतो. ओरीने नवीन हेअरस्टाईलचा लूक चाहत्यांसोबत शेअर केला आहे, पण नेटिझन्सने त्याला चांगलच ट्रोल केलं आहे.
नेटकऱ्यांनी ओरीला हेअरस्टाईलवरून केलं ट्रोल
ओरीने सोशल मिडिया प्लॅटफॉर्म इंस्ट्रागामवर त्याचे नवीन फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोला कॅप्शन देताना त्याने 9 टू 5 नोकरी करणाऱ्यांची खिल्ली उडवली आहे. यामुळेच नेटकऱ्यांनी ओरीलाही धारेवर धरत त्याला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. ओरीने नवीन पोस्टमध्ये 9 ते 5 नोकरी करणाऱ्यांची चेष्टा केली आहे, यावर नेटकरी त्याच्यावर चांगलेच भडकले आहेत.
ओरीच्या हेअरस्टाईलची कोंबड्याशी तुलना
View this post on Instagram
ओरीचा नवीन लूक
ओरीने इंस्टाग्रामवर फोटो शेअर केले आहेत. या पोस्टमध्ये त्याने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे, ''मी रोज संध्याकाळी चेहऱ्यावर मोठ्या हास्यासोबत उठतो आणि मला यात काही चुकीचं वाटत नाही. होय, तुम्ही कदाचित अजूनही 9-5 काम करत आहात आणि ते करणं किती वाईट अनुभव आहे, असं मला वाटतं.'' ओरीची ही पोस्ट आता सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. ओरीने 9-5 जॉबची खिल्ली उडवल्यानंतर नेटकऱ्यांनी उलट ओरीवर निशाणा साधला आहे.
ओरीची नवीन हेअरस्टाईल पाहिली का?
View this post on Instagram
नेटकऱ्यांनी नेमकं काय म्हटलं?
ओरीची ही पोस्ट व्हायरल झाल्यानंतर नेटकरी त्याच्या नव्या हेअरस्टाइलची खिल्ली उडवत आहेत. 9 ते 5 काम करणाऱ्यांचा राग वाढला आणि त्यांनी ओरीवर टीकास्त्र डागलं आहे. ओरीच्या पोस्टवर कमेंट करताना एका यूजरने लिहिले की, '9 ते 5 नोकऱ्या करणाऱ्यांचा तू अपमान केला आहे. तुमच्या जन्मादरम्यान मदत करणाऱ्या नर्सही याचं वेळेत काम करतात. आणखी एकाने कमेंटमध्ये लिहिलं आहे, "स्टायलिस्टचे नाव काय? त्याला टाळण्यासाठी म्हणून सांग." दुसऱ्याने हेअरस्टाईलची कोंबड्यासोबत तुलना करत कमेंटमध्ये म्हटलंय "कोंबड्याने ओरीला चावा घेतला."